Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाचा पाढे म्हणतानाचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या मुलाचा पाढे म्हणतानाचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

लहान मुलांची एक भारी खासियत असते, ते मोठ्यांची नक्कल एकदम सहज आणि अप्रतिम पध्दतीने करतात. अशीच नक्कल करण्याच्या भानगडीत ‘जाने मेरी जानेमन, बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे’ म्हणणारा एक लहान पोरगा थेट इंडियन आयडॉल मध्ये जाऊन बसला आहे. प्रादेशिक आणि गावाकडच्या शैलीत असणारे एक गाणं गाऊन आणि बेसिकली गाण्याची नक्कल करून हा पोरगा स्टार झाला. पण पोरं भलतीच करामती असतात. काही गोष्टी त्यांना येत नसतील तरीही ते ‘जमतं मला, येत मला’ असं म्हणतील. आणि एखादी गोष्ट जमत असेल तरीही जमत नाही म्हणतील. असंच असतं लहान पोरांचं… एखादी त्यांच्यात असलेली कला आपल्याला दिवसभर करून दाखवतील आणि जरा कुठं पाहुण्यांसमोर कर म्हटलं कि, लाजतील नाहीतर जमत नाही म्हणतील. आजचा व्हिडीओही अशाच काही स्टाईलचा आहे. हा व्हिडीओ बघून बघून लोक हसले, पोट दुखेपर्यंत हसले. आता हा व्हिडीओ नेमका काय आहे? कशाविषयी आहे? हे तुम्हाला व्हिडीओ बघून कळेलच.

या व्हिडीओत जी मज्जा आहे ना… ही मजा तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल. तर तुम्हाला माहितीच असेल की, लहान मुलं शाळेत गेल्यावर सगळ्यात आधी आकडे आणि बाराखडी म्हणायला शिकतात. मग त्यात त्यांना 1-2 म्हणायला लावले तर त्यात ते एवढं उलट-पलट करतात कि, शाळेचा मास्तर कायमची शाळा सोडून जाईल. आमच्या वेळेस चुकलं तर मास्तर एवढं दणके द्यायचा कि, हात काळे-निळे व्हायचे आणि नको तो भाग लालेलाल व्हायचा. पण बाराखडी, 1 ते 100 आकडे आणि 20 पर्यंत पाढे आमचे नक्कीच पाठ व्हायचे. वरून आमच्या घरचे शाळेत जाऊन सांगायचे. चुकलं तर अजून फटके द्या. आता मात्र मास्तर लोकांना ती सोय राहिली नाही. पोरांना खवळलं तरी पालक थेट शाळेत येतेत आणि घोडा लावून मोकळे व्हतेत. आता शिकवायची नेमकी कोणती पद्धत चांगली, हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन… मात्र काहीही असो शाळेत जी मजा येते ती कुठंच येत नाही.

शाळेत मजा केली नसेल असा माणूस तुम्हाला शोधूनही भेटणार नाही. किंवा कुणाचं तरी चुकल्यावर सारा वर्ग खळखळून हसायचा. त्यातही एकदम भन्नाट मजा होती. आता हा मनोरंजन करणारा व्हिडीओ बघण्याआधी तुम्हाला एक भारी किस्सा सांगतो… आमच्या शेजारी एक लै अतरंगी पोरगा राहतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, हे खरं आहे, हे या पोराकडं बघून ठामपणे लक्षात येतं. हा पोरगा एकदा घरच्यांसोबत प्रवासाला गेला. गाडीत 7-8 लोक होते. गाडीतील एका महिलेला सारख्या उलट्या होत होत्या. 2-3 वेला तिने गाडी थांबवली. तिच्या उलट्या बंद झाल्या ती झोपली. अचानक हे बारकं ‘मला उलटी आली’ असं म्हणून ओरडायला लागलं. याचा कर्कश स्वर ऐकून ड्रायव्हरने गाडी थांबवली. झोपलेले जागे झाले. याच्या आईने घाईघाईने याला खाली उतरवले. मग हे बारीक पोरगं म्हणलं… कशी करायची उलटी?… म्हणजे त्याने सगळ्यांना येड्यात काढलं… तर अशीच गंमत या व्हायरल व्हिडीओतील पोराने केली आहे. या मुलाने या व्हिडीओत इतकं भारी मनोरंजन केलं आहे कि, हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.