Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाची कला पाहून तुम्ही सुद्धा मुलाला मनापासून सलाम कराल, बघा हा वायरल व्हिडीओ

ह्या मुलाची कला पाहून तुम्ही सुद्धा मुलाला मनापासून सलाम कराल, बघा हा वायरल व्हिडीओ

मनोरंजन विश्वातले उदयोन्मुख कलाकार आणि वायरल विडीयोज. काही समान धागा आहे का ? विचार केलात तर हो. मराठी गप्पा हा तो समान धागा. कारण या दोन्ही विषयांना केंद्रस्थानी धरून आमच्या टीमने वेगवेगळे लेख लिहिलेले आहेत. पण आज आमच्या टीमला असा एक व्हिडियो सापडला ज्यात मनोरंजन क्षेत्रातील एक उदयोन्मुख कलाकार त्याची कला सादर करताना दिसला आणि त्याच्या विषयी लिहावं असं आमच्या टीमला वाटून गेलं. कारण ह्या उदयोन्मुख कलाकाराची कला म्हणजे लावणी हा नृत्यप्रकार आहे. आत्ता पर्यंत आपण अनेक मुलांना विविध डान्स शोज मध्ये लावणी सादर करताना पाहिलं असेल. पण लावणी या नृत्यप्रकाराला आपलं आयुष्य वाहिलेला मुलगा जो केवळ ही नृत्य बसवतोच असं नाही तर ती उत्तमरीत्या सादर करतो.

 

या कलाकाराचं नाव आहे पवन तटकरे. मूळचा मुंबईचा असणारा पवन हा लोक कलाकारांच्या घराण्यात जन्माला आला. त्याचे आजोबा लोककलाकार होते आणि ते संगीतकार होते, असं एका प्रथितयश वृत्तपत्राने दिलेल्या बातमी वरून कळतं. त्यामुळे आपसूकच पवन याच्यावर लोक कलांचे संस्कार झाले. या लोक कलांतील लावणी हा नृत्यप्रकार पवन यांस मनापासून भावला आणि त्याने या नृत्यप्रकाराची तालीम करण्यास सुरुवात केली. लहान असल्यापासून लावणी प्रति असणारी त्याची आवड आई वडिलांनाही वाढीस लावली. त्यांच्या विषयी विशेष माहिती मिळत नसली तरीही पवन याच्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून तो आपल्या आई वडीलांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना दिसून येतो. यावरून त्याच्या आई वडिलांनी त्याला किती खंबीरपणे पाठींबा दिलेला आहे, हे कळतं. या पाठिंब्याच्या जोरावर शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यात पवन याने आपल्या लाडक्या नृत्यप्रकारावर प्राविण्य मिळवले. तसेच विविध कार्यक्रमातून आपले नृत्य कौशल्य सादरही केले. त्याचं स्वतःचं एक युट्युब चॅनेल आहे. त्या चॅनेल वर गेलं असता आपल्याला त्याच्या नृत्याविष्काराचे अनेक व्हिडियोज पाहायला मिळतात.

यातील सगळ्यात जास्त पाहिलेला व्हिडियो म्हणजे रुपारेल कॉलेज मध्ये सादर केलेला व्हिडियो. तब्बल ६८ लाख लोकांनी हा व्हिडियो पाहिलेला आहे. तसेच लल्लाटी भंडारं या गण्यावरील त्याच्या समूह नृत्याला १४ लाख लोकांनी पाहिलेलं आहे. पवनच्या या चॅनलने नुकताच ५० हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केलेला आहे. त्याला अनेक सेलिब्रिटी सोबतही मंचावर नृत्य करण्याची संधी मिळाली आहे. मागील वर्षी संपन्न झालेल्या मुंबई टाइम्स कार्निव्हल मध्ये पवन याने प्राजक्ता माळी, पूजा सावंत यांच्या सोबत नृत्य सादर केलेलं होतं. या सोहळ्याला गश्मीर महाजनी हा आपला लाडका कलाकारही उपस्थित होता. या सगळ्यांनी पवनचं कौतुक केलं होतं. तसेच या व्हिडियोज मधून पवन याला प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतल्याचं दिसून आलं. त्याच्या परफॉर्मन्स वेळी उपस्थितांनी त्याच्या नावाचा धोशा लावला होता, यावरून त्यांना त्याचं नृत्य किती आवडलं असेल याची खात्री पटते. पवन याच्या युट्युब चॅनेल वरील त्याचे नृत्यप्रकार पाहून त्याने एवढी वर्षे घेतलेली मेहनत पाहणाऱ्यास कळते.

 

तसेच त्याला त्याच्या मेहनातीबद्दल मिळत असलेल्या कौतुकात मराठी गप्पाची टीमही सामील आहे. येत्या काळातही पवन लावणी आणि इतर नृत्य प्रकार सादर करता करता एक आघाडीचा कलाकार म्हणून नावारूपास यावा ही मराठी गप्पाची पवन यांस शुभेच्छा ! आम्ही पवनचा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पाहून घ्या. आपण पवन याची वाटचाल थोडक्यात अनुभवलीत. आपल्याला त्याचा अभिमान वाटत असणार हे नक्की. त्याचप्रमाणे वर काही कलाकारांची नावेही आली आहेत. योगायोगाने आमच्या टीमने त्यांच्या कारकीर्दीवरही प्रकाश टाकणारे लेख लिहिले आहेत. आपणांस ते लेख वाचण्यासाठी सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन त्या त्या कलाकारांची नावे लिहून सर्च केल्यास आपल्याला लेख वाचावयास मिळतील. उदाहरणार्थ : प्राजक्ता माळी असं लिहून सर्च करावे. आपल्या अमूल्य वेळेसाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.