Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाचा दहीहंडी प्रॅक्टिस दरम्यानचा डान्सचा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का, होतोय प्रचंड वायरल

ह्या मुलाचा दहीहंडी प्रॅक्टिस दरम्यानचा डान्सचा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का, होतोय प्रचंड वायरल

एव्हाना आपण या वर्षीच्या श्रावण महिन्यात पदार्पण केलेलं आहे. श्रावण महिना म्हणजे सणांची रेलचेल. त्यात अगदी नागपंचमी पासून सुरुवात होत होत पुढे सणांची मांदियाळी बघायला मिळते. यातील एक अतिशय लोकप्रिय असा सण म्हणजे गोकुळाष्टमी. या सणांचं महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. तसेच आपण किती उत्साहात हा सण साजरा करत असू याची वेगळी कल्पना द्यायची गरज नाही. हा उत्साह आबाल वृद्धांपासून सगळ्या वयोगटात दिसून येत असतो. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडियो आपल्या टीमच्या हाती लागला. हा व्हिडियो जुना असेल असं वाटतं. पण त्यातून मिळणारा आनंद आजही मन प्रसन्न करून जातो. हा व्हिडियो आहे एका लहान मुलाचा. व्हिडियो सूरु होतो तेव्हा हा मुलगा एके ठिकाणी उभा असतो. सोबत एक ताई आणि या मुलाच्या समवयस्क मुलगा उभा असतो.

एव्हाना आपल्या कानावर आपल्या आवडीचं गाणं पडायला लागलेलं असतं. हमाल दे धमाल चित्रपटातलं ‘पिंट्या दादा गेला…. गोविंदा आला रे आला’ हे ते गाणं. दहीकाला उत्सवातील हे अतिशय लोकप्रिय असं गाणं. जेव्हा प्रत्येक गोविंदा पथक एकावर एक थर रचत असतात तेव्हा हे गाणं ऐकण्याची मजा काही औरच. याचीच मजा हा छोटा मुलगा घेत असतो. गाणं पुढे पुढे सरकत जातं, तसं तसा त्यातील उत्साह वाढत जातो. त्याच्या देहबोलीतून हा उत्साह स्पष्टपणे झळकत राहतो. त्याच्या सोबत असलेलं दुसरं बाळ मात्र अगदी देवासारखा शांत असतो. या दोघांची ही जोडी आगळी वेगळी पण लक्षात राहते. सोबत असलेल्या ताई सुद्धा या क्षणांची मजा घेत असतात. एकदा त्या गंमतीने मजा मस्ती करणाऱ्या मुलाला शांत राहायला सांगतात. पण तो आपला मस्त मजा घेत असतो. त्याच्या उत्साहाचा झरा वाहतच असतो. अगदी अखंड. त्याचा उत्साह आणि आनंद बघून आपल्याला ही आनंद होतोच.

तसेच या सणातील आपल्या गतकाळातील आठवणी जाग्या होतात. आपण त्या आठवणींच्या मिठीत काही क्षण विसावतो आणि पुन्हा काही वेळाने आपल्या नेहमीच्या कामांना लागतो. पण यावेळी आपल्या मनात या व्हिडियो मुळे एकप्रकारची प्रसन्नता आलेली असते. त्यामुळेच कदाचित हा लोकप्रिय व्हिडियो ठरतो. ह्या व्हिडिओमध्ये नाचत असलेल्या ह्या गोड चिमुकल्याचा नाव आरव चीलिवेरी असून तो मुंबईतील प्रभादेवी येथे राहतो. आपल्या टीमला हा व्हिडियो आवडला. तसेच आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास, आपल्याला ही आवडला असेलच.

सोबतच आपल्या टीमने याविषयी लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या वाचकांना डोळ्यासमोर ठेऊन आपली टीम नेहमीच विविध विषयांवर लिखाण करत असते. येत्या काळातही हा सिलसिला सुरूच राहील याची खात्री बाळगावी. त्याचप्रमाणे आपला आमच्या टीमवरचा लोभ ही कायम असू द्या. लेख वाचत राहा, शेअर करत राहा !! धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *