Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाच्या आवाजातील जा’दू पाहून तुम्हीदेखील मं’त्रमुग्ध व्हाल, बघा हा व्हिडीओ

ह्या मुलाच्या आवाजातील जा’दू पाहून तुम्हीदेखील मं’त्रमुग्ध व्हाल, बघा हा व्हिडीओ

इंटरनेट आल्यापासून आपल्या जीवनात कित्येक सकारात्मक बदल झाले आहेत आणि होत आहेत, हे आपण पाहतो आहोतच. खासकरून तळागाळातील अनेक कलाकार यामुळे पुढे आलेले आपल्याला दिसून येतात. एरवी जगभर कीर्ती आणि प्रसिद्धी मिळवणं हे दिवास्वप्न वाटू शकणाऱ्या या होतकरू तरुणांना इंटरनेटच्या माध्यमातून आपली कला जगभरात पोहोचवता आली आहे. मागील आठवड्यात आमच्या टीमने लिहीलेला एक लेख आपण वाचला असेलंच. एका ग’रीब पण हो’तकरू मुलाचा डान्स व्हिडियो वायरल झाल्यावर त्याला एका रियालिटी शो मध्ये कसा प्रवेश मिळाला या बद्दल हा लेख होता. या बाल कलाकाराप्रमाणेच अजून एका तरुण कलाकाराचा वायरल व्हिडियो आमच्या टीमच्या नजरेस पडला. हा व्हिडिओ तीन वर्षांपुर्वीचा आहे. पण या तरुण गायकाचं आर्त आवाजातील गाणं आजही तितकंच ताजंतवानं वाटतं. त्याच्या आवाजात असलेली प्रचंड ऊर्जा आमच्या टीमला प्रचंड आवडली आणि हा लेख लिहावा असं ठरलं.

पण केवळ व्हिडियो विषयी लिहावं म्हंटलं तर यात पूर्ण वेळ हा गुणी कलाकार आपली कला सादर करत असतो. त्यात इतर कोणीही सामील होत नाही. त्याला साथ द्यायला असते ती केवळ त्याच्या आर्त स्वरांची. त्यामुळे त्याच्या पाठून येणाऱ्या कर्कश हॉर्नचा आवाजही काही वेळ जाणवत नाही. एवढ्या ताकदीने ‘लख्ख पडला प्रकाश दिवट्या म’शालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा’ हे उर्जावान गाणं गायलेला हा गायक कोण याविषयी आमच्या टीमची उत्सुकता ताणली गेली. मग त्याच्या बाबत काहीशी माहिती मिळाली. या उदयोन्मुख तडफदार गायकाचं नाव अमित धुमाळ. अमित हा मूळचा पंढरपूर येथील रहिवासी. त्याच्या घरी त्याची आई आणि भावंडं असतात असं त्याच्या एका मुलाखतीतून कळतं. तसेच त्याचे वडील अकाली गेल्याचं कळतं आणि आपल्याला नकळत दु’ख्ख वाटून जातं. त्याच्या विषयी थोडीशी माहिती मिळते आणि सोबत त्याची गाण्याप्रती असलेली आवड कळून येते. युट्यु’ब वर स’र्च केलं असता त्याने गायलेली गाणी आपल्या समोर येतात.

नवनाथ धुमाळ यांच्या युट्युब वाहिनीवरून तर त्याने गायलेल्या ‘वाजत वाजत आला गणराय’ या नवीन गाण्याची झलकही आपल्याला ऐकायला मिळते. याच युट्युब चॅनेलवर त्याचा गाणं रेकॉर्ड करण्याच्या व्हिडियो असल्याचं जाणवतं. तसेच इतर चॅनेल पैकी एके ठिकाणी त्याचा रंगमंचावर लाईव्ह ऑडियन्स समोर गाणं म्हणण्याचा व्हिडियो ही दिसून येतो. यात महत्वाची बाब अशी की प्रत्येक ठिकाणी तो तितक्याच तन्मयतेने गाणं सादर करताना दिसतो. एरवी मुलाखतीत जेवढ्यास तेवढं बोलणारा हा कलाकार गाणं गाताना मात्र पूर्ण जीव ओतून आपली कला सादर करतो. त्याचा या वृत्तीचं कौतुक करावं तेवढं थोडं. प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःची कला जपणाऱ्या या कलाकारास आपल्या मराठी गप्पाच्या टिमकडून पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

आपल्याला हा लेख आवडला असेलंच, तेव्हा हा लेख शेअर करायला विसरू नका. तसेच अशा अनेक उभारत्या तसेच अनेक अनुभवी कलाकारांविषयी सुद्धा आमच्या टीमने वेळोवेळी लिखाण केलेलं आहे. आपण ते लेख आमच्या वे’बसाई’टवर वाचू शकता. त्यासाठी वे’बसाई’टवरील स’र्च ऑप्शन वापरा. त्यात जाऊन मालिका, सिनेमा, चित्रपट, नाटक, एकांकिका असं टाइप करून स’र्च करा. तुम्हाला आवडणारे असंख्य लेख वाचनासाठी उपलब्ध होतील. आपल्या नियमित पाठिंब्यासाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.