टॅलेंट हा सध्या आपल्या आयुष्यातील एक परवलीचा शब्द झाला आहे. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही कला-कौशल्य हे असतेच. त्यात हल्ली सोशल मीडियामुळे हे कौशल्य सर्वदूर पोहोचवता ही येतं. पण एक मात्र खरं की यातील काही निवडक असे असतात ज्यांची कला किंवा त्यांचं एखादं कौशल्य आपल्याला पहिल्याच वेळेत एवढं भावतं की आपण नकळत त्यांचे फॅन बनून जातो. आमची टीम सध्या अशाच एका मुलाच्या गायकीची फॅन झाली आहे. या मुलाचा वायरल झालेला व्हिडियो आमच्या नजरेस पडला आणि त्याच्या आर्त स्वरांनी आम्हाला जिंकून घेतलं. या व्हिडियोतील मुलाचे आर्त स्वर हृदयाला स्पर्शून जातात हे खरं. या व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा हा गायक बालकलाकार आणि त्याचे मित्र एकत्र बसलेले असतात. या मुलाचा सुरेल आवाज ऐकून कॅमेऱ्यामागील व्यक्ती त्याचा एक व्हिडिओ बनवू इच्छिते असं दिसतं.
गाण्यासाठी क्यू मिळाल्यावर हा मुलगा ‘रेडू’ या चित्रपटातलं ‘माझ्या देवाक काळजी रे’ हे गाणं गाण्यास सुरुवात करतो. दोन्ही हातांनी प्लास्टिक टेबल वाजवत ताल धरतो आणि त्यांना सुरेल स्वरांची साथ देत हा बालकलाकार अशी काही गोड सुरुवात करतो की मन प्रसन्न होऊन जातं. अजय गोगावले यांनी गायलेलं हे गीत अतिशय आर्ततेने म्हणत पूर्ण करतो. गाणं गात असताना त्याने दाखवलेल्या समजूतदारपणाचे कौतुक वाटत राहतं. या गाण्या नंतर मग अजय गोगावले यांचं अजून एक सुप्रसिद्ध असं ‘खेळ मांडला’ हे गीत गाण्यास सुरुवात करतो. काही वर्षांपूर्वी आलेला पण आजही मनाला तितकाच भिडणारा चित्रपट म्हणजे नटरंग. या चित्रपटाने इतिहास रचला होताच, तसेच यातील ‘खेळ मांडला’ हे गाणंही लोकप्रिय ठरलं. युट्युब वर आजतागायत या गाण्याला १२ कोटीहुन अधिकांनी अनुभवलं आहे. तर असं हे गीत गाणं म्हणजे काही वेळेस गायकाला टे’न्शन येऊ शकतं. पण हा मुलगा अतिशय समजूतदारपणे आणि एखाद्या व्यवसायिक गायकाला शोभेल या सहजतेने हे गाणं गातो.
हा व्हिडीओ संपला तरीही या मुलाच्या आवाजात अजून काही गीतं ऐकायला मिळाली तर किती बरं होईल, असं वाटत राहतं. पण मग दुधाची तहान ताकावर म्हणून आपण हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघतो आणि ऐकतो. प्रत्येक वेळी त्याचे ते आर्त स्वर कानांना तृप्त करतात. हा व्हिडीओ तसा एक ते दोन वर्षे जुना आहे. पण त्याची गायकी मात्र आजही मन प्रसन्न करून जाते. त्यामुळे या बाल गायकास आमच्या टीमच्या वतीने त्याच्या उत्तम गायकी साठी मानाचा मुजरा. तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!
आपली मराठी गप्पाची टीम।वेळोवेळी उदयोन्मुख कलाकारांवर लेख लिहीत असते. आमच्या परीने त्यांच्यातील टॅलेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे ही आमची प्रामाणिक इच्छा असते. आपलाही पाठिंबा आम्हाला सदैव लाभतोच. हा लेख सोशल मीडियावर शेअर करून आपला पाठींबा असाच कायम ठेवा. तसेच या गुणी कलाकाराला अजून लोकप्रिय होण्यास त्यानिमित्ताने तेवढीच आपापल्या परीने मदत. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :