Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाच्या अ’जब करामती पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल, बघा हा वायरल व्हिडीओ

ह्या मुलाच्या अ’जब करामती पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल, बघा हा वायरल व्हिडीओ

मित्र एकत्र आले की बाकी कामं होवोत न होवोत, पण अतरंगी किस्से आणि फर्माईशी होतातच होतात. त्यात आपल्यातला एखादा मित्र अतरंगीपणाचा कळस असेल, तर विचारू नका. त्यात हा मित्र अतिशय लवचिक शरीरयष्टी असलेला असेल तर? मग काय, मित्रांची करमणूक ठरलेली. अशीच काहीशी करमणूक आफ्रिकेतील एका भागात होत होती. मित्र एकत्र जमले होते. वेळ होता आणि त्यात एक मित्र म्हणजे हा’डांचा सापळाच जणू. पण केवळ हा’डांची काडं नाहीत. तर तेवढाच लवचिकपणा असलेलं शरीर त्याला लाभलं. याचाच वापर करत त्याने केलेल्या करामती दाखवणारा हा व्हिडियो. या व्हिडियोत काय करून दाखवतो हा माणूस म्हणून बघायला जातो तर ह्या भावाने त्याचा उजवा पाय एकदम दुमडलेला असतो. बरं केवळ दुमडलेला पाय धरून न राहता त्याची हालचाल हा पठ्ठ्या करत असतो. एवढा पाय दुमडणे यामुळे इजा होऊ शकते.

याला कसं काय जमत असेल असा विचार मनात येई पर्यंत त्याने दुसऱ्या करामती करायला सुरुवात केलेली असते. त्यात दोन्ही हातांची कोपरं एकमेकांवर आपटून दाखवणं येतं, त्यात स्वतःलाच पाठमोरी मि’ठी मा’रणं ही येतं. त्याची लवचिकता बघून थक्क व्हायला होतं. पण ही तर फक्त सुरुवात असते. तो पाठमोरा होत स्वतःच स्वतःची पाठ थोपटतो, शर्ट वर खेचतो आणि अगदी स्वतःच्या कु’ल्यावरच एक हलकी चा’पट ही मारतो. एव्हाना त्याच्या आजूबाजूला जमलेल्यानं मजा यायला लागलेली असते. त्यात मित्र असले की थोडक्यात सोडतात होय. मग अजून फर्माईशी येतात. आफ्रिकन भाषेमुळे आपल्याला संवाद कळत नसला तरीही या माणसाच्या देहबोलीतून आणि करामतीतून अंदाज लावता येतो. वर उल्लेख केलेल्या कारामतीं नंतर येते ती व्यायामप्रकारांची आठवण करून देणारी करामत. यात हातांची सांगड घालून संपूर्ण शरीर वापरत ही करामत केलेली असते. आपण अगदी थक्कच झालेलो असतो. पण अजूनही सगळ्यात भाव खाऊन जाणाऱ्या करामती शिल्लक असतात.

त्यात हा आफ्रिकन भाऊ आपल्या डाव्या हाताला संपूर्ण मागे सारत आपल्याला उजव्या हाताची दिशा दाखवत असतो. नंतर तो त्याच्या उजव्या पायातील शूज काढून ठेवतो आणि त्यावर बसतो. आता पायांची करामत दाखवणार बहुतेक असं आपल्या मनात येतं आणि ते खरंही असतं. बसल्या बसल्या आपला उजवा पाय पाठीमागे नेत आपल्या डोईवरची टोपी काढून दाखवण्याची करामत हा पठ्ठा करतो. त्यात अजून एक म्हणजे त्याच पायावर हात टेकवून आरामात बसल्याचा अभिनय ही करतो. या संपूर्ण व्हिडियोत त्याच्या विनोदी बुद्धीने रंग भरतात हे खरं. असा हा व्हिडियो मात्र एव्हाना संपायला आलेला असतो. या व्हिडियो चा शेवटही अगदी तसाच उत्तम होतो. कारण आपल्या पाठी घेतलेल्या पायाला दुसऱ्या पायाची जोड देत आणि त्यातून आपले दोन्ही हात पुढे घेत हा माणूस उभा राहतो. पायात शूज घालतो आणि तोपर्यंत व्हिडियो ही संपलेला असतो. या संपूर्ण व्हिडियोमध्ये या माणसाची लवचिकता लक्ष वेधून घेते आणि सोबतच त्याची विनोदी वृत्ती.

तसेच सादरीकरण करण्याची असलेली सवय किंवा आवड ही दिसून येते. एकूणच हा व्हिडियो आपल्याला आनंद देऊन जातो. सध्याच्या काळात काही क्षण का होईना पण विश्रांतीचे आणि आनंदाचे जावेत ही आपल्या प्रत्येकाचीच अपेक्षा आहे. एवढं दडपण आपल्याला येतं.

पण याच दडपणातून आपल्याला बाहेर काढून आनंद देण्याचं काम मराठी गप्पाची टीम करत असते. किंबहुना आमचं ते एक उद्दिष्ट आहे. या आमच्या उद्दिष्टाला आपणही भरघोस प्रतिसाद देत असता. त्याबद्दल धन्यवाद. आपला लोभ या पुढेही असाच कायम राहावा ही सदिच्छा. त्याचसोबत आपण या व्हिडियोत दाखवलेल्या किंवा लेखात वर्णन केलेल्या करामती करू नयेत, त्यामुळे आपल्याला शारीरिक इ’जा होऊ शकते हे लक्षात घ्यावे. तेव्हा केवळ मनोरंजन म्हणून व्हिडियो आणि लेख यांचा आनंद घ्यावा ही विनंती !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *