आपला देश भाषण ठोकणाऱ्यांचा देश आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. बोलणारा बडबडत असतो. ऐकणारे ऐकतात किंवा न ऐकतात. कुणी कुणी कानांत बोळे घालून बसतात. बोलणारा प्रत्येकजण वक्ता असतोच असे नाही. तोंड फक्त खाण्यासाठी व वाजवण्यासाठी आहे, अशीच त्याची समजूत असते. म्हणून कुणा तोंडाळाला कुणी वक्ता-प्रवक्ता म्हणत नाही; पण हे त्याच्या गावी नसते. त्याचा पट्टा सुरूच असतो. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ अशा प्रकारचे अनेक वक्ते आपल्याला ढिगाने या अखंड महाराष्ट्रात दिसून येतील. मात्र विचार करून, समाजाला किंवा समोर बसलेल्या लोकांना काय अपेक्षित आहे, त्यावर मुद्देसूद आणि आकर्षक बोलणे, म्हणजे वक्तृत्व होय. चांगले उत्तम वक्ते आपल्याकडे सर्वकाळात होते. अर्थात त्यांची संख्या मोजकीच होती. हापूसच्या झाडाला फळे माफकच असतात पण जेवढी असतात तेवढी मधुर असतात. तसे चांगले वक्ते हे प्रत्येक काळात, पिढीत असतात पण ते मोजकेच असतात. सध्या मात्र लहान मुले एकदम चांगली भाषणे करताना दिसत आहेत.
ही लहान मुले नेमकं आपण कशावर बोलत आहोत, हा मुद्दा समजून उमजून घेऊन आपल्यातील वक्तृत्व कलेला चालना देत आहेत. सध्या अशा लहान मुलांचे व्हिडीओ भरपूर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ आमच्या हाती लागला आणि हा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः काटा आला. या व्हायरल व्हिडीओतील मुलगा ज्या पध्दतीने बोलतो आहे, ज्या मुद्द्यांवर तो बोलतो आहे, ते पाहून आपण चकित होतो.
शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी का ठेवले? शिवाजी या नावाचा अर्थ नेमका काय? शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आणि एकूण जिंकण्यात आई जिजाऊ मातांचा कसा प्रभाव होता, हेही या व्हायरल व्हिडीओत सांगितलं आहे. त्याने मांडलेला एकेक मुद्दा आपल्याला पटण्यासारखा आहे. अवघ्या 2 मिनिटात त्याने जे मन जिंकणार भाषण केले आहे, ते पाहून कुणीही त्याचा व्हिडीओ सहज शेअर करेल. शिवाजी महाराजांच्या आधी शिवाजी नाव जगात कोणाचं नव्हतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आज प्रत्येक धर्मात, जातीत शिवाजी हे नाव ठेवलं जातं. हे आपल्या छत्रपती शिवरायांनी करून दाखवलं आहे, असं या व्हिडीओतील मुलगा सांगतो.
हा मुद्दा तसा 2 ओळींचा आणि छोटा आहे पण यापूर्वी आपल्याला हे माहीती होते का? तर नाही. आपण त्याचा विचार केला होता का? तर नाही. असे अनेक मुद्दे त्याने व्हिडीओत समजून सांगितले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो. महाराष्ट्रातच नाही, भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्, अद्वितीय्, अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे. जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल. अशा या राजाला मानाचा मुजरा..
हा व्हिडीओ तुम्हाला प्रेरणा देईलच पण यशाकडे जाण्यासाठी प्रेरित करेल याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :