Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाच्या डान्सपुढे भले भले डान्सर्स सुद्धा ठरले फेल… बघा हा भन्नाट परफॉर्मन्स

ह्या मुलाच्या डान्सपुढे भले भले डान्सर्स सुद्धा ठरले फेल… बघा हा भन्नाट परफॉर्मन्स

माणसाच्या आयुष्यात काही असो व नसो पण 2 गोष्टी पाहिजेच. पहिली गोष्ट म्हणजे कसला न कसला छंद आणि दुसरी गोष्ट म्हणजे ‘कंड’ पाहिजे. ‘कंड’ हा गावाकडचा म्हणजेच अस्सल ग्रामीण, गावरान आणि गावठी भाषेतील शब्द आहे. या शब्दाचा शहरी भाषेत किडा असा अर्थ होतो. म्हणजेच आपण बऱ्याचदा म्हणतो असतो, त्याच्या अंगात लै किडे आहेत. अमूकच्या अंगात लै रेहमानी किडे आहेत. नाहीतर सुलतानी किडे आहेत.

आयुष्य सगळेच लोक जगत असतात पण छंद किंवा अंगात कंड असलेले लोक खऱ्या अर्थाने वेगळे आणि मनसोक्त आयुष्य जगतात. आता आम्हाला हे सगळं लिहिण्याचा प्रपंच सुचला तो एका डान्स व्हिडिओमुळे. खरं पाहिलं तर हा व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत अनेकांच्या स्टेटसला, स्टोरीला आणि इतर टाईमलाईनला पाहिला असेल. पण निसतं व्हिडीओ बघण्यात मजा नसतीय ओ शेठ… जरा खोलात जाऊन आपल्याला त्या व्हिडीओमागचा कंड बी समजला पाहिजे. आधी हा व्हिडीओ काय आहे? का व्हायरल झाला? या दोन्ही गोष्टी आधी समजून घेऊ.

तर हा व्हिडीओ एका मुलाचा आहे. ज्यात तो सध्या फेमस झालेल्या अमृता खानविलकर हिच्या ‘चंद्रा’ या लावणीवर डान्स करत आहे. आता लावणी म्हटलं की अवघा महाराष्ट्र येड्यागत गार होतो आणि उसळूनही येतो. आता ही ‘चंद्रा’ लावणी महाराष्ट्रातील पब्लिकने एवढी डोक्यावर घेतली आहे की तब्बल 2 कोटी विव्हज युट्युबवर मिळाले आहेत. तर आता ही लावणी लग्नापासून तर वरातीपर्यंत सगळीकडे वाजत आहे. अशाच एका ठिकाणी एक जाडजूड आणि काळासावळा पोरगा आला आणि तो करत असलेला डान्स बघून सगळे हैराण झाले. सेम टू सेम अमृता खानविलकर सारखा डान्स तो या लावणीवर करत होता. एकदम भारी डान्स केला त्याने… तर हा होता व्हिडीओ.

आता का व्हायरल झाला ते समजून घेऊयात. तो ज्या ठिकाणी नाचला तिथं ना कुठलं स्टेज होतं. ना त्याला पाहायला लै मोठं पब्लिक होतं. ना हा पोरगा लै प्रोफेशनल डान्सर आहे. ना याने लै भारी कपडे घातले होते. तरीही हा पोरगा फेमस झाला त्याला एकच कारण ते म्हणजे अंगात असलेला ‘कंड’. हा कंड नावाचा प्रकार जोपर्यंत जिरत नाही तोपर्यंत माणसाला शांती नाही. तुम्ही ऐकलं असेल की, एवढी 100 एकर जमीन होती पण राजकारण करायचा कंड आला आणि आता फक्त 10 एकर राहिली. तर असा हा कंड नावाचा प्रकार भल्याभल्यांना नडला आहे.

पण अंगात असलेल्या कंडामुळे फेमस होण्याचा हा पहिलाच प्रकार आणि पहिलीच घटना आहे. काहीही नसताना या पोराने ज्या पद्धतीने लाजवाब डान्स केला आहे, तो पाहून अमृता पण हैराण झाली असेल. त्याच्या अदा, हावभाव, नाचण्याची आवड, त्यातलं परफेक्शन सगळं काही अफलातून आहे. मस्तपैकी थुलथूलीत ढेरी घेऊन नाचणारा हा पोरगा अनेक वजनदार लोकांचा हिरो बनला आहे. अरे कोण म्हणतं, जाड लोकांना नाचता येत नाही. हा व्हिडीओ बघा.

आता या व्हिडीओमुळे हा पोरगा व्हायरल झाला हे तर नक्कीच पण अजून एक सगळ्यात भारी गोष्ट घडलीय… माहितीये काय… या पोरामुळे आता अनेक जाड लोकांना आपल्या अंगात असलेली सुप्त नाचण्याची कला मनसोक्तपणे दाखवत येईल. आता या हिरो भावाविषयी समजून घेऊ. मिळालेल्या माहितीनुसार ह्या मुलाचे नाव आनंदा कैलास श्रीमंत(गुरव) असून तो रा.शहा ता.सिन्नर जिल्हा.नाशिक येथील आहे. आनंदाने चंद्रा या लावणीवर धरलेला ठेका आता अवघा महाराष्ट्र बघतोय. या व्हिडिओमध्ये आनंदाने बेफाम होऊन भन्नाट डान्स केला आहे. संध्याकाळच्या वेळी सुरू असलेल्या एका कार्यक्रमात त्याने हा डान्स केला आहे.

आता या भावाला अजून व्हायरल होण्यासाठी आणि डान्स क्षेत्रात मोठा होण्यासाठी आमच्या टीम कडून दमदार आणि वजनदार शुभेच्छा!!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.