Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाचा काही क्षणाचा व्हिडीओ पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा हा मजेशीर व्हिडीओ

ह्या मुलाचा काही क्षणाचा व्हिडीओ पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा हा मजेशीर व्हिडीओ

लहान मुलं घरात असली म्हणजे वेळ कसा जातो ते कळत नाही. अगदीच लहान असतील तर त्याच्यापाठी दादा पुता करत धावावं लागतं आणि सोनू मंम्म कर म्हणण्यात अख्खा दिवस जातो. सोनू आपला बागडत राहतो आणि इथे आई वडील किंवा आजी आजोबा अगदी थकून जातात. पण हीच लहान मुलं ,रंगात आली की मग जे काही मनोरंजन होतं, त्यास तोड नसतो. कोणताही रियालिटी शो यांच्या मनोरंजनापुढे फिकाच पडतो असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने आज पाहिला. केवळ १५ सेकंदांचा असा हा व्हिडियो आहे. पण या व्हिडियोमुळे आपण एवढा वेळ हसतो आणि हा व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहतो की काय विचारू नका. चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडियो विषयी.

हा व्हिडियो एका अतिशय लहान बाळाचा आहे. जेमतेम चालू आणि धावू शकेल या वयाचं हे बाळ दिसून येतं. व्हिडियो सूरु होतो तेव्हा एका प्रसिद्ध गाण्याचे बोल आपल्या कानावर पडत असतात आणि हे बाळ समोरच उभं असतं. कृणाल म्युझिक यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘कुरळे कुरळे, काळे काळे बाल’ हे ते लोकप्रिय गाणं आपण ऐकत असतो.

आता १५ सेकंदात जास्त गाणं कुठे ऐकायला मिळणार. पण या एवढ्या कमी वेळात ही हे बाळ धमाल आणत म्हणजे विचार करा. सुरुवातीला या गाण्याच्या बोलांतून, गाण्यातील नायिकेचं वर्णन आहे. मग तिचे केस कसे कुरळे आहेत, काळेभोर आहेत हे सगळं वर्णन आहे. हे बाळ मस्त नाचत या शब्दांवर डान्स करतं. मग अजून मजा येते जेव्हा नायिका कशी मुरडत चालते हे दाखवण्याची वेळ येते तेव्हा. बरं ही स्टेप अगदी त्याच ओळीच्या वेळी होते म्हणून एकदम चपखल वाटते आणि आवडून जाते. पण म्हणून एवढ्यावरच सगळं संपत नाही. या व्हिडियोची खरी मजा पुढील वाक्यांमध्ये आहे. पुढील वाक्य हे दर्शवतात की नायिका, या गाण्यातील नायकाला सोडून गेली आहे. त्यावेळी अगदी टायमिंगवर हे बाळ जी काही अदाकारी दाखवत त्यामुळे आपण हसून हसून वेडे होतो. ‘मला सोडून गेली गो’ या वाक्यावर दाराजवळ जात हात हलवत नायिका सोडून गेल्याचा अभिनय हे बाळ करत. मग ‘लावलं धंद्याला’ या वाक्याचा वेळी अगदी टायमिंग ने हे बाळ हात जोडतं आणि आपण मोठ्याने हसायला लागतो. हीच अवस्था तिथे बसलेल्या एका दादांची असते. इतके की हसता हसता पार पाय वर करत उलटेच होतात बहुतेक. अगदी पूर्णपणे गदगदून हसत असतात.

इथे बाळ पण या गाण्याची मजा घेत असत. अर्थात त्या छोट्या जीवाला त्या गाण्याचा अर्थ काय कळणार म्हणा. पण म्हणूनच हा व्हिडियो बघताना मजा येते. कारण कळत काही नसलं तरी अभिनय एकदम चोख असतो या बाळाचा. बघायला गेलं तर दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडियो आहे. पण बाळाची अदाकारी इतकी मस्त आहे की आजही आपल्या चेहऱ्यावर सहज हसू उमटवून जाते. हीच जादू या लहान मुलांच्या निरागसपणाची असते जी कालातीत टिकून राहते. पण मोठं झाल्यावर मात्र दुनियेच्या रहाट गडग्यात कुठे हरवून जाते ते कळत नाही. असो.

आपण हा व्हिडियो बघितला असेल तर उत्तमच. नसेल बघितला तर आवर्जून बघा. कारण यासारख निरागस मनोरंजन फार कमी वेळेस अनुभवायला मिळतं. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे ही आम्हाला कमेंट्स मधून सांगा. काय आहे ना मंडळी, आपण कमेंट्स मधून जे प्रोत्साहन देता, त्यातून नवनव्या मनोरंजक विषयांवर लिखाण करायला ऊर्जा मिळते. तसेच आपण ज्या सकारात्मक आणि उपयुक्त सूचना करता त्यांचा वापर लेख लिहिताना नकळतपणे होत असतो. एकूणच काय, तर आपला पाठिंबा आणि प्रोत्साहन आम्हाला फार महत्वाचं आहे आणि ते यापुढेही मिळत राहील हे नक्की. आणि बरं का, जाता जाता, हा लेख पण नक्की शेअर करा. तेवढाच या व्हिडियोचा आनंद तुम्ही इतरांनाही देऊ शकाल. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.