Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल, बघा हा वायरल व्हिडीओ

ह्या मुलाच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल, बघा हा वायरल व्हिडीओ

व्हिडियोज वायरल व्हावेत आणि आपल्या टीमने त्यांच्या विषयी लिहू नये, असं क्वचितच होत असतं. पण नव्या व्हिडियोजसोबतच जुन्या वायरल व्हिडियोज बद्दल लिहिलेले लेख सुदधा पसंत केले जातात. त्यामुळे आपली टीम नेमाने जुन्या आणि नव्याचा ताळमेळ राखत लिखाण करत असते. या मागची कारणं दोनंच – तुम्ही वाचक म्हणून खुश राहणं आणि आपला मराठी गप्पाचा वाचक परिवार सगळ्या अंगांनी वाढणं. या दोहोंमध्ये आपल्या टीमला यश येतं आहे आणि येत राहील यात शंका नाही. आज आपल्या टीमने एक असा व्हिडियो शोधून काढला आहे जो काही काळापूर्वी चित्रित केला गेला होता आणि मग वायरल ही झाला. केवळ सव्वा दोन मिनिटांचा हा व्हिडियो. पण डान्स आवडणाऱ्या प्रत्येकासाठी आनंद अनुभवण्याची एक नामी संधी. यात एक कॉलेज युवक एका समारंभानिमित्त स्वतःचं डान्स कौशल्य सगळ्यांना दाखवतो.

यासाठी त्याने निवडलेलं गाणं असतं – भोली सी सुरत आंखों मैं मस्ती. शाहरुख खान, करिष्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘दिल तो पागल है’ या गाजलेल्या चित्रपटातलं हे गाणं. पण या गाण्यात त्याने या परफॉर्मन्स साठी काही बदल केलेले असतात. वेस्टर्न पद्धतीने डान्स करत असताना यात काही नवीन बिट्सचा समावेश केलेला असतो, तर काही डायलॉग्ज ही समाविष्ट केलेले असतात. पण यामुळे गाण्याची मजा जात नाही, तर उलट त्यामुळे हा परफॉर्मन्स अजून मनोरंजक होतो. त्यात त्याच्या डान्स स्टेप्स ही भाव खाऊन जातील, अशा असतात. एक मिनिट आणि तीन सेकंद असताना दिसणारी स्टेप तर एकदमच मस्त. त्यानंतर दोन मिनिटं पूर्ण होत असताना त्याने लागोपाठ केलेल्या दोन स्टेप्स खरं तर कठीण पण तेवढ्याच लक्ष वेधून घेणाऱ्या. अपेक्षेप्रमाणे या स्टेप्स लक्ष वेधून घेतात सुद्धा.

पण अजून क्ला’यमॅक्स बाकी असतो. आणि एखादा डान्सर जसा सर्वोत्तम भाग शेवटी सादर करून दाखवतो, तसंच या परफॉर्मन्स मध्येही होतं. शेवटच्या काही क्षणांत हा भाऊ जाऊन पोहोचतो ते थेट प्रेक्षकांमध्ये. कोणतेही कलाकार रंगमंचावरून खाली आले की प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारत असतो. इथेही तसंच होतं. आपला हा भाऊ इथेही प्रेक्षकांना नाराज करत नाही. काही मस्त स्टेप्स करत तो आपला डान्स परफॉर्मन्स संपवतो आणि सोबतच हा व्हिडियो सुद्धा संपतो.

मराठी गप्पाच्या बाबतीत तुम्ही नेहमी पाहिलं असेल की अशा हरहुन्नरी आणि उदयोन्मुख कलाकारांबद्दल आपली टीम आवडीने लिहीत असते. पण या वेळी दुर्दै’वाने या भावाचं नाव किंवा इतर माहिती कळू शकलेली नाही. असो. त्याच्या या डान्स मुळे आपल्या आयुष्यातले काही क्षण का होईना पण आनंदात गेले आणि छान मनोरंजनाचा आस्वाद आपल्याला घेता आला. त्यामुळे हा भाऊ कौतुकास पात्र ठरतो. त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *