Breaking News
Home / मराठी तडका / ह्या मुलाचा अफलातून डान्स पाहिल्यावर तुम्हांला हृतिकची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, बघा एकदा हा व्हिडीओ

ह्या मुलाचा अफलातून डान्स पाहिल्यावर तुम्हांला हृतिकची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, बघा एकदा हा व्हिडीओ

वायरल व्हिडियोज वर लेख लिहिणं हे आपल्या टीमला आवडतं. तसेच हे लेख वाचणं आपल्याला आवडतं हे आपल्या प्रतिसादातून कळत असतं. त्यामुळे आपली टीम आपल्या मनोरंजनासाठी जे लिखाण करत असते त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. प्रोत्साहन मिळतं. नवनवीन विषय सुचतात आणि काम उत्तम होतं. आपल्या या प्रोत्साहनामुळे अगदी कमी कालावधीत आपली टीम उत्तमोत्तम लेखन करू शकली आहे. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आजच्या या लेखातून आपण एका वायरल व्हिडियो विषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. हा व्हिडियो आहे एका पार्टीतला. पार्टी तशी छोटी वाटते. पण यात एक जबरदस्त डान्सर येऊन आपला जलवा दाखवतो त्यामुळे या पार्टीचा नूर बदलून जातो. कारण व्हिडियो सुरू होतो तेव्हा लक्षात येतं की आपल्याला समोर मंच दिसत असतो. पण त्यावर कुठचीही सजावट नसते. नुसती फळकूटं दिसत असतात.

पण या डान्सर मुळे या सगळ्या गोष्टींकडे प्रथमतः लक्ष जात नाही. व्हिडियो सुरू होतो तेव्हा गाणं सुरू झालेलं असतं. हृतिक रोशन यांच्या पहिल्या वहिल्या चित्रपटातलं हे गाणं. कहो ना प्यार हैं या चित्रपटातलं , ‘इक पल का जिना’ हे ते गाणं. नवदशकाच्या सुरवातीस आलेला हा चित्रपट अगदी धुमाकूळ घालून गेला होता. आपल्यापैकी अनेक जण त्यावेळी शाळा महाविद्यालयात असतील. त्या काळात या गाण्याची एवढी क्रेझ निर्माण झाली होती की लहान लहान पोरं यावर डान्स करताना दिसत. पुढे पुढे यातील सिग्नेचर स्टेप वरून स्टोव्ह पेटवण्याचे मिम्स ही वायरल झाले होते. एकंदर काय तर हा चित्रपट आणि हे गाणं, त्यावरचा हृतिक यांचा डान्स अतिशय लोकप्रिय झाला होता. या व्हिडियोतील डान्सरच्या डान्स ने या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला. त्यानेही छान डान्स केलाच. पाहिलं गाणं संपलं की दुसरं गाणं येणार हे स्वाभाविक असतं. पण फार कमी वेळा दिसणारा प्रकार इथे घडताना दिसतो. हा प्रकार म्हणजे दोन गाण्यांमध्ये दुसरा एखादा डान्सर येऊन आपली कला सादर करतो.

तोपर्यंत पहिल्या डान्सरला वेशभूषा बदलायला वेळ मिळतो. इथे ते होताना दिसतं. पहिला डान्सर काही क्षण बाजूला जाऊन वेशभूषा काहीशी बदलतो. तोपर्यंत पाठी उभा असलेला एक मुलगा येऊन धमाल म्युझिक वर तेवढाच धमाल डान्स करून जातो. एव्हाना दुसरं गाणं वाजायला लागलेलं असतं. कोई मिल गया चित्रपटातलं ‘इट्स मॅजिक, इट्स मॅजिक’ हे ते गाणं. यात पहिला डान्सर सामील होतो. हे सुद्धा हृतिक याचंच गाणं. यात वैशिष्ट्य म्हणजे हा डान्सर हृतिक यांनी साकार केलेल्या भूमिकेची हुबेहूब नक्कल करून दाखवतो. त्यामुळे उपस्थितांना अजून आनंदाचं भरतं येतं. या गाण्यावरही अगदी जबरदस्त डान्स करून हा डान्सर सगळ्यांची वाहवा मिळवत असतो. डान्स करत असताना आपली सगळी ऊर्जा एकवटून नाचतो आहे हे कळत असतं. त्याच्या या ऊर्जेचं कौतुक वाटतं. दोन गाण्यांवर डान्स केल्यावर काय हालत होते हे आपण जाणतोच. पण हा भाऊ काही थकलेला नसतो. अजूनही तिसरं गाणं बाकी असतं. हे गाणं वाजायला लागतं.

कहो ना प्यार हैं या चित्रपटातलं तेच शब्द असलेलं गाणं. अजून एक गाणं जे आपल्याला नॉस्टॅल्जिक क्षणांची आठवण करून देतं. एव्हाना या डान्सरवर सगळी कडून कौतुक होत असतं. भारतात काही ठिकाणी एखाद्याची कला आवडली की पैसे उडवले जातात. इथेही ते घडताना दिसतं. एकप्रकारे त्याच्या डान्सची ही पावतीच. आपणही हा संपूर्ण परफॉर्मन्स एकदम आनंदाने बघतो. त्यामुळे आपण केवळ व्हिडियो बघून सोडून देत नाही. तर या डान्सर विषयी काही माहिती मिळते का ते बघतो. पण यासाठी तुम्हाला दुसरी कडे जायची गरज नाही. आपल्या टीमने हे काम आपल्यासाठी सोप्पं केलेलं आहे. या डान्सरचं नाव आहे समीर डीडीसी. हा मूळचा मुंबईकर कलाकार. वयाच्या अगदी १२ व्या वर्षी त्याने हृतिक रोशन यांचा डान्स पाहिला आणि त्यांच्या स्टाईलच्या प्रेमातच पडला ना पोट्ट्या. तिथपासून पुढे त्याने त्यांच्यासारखा डान्स करणं सुरू केलं. त्याला ते जमुही लागलं. पुढे कोई मिल गया मधली हृतिक यांची व्यक्तिरेखा रंगवायला सुरवात केली. ते ही लोकांना आवडायला लागलं.

दरम्यानच्या काळात पार्टीज, शोज करणं सुरू होतं. पण असं असलं तरीही सगळ्यांत जास्त लोकप्रियता मिळवून दिली ती टिकटॉक व्हिडियोज नी. त्यातील डान्स मुळे समीर डीडीसी हे नाव सुपरिचित झालेलं होतं. विविध सोशल मीडियावरही त्याचे डान्स वायरल झालेले आहेतच. पण लक्षात राहावी अशी बाब म्हणजे यातील बहुतांश व्हिडियोज हे इतरांनी अपलोड केल्यावर प्रसिद्ध झालेले दिसून येतात. असो. काहीही असलं तरीही समीर याचा दिवसेंदिवस बहरत आणि सुधारत जाणारा डान्स आपल्याला दिसतो आहे. येत्या काळात त्याच्या लोकप्रियतेत अजून भर पडो हीच सदिच्छा. तसेच वर त्याच्या विषयी उपलब्ध असलेली माहिती युट्युब च्या माध्यमातून मिळवली आहे, हे नमूद करावसं वाटतं. त्यांनी या होतकरू कलाकारास त्यांच्या चॅनेलचे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले याबद्दल त्यांचं ही कौतुक.

हा लेख आपल्याला आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपण नेहमीप्रमाणे आमचा हा लेख शेअर करा. कारण आपलं तर ठरलंय. लेख वाचत राहा, शेअर करत राहा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *