Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाचे हे अजब टॅलेंट पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा ३० सेकंदाचा व्हिडीओ

ह्या मुलाचे हे अजब टॅलेंट पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा ३० सेकंदाचा व्हिडीओ

सध्या आपल्याकडे पॅरालिंपिक खेळांची चर्चा अगदी जोरात आहे. याचं कारणही तेवढं सबळ आहे. भारतीय खेळाडूंनी करून दाखवलेली दमदार कामगिरी हे त्याचं कारण आहे. त्या आधी यावर्षी समर ऑलिम्पिक झाले त्यातही भारतीय खेळाडूंनी जी चमकदार कामगिरी करून दाखवली त्याबद्दल आपल्याला माहिती आहेच. त्याबद्दल त्यांचं कौतुकही आपण केलंच असेल. त्यामुळे असं म्हणू शकतो की एरवी क्रिकेट वगळता इतर खेळांमध्ये आणि खासकरून जिम्नॅस्टिक प्रकारात काहीसा पाठी असणारा भारताचा क्रमांक आता पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारांमध्ये जशी शरीराची लवचिकता महत्वाची असते तसेच त्यातील काही क्रीडा प्रकारात तुम्ही त्या खेळाचे कसे सादरीकरण करता हे सुद्धा महत्वाचे ठरते. त्यातील एक उदाहरण म्हणजे जम्पिंग रोप ज्याला आपण साध्या भाषेत दोरीच्या उड्या म्हणतो. खरं तर हा काही बहुचर्चित असा क्रीडाप्रकार नाही. पण गेल्या काही दिवसांत मात्र या क्रीडा प्रकारची खूप चर्चा होते आहे. याच कारण आहे नुकताच वायरल झालेला एक व्हिडियो.

हा व्हिडियो आहे विशाल पाठक याचा. हा तरुण जिम्नॅस्ट गेल्या काही वर्षांपासून जिम्नॅस्टिक आणि जम्पिंग रोप या क्रीडा प्रकाराशी निगडित आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून तो सातत्याने या खेळात तो करत असलेली प्रगती शेअर करत असतो. त्यातही जम्पिंग रोप या प्रकारातील त्याचे व्हिडियोज तर जबरदस्त प्रसिद्ध होताना दिसतात. तसे ते आधीही व्हायचे. पण त्याने ८ ऑगस्ट ला पोस्ट केलेल्या एका व्हिडियोने मात्र त्याला रातोरात स्टार बनवले आहे. हे वाक्य खोटं नाही. कारण हा लेख लिहीत असताना म्हणजे केवळ एका महिन्यात त्याच्या फॉलोवर्सची संख्या काही शेकड्यांतून ५० हजारांच्या पलीकडे गेली आहे. म्हणजे काही दिवस तर लागोपाठ असे गेले आहेत जेथे काही हजारांच्या वर फॉलोवर्स वाढताना दिसतात. अर्थात हे एका रात्रीतलं यश नक्कीच नाही. त्यासाठी त्याने केलेल्या अथक परिश्रमांचा यात खूप मोठा वाटा आहे. पण एक मात्र खरं की त्याने ८ ऑगस्ट ला पोस्ट केलेला व्हिडियो ‘अफलातून’ म्हणावा असाच आहे. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा विशाल एका प्रसिद्ध ठिकाणी उभा असतो. प्रसिद्ध यासाठी कारण आजूबाजूला बरेच जण फेरफटका मारायला आलेले दिसून येतात.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा विशाल एक अगदी साध्या प्रकारचा खेळ करून दाखवतो. मग काहीसं स्टायलिश सादरीकरण ही करून दाखवतो. त्यात एका हाताने त्या दोरीचा वापर करत केलेलं सादरीकरण खास वाटून जातं. व्हिडियो संपल्यावर ही ते लक्षात राहतं. या सादरीकरणामुळे, हा एकदम हुशार पोरगा आहे हे कळून येतंच. मग त्याचे एकेक स्टेप्स बघणं म्हणजे पर्वणी वाटते. त्यात जागच्या जागी पण काहीसं हटके उड्या मारणं आवडून जातं. त्यात हातांवर स्वतःला सांभाळत केलेल्या स्टेप्स ही धमाल वाटतात. अस असलं तरी एक स्टेप तर अजून बाकी असते. त्याआधी पुन्हा एका हाताने त्या दोरीचे तो कर्तब करून दाखवतो आणि मग उलटी उडी मारत शेवटच्या स्टेप कडे वळतो. ही शेवटची स्टेप म्हणजे एका हाताने दोरी फिरवत आणि बसून उड्या मारणं. बरं या बसक्या उडया मारणं दिसतं तेवढं सोप्पं नक्कीच नाही. त्यात थेट सिमेंट्च्या टाईल्सवर हा प्रकार करणे म्हणजे त्रासदायक. पण विशाल त्यात एवढा गुंगून गेलेला असतो की त्याच्या चेहऱ्यावर सतत हसू असतं.

या संपूर्ण व्हिडियोत त्याचा हा हसरा चेहरा अजून प्रसन्नता आणतो. तसेच तो जे करत असतो त्याचा तो मनमुराद आनंद घेत असल्याने आपणही हा व्हिडियो अगदी आनंदाने बघतो. केवळ ३० सेकंदांचा हा व्हिडियो आनंद देऊन जातो. त्यात एखाद्या उदयोन्मुख खेळाडूला त्याचा खेळ एखादया कलेसारखा सादर करताना बघणं ही पर्वणी असते कारण अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी यावेळी हमखास बघायला मिळतात. हा व्हिडियो याचे उत्तम उदाहरण. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला आवडला असणारच. सोबतच आपल्या टीमने या विषयावर लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार हे नक्की. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा. तसेच आपल्या काही सकारात्मक सूचना असतील तर त्याही कळवा. या दोहोंचा वापर करून आम्ही अजून उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस आणत राहू हे नक्की. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.