Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाचा इतका सुंदर आवाज ऐकून तुम्हीदेखील थक्क व्हाल, अश्या कलाकाराला प्र’सिद्दी मिळायलाच हवी

ह्या मुलाचा इतका सुंदर आवाज ऐकून तुम्हीदेखील थक्क व्हाल, अश्या कलाकाराला प्र’सिद्दी मिळायलाच हवी

नुकत्याच एका रियालिटी शोच्या एका भागात एक लोकप्रिय अभिनेत्री पाहुण्या परीक्षक म्हणून आल्या होत्या. काही वेळाने त्यांच्या समोर त्या शोच्या स्पर्धकांपैकी एक जण आला. त्याला बघून त्यांना त्याचा चेहरा पाहिल्यासारखा वाटला. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे याचा एक डान्स व्हिडियो आपण सोशल मिडिया वर बघितला होता आणि शेअर ही केला होता. अतिशय गरीब परिस्थितून वर आलेल्या या मुलाचं मग त्यांनी खूप कौतुक केलं आणि त्याला शुभेच्छा ही दिल्या. या आणि अशा घटना नजीकच्या काळात आपल्या परिचयाच्या होत चालल्या आहेत. अर्थात याचं श्रेय जातं ते सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ना. त्यांच्यावर वायरल होणारे लेख, फोटो, व्हिडियोज यामुळे तळागाळातल्या टॅलेंटला पूर्ण देशासमोर व्यक्त होण्याची संधी मिळते. हीच बाब ओळखून अनेक होतकरू कलाकार आपली कला व्हिडियोबद्ध करून सोशल मीडिया वर अपलोड करत असतात. काही वेळा ही कला व्हिडियोबद्ध करण्याचं काम, त्यांची मित्र मंडळी करत असतात.

आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो पाहिला. ज्यात एक उत्तम गळ्याचा गायक आपल्याला त्याच्या गायकीने आनंद देत असतो. तर त्याची मित्रमंडळी त्याच्या या गायकीचं चित्रीकरण करत त्याला प्रोत्साहन देत असतात. या व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा शर्ट आणि जीन्स घातलेला एक तरुण उभा असतो. शर्ट जीन्स मध्ये खोचलेला, कानात डुल, काहीसे अस्ताव्यस्त केस असं एकंदर त्याचं रुपडं असतं. व्हिडियो च्या सुरुवातीला तो स्वतःची ओळख करून देतो. यातून या तरुणाचं नाव मणी मलिक असल्याच कळतं. तर असा हा मणी पुढच्या काही सेकंदात गाणं गायला सुरुवात करतो. त्याने निवडलेलं गाणं असतं, बाहुबली २ मधलं जयजयकारा हे गाणं. लोकप्रिय गायक कैलाश खेर यांच्या पहाडी आवाजात आपण हे गाणं ऐकलं आहेच. आज या तरुणाकडून हे गाणं ऐकायला मिळणार तेव्हा हा कसा गायील याची एक उत्सुकता असते. आपली ही उत्सुकता पैसे वसूल ठरते. कारण या तरुणाच्या गळ्यात खरंच जादू आहे. अर्थात आपण त्याची तुलना कैलाश खेर यांनी गायलेल्या गाण्याशी करणं योग्य नव्हे आणि आपली टीम तसं करतही नाहीये.

पण एक गायक म्हणून त्याने जो परफॉर्मन्स दिला आहे त्याने आपल्याला खूप आनंद होतो. त्याचं एक महत्वाचं कारण असं वाटतं, की तो जेव्हा गातो तेव्हा कॅमेऱ्यासमोर कसे दिसू यापेक्षा त्याचं लक्ष गाण्याकडे असतं. त्यामुळे गाणं गाताना त्याची देहबोली आपोआप गाण्याला अनुसरून बदलते. या सगळ्यांचा एकंदर आपल्यावर असा परिणाम होतो की हा व्हिडियो आपल्याला आवडून जातो. या व्हिडियोत त्याचा अजून एक मित्र पाठीमागे उभा असतो खरा, पण त्याच्याकडून काही गाणं गायलं जात नाही. पण जो मित्र त्याचं गाणं चित्रित करत असतो तो मात्र नंतर नंतर या तरुणासोबत गायला लागतो. तुम्ही ही बाब अनेक वेळेस बघितली असेल की, जेव्हा एखादा गायक अतिशय उत्तम असं गाणं सादर करतो तेव्हा ते गाणं ऐकणारे आपोआप त्याच्या सुरात सूर मिसळून गाणं गात असतात. एकप्रकारे न ठरवता, आपण दिलेली ही दादच असते. या व्हिडियोत ते होताना दिसत. बरं फक्त हे त्या मित्राच्या बाबतीत होतं असं नाही, तर ते आपल्या बाबतीत ही होतं. आपणही या तरुणाच्या गाण्यात आपले सूर मिसळत असतो.

आधीच ते गाणं ऊर्जा, संवेदनशीलता यांनी भारलेलं आहे. त्यात या तरुणाच्या गायकीने आपण ही प्रेरित होतो. या तरुणाच्या गळ्यात जादू आहे हे नक्की. व्हिडियो संपता संपता तो आपल्या मित्राला अजून काही गाणं गाऊ का असं विचारतो, पण तोपर्यंत व्हिडियो बंद झालेला असतो. पण या तरुणाचं अजून एखादं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं असं सहज वाटून जातं. काय माहिती कदाचित येत्या काळात ही संधी मिळेल सुद्धा. सध्या आपण त्याला या लेखाच्या मार्फत शुभेच्छा देऊयात. मित्रा, तुझ्या गायकीला आमच्या टीमचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

आपण या तरुणाच्या गायकीचा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्यालाही आवडला असेल. त्याचप्रमाणे आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. जेव्हा जेव्हा एखादा नवीन व्हिडियो येतो आणि त्यातून हे उत्तम कलाकार आपली कला सादर करत असतात तेव्हा त्यांना आपल्या माध्यमातून जमेल तेवढी प्रसिद्धी मिळावी याकडे आपल्या टीमचा कल असतो. आपण कुठे तरी कोणाच्या चांगल्या कामासाठी मदत करतो आहोत ही भावना त्यापाठी असते. अर्थात तुम्ही ते लेख शेअर केल्यावर या आमच्या प्रयत्नांना पूर्तता येते. आजचा लेखही यास अपवाद नसेल हे नक्की. आपल्या या सहकार्याबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद !! आपला वाचक, श्रोते, प्रेक्षक म्हणून या कलाकारांवर आणि आपल्या टीमवर लोभ कायम राहू द्या ही सदिच्छा !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *