Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाचा ‘मोर’ डान्स होतोय खूपच वायरल, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

ह्या मुलाचा ‘मोर’ डान्स होतोय खूपच वायरल, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

मराठी गप्पाच्या टीमने आपल्या वाचकांसाठी वेळोवेळी नृत्यकुशल अशा कलाकारांविषयीची माहिती नेहमीच वाचनास उपलब्ध करून दिली आहे. तसेच अनेक असेही नृत्यबहाद्दर आहेत, ज्यांच्या नृत्य’कौशल्या’ च्या वायरल व्हिडियोज विषयी आमच्या टीमने वेळोवेळी लिहिलेलं आहे. या वायरल व्हिडियोज नी जी गंमत आपण सगळ्यांनी अनुभवली आहे, तीच अनुभूती आमच्या लेखांतून आपल्याला मिळाली असणार हे नक्की. पण सध्या असा एक व्हिडियो वायरल होतोय जो या सगळ्या वायरल डान्स व्हिडियोज वर कडी करेल. हा व्हिडीओ आहे एका लग्नातला. या लग्नाचा स्थळ, काळ आणि वेळ माहिती नाही. पण या लग्नाच्या वरातीतील वरासोबत आलेल्या एका मुलाने भन्नाट डान्स करून जी धम्माल उडवून दिली आहे की काय विचारू नका. हा वायरल व्हिडियो आहे फक्त ३0 सेकंदांचा.

या संपूर्ण वेळेत एक तरुण आपल्या मित्रासोबत – जो नवरा मुलगा आहे- डान्स करत असतो. बरं यात नवीन ते काय. तर या मुलाने केलेला मोराचा डान्स हा अगदी धमाल उडवणारा असाच आहे. व्हिडियोची सुरुवात होते ती या मुलाच्या पाठमोऱ्या आकृतीने. कदाचित त्याचा हा डान्स त्याच्या मित्रमंडळींमधे प्रसिद्ध असावा. तेव्हा ते त्याला नाचण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असतात. त्यात एक काका व्हिडियोच्या उजव्या बाजूला उत्साहाने कार्यरत असलेले दिसतात. एवढंच नव्हे तर नवरदेवही असतातच आणि सुरू होतो या मुलाचा मोराचा डान्स. आपले दोन्ही हात आपल्या खांद्यांवर मोराच्या पिसाऱ्याची आठवण करून देतील अशा प्रकारे हा तरुण नाचायला लागतो. जणू काही पावसाळा सुरू झालाय आणि मोर रंगात आलाय अशा आवेशात मोर स्वतःच्या अंगात आल्यागत तो नाचायला लागतो. सगळे हसायला लागतात. आपण सुद्धा. बाजूचे काका अजून बाकीच्यांना बाजूला व्हा, असं सांगत असतात पण स्वतः तिथेच राहतात.

तेवढ्यात हा तरुण अचानक पाठी उसळी मारतो ती थेट काकांच्या चपलेवर. काका सावरतात आणि पाठीही सरतात. तेवढ्यात व्हिडियोत नवरदेवाची एन्ट्री होते. मग काय या उत्साही तरुणाला अजून आनंद होतो आणि अजून उत्साहात तो नाचू लागतो. त्याच्या उत्साह, चेहऱ्यावरचे हावभाव, अजूबाजूच्यांचा प्रतिसाद पाहता आपणही हा डान्स बघण्यात गुंग होऊन जातो. काही सेकंदात हा डान्स संपतो खरा पण आपल्या चेहऱ्यावर मात्र हसू कायम राहतं. आपण पुन्हा एकदा पाहायचा म्हणून हा डान्स बघतो. पुन्हा हसतो आणि पुन्हा पाहतो. नकळत आपल्या मित्रांच्या लग्नात आपण किंवा मित्रांनी केलेला नाच आठवतो. आठवणींना उजाळा देत ज्यांच्यासोबत आपण वरातीत नाचलो आहोत, त्यांना मित्रांना हा व्हिडियो आपण शेअर करतो. आपला आनंद द्विगुणीत करतो.

आपल्याला हा लेखही आवडला असेल तर हा लेखही शेअर करण्यास विसरू नका. तुमच्या वाढत्या सहभागामुळे आम्हालाही प्रोत्साहनच मिळतं. या वायरल व्हिडियो वरील लेखासारखेच अनेक लेख आमच्या टीमने लिहिले आहेत. आपण ते लेख वाचण्यासाठी वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध लेख वाचावयास मिळतील. आपला स्नेह असाच द्विगुणित होऊ द्या. शेअर करायला विसरू नका.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *