Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाचे मावशीसोबत झालेले गोड भांडण होत आहे वायरल, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

ह्या मुलाचे मावशीसोबत झालेले गोड भांडण होत आहे वायरल, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

हल्लीची नवीन पिढी म्हणजे ही लहान मुलं किती तरी ऍडव्हान्स आहेत, हे आपण नेहमीच ऐकत असतो. खासकरून आज्जी आजोबांच्या तोंडून आणि या मुलांच्या पालकांकडून सुद्धा. अनेक वेळेस आपल्यालाही याचा अनुभव येतोच. असाच काहीसा अनुभव देणारा एक व्हिडिओ आमच्या टीमला गवसला आणि आजचा हा लेख त्याच व्हिडियो वर आधारित आहे. या व्हिडियोत एक लहानगा आपल्या नातेवाईकांच्या घरी आला आहे, असं दिसतं. पण आता नातेवाईकांकडे आला तर त्याला ‘बोलतं’ केल्याशिवाय सोडतील ते नातेवाईक कसले. ते मग त्याची मस्करी करायला सुरू करतात. यात आघाडीवर असतात एक ताई. या लहानग्याला उद्देशून त्यांची मस्करी चालू असते ती राहत्या घराबाबत आणि त्याचे वडील कोण आहेत त्याबाबत. हे घर कोणाचं हे पटवून देण्याची चढाओढच या दोघांमध्ये लागलेली असते.

बरं या ताई आणि या छोट्याच्या मस्करीत पाठीमागून एक मुलगा एकदा सामील होण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. पण या छोट्याकडून त्याला एकंच पण दणक्यात उत्तर मिळतं – तू निघ. पुढच्या वेळेस तर तो काही करतही नाही, पण या लहानग्याच्या केवळ नजरेस पडतो. मग पुन्हा तेच उत्तर मिळतं. दोन्ही वेळेस उपस्थितांमध्ये हशा पिकतो. आधीच एवढं धडाधड बोलणाऱ्या त्या लहानग्याचं उपस्थितांना कौतुक वाटतं असताना या दोन वाक्यांनी हास्यस्फो’ट होतो. पुन्हा या दोघांची जु’गलबंदी सुरू होते. कोणीही मागे हटत नाही. दोघेही तेवढ्याच हट्टाने आपले मुद्दे मांडत असतात. पण शेवटी मात्र एका क्षणी या मुलाला त्या ताईंच्या एका वाक्याला काही उत्तर द्यावं कळत नाही. त्याला ज्यांनी उचलून घेतलेलं असतं, त्यांचं नाव विचारतात. त्याला ते नाव आठवत नाही आणि सवयीने तो बोलून जातो – दादा. आपण चुकीचं उत्तर दिलं आहे, हे त्याला समजतं आणि तो दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतो आणि या लुटुपुटूच्या वादावर एकदाचा पडदा पडतो. यात सहभागी असे अनेक जण असतात.

मग ते या लहानग्याला पकडून उभे असलेले दादा असू देत किंवा त्यांच्या पाठीमागून बोलणारा तो दोस्त किंवा त्या लहानग्याला खाली ठेवा अशा सूचना देणाऱ्या पण कॅमेऱ्यात न दिसणाऱ्या काकू. पण संपूर्ण व्हिडियोच्या केंद्रस्थानी मात्र हा लहानगा आणि त्या ताईच असतात. ही लुटुपुटूची लढाई संपल्यावर मात्र आपल्यालाही हसू आवरत नाही. त्यात हा मुलगा कितीही त्वेषाने सामील झाला तरी त्याचं कट्टी घेणं, हातवारे करणं आणि शेवटी हातांनी चेहरा झाकून टाकणं यांमुळे त्याचा निरागसपणा दिसून येतो.

आपल्याला हा लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आमची टीम ही अतिशय मेहनतीने व्हिडियोज शोधून काढते आणि त्याविषयी लेख लिहिते. तुम्ही हे लेख शेअर केल्याने आम्हालाही प्रोत्साहन मिळतं. तेव्हा तुमचं आमच्या प्रति असलेलं हे प्रोत्साहन यापुढेही मिळत राहू दे. आपल्या पाठींब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *