Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने अनोख्या पद्धतीने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या मुलाने अनोख्या पद्धतीने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

लहान मुलं आणि किस्से यांचं एक अतूट नातं आहे. जिथे जिथे लहान मुलं असतात तिथे तिथे किस्से होतच असतात. याची ठराविक अशी काही कारणे नसली तरीही लहान मुलांचे निरागस वागणं हे एक प्रमुख कारण म्हणता येईल. बरं या निरागस वागण्याला उत्सुकतेची जोड असेल तर अजून धमाल येते. कारण उत्सुक असलेली लहान मुलं बऱ्याच गोष्टींना अनुभव असतात, नवनवीन गोष्टी पटकन शिकत असतात. यातूनच मग त्यांच्यातील विचारांना, वागण्याला खतपाणी मिळत असत. इतकंच काय त्यांच्यातील कलागुणांना वाव ही मिळत असतो.

या सगळ्यांतून त्यांचं जे वागणं आहे ते नेहमीच आपल्या कौतुकाचा विषय बनून राहतं. काही वेळा तर या लहान वयात ही मुलं किती हुशार आहेत आणि आपण किती मठ्ठ होतो यावर ही चर्चा येऊन थांबतात. अगदीच काही नाही तर त्यांच्या वागण्याने तयार झालेलं प्रसन्न वातावरण आपल्याला खुश करून सोडतं. आता तुम्ही म्हणाल हो राव, बरोबर आहे. मुलं घरी असली की हे होतं. पण आज तुम्हाला झालंय काय ? तर काही झालं नाहीये. आम्ही फक्त एक व्हिडियो बघितला आहे. तो अर्थातच एका लहान मुलाचा व्हिडियो आहे हे काही वेगळं सांगायला नको. पण त्या लहान मुलाचं त्या व्हिडियोतील एकूण प्रसन्न वागणं आवडून गेलं. खरं तर वयाने बऱ्यापैकी छोटा आहे. पण स्वभावाने बिनधास्त आहे. अगदी एखाद्या छोट्या रॉकस्टार सारखा आहे. त्याचं वागणं बोलणं ही एखाद्या रॉकस्टार सारखंच वाटतं.

व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा हे छोटे रॉकस्टार आपल्याला त्यांच्या स्टेजवर उभे असलेले दिसून येतात. स्टेज म्हणजे खुर्ची हो ! त्या खुर्चीवर उभे राहून हे छोटे साहेब हातात माईक असल्याचा अभिनय करत असतात. बरं केवळ माईक असल्याचा अभिनय नाही तर त्यातून आपण गात आहोत असं समजून गाणं ही सुरू असतं. बरं हे गाणं ही आपल्या ओळखीचं असतं. त्यामुळे आपणही अगदी लक्ष देऊन ऐकत असतो. ‘बार बार दिन ये आये’ हे ते गाणं असतं. कोणाच्याही वाढदिवशी ऐकायला येऊ शकतं अस हे लोकप्रिय गाणं आहे. थोडं जुनं सुद्धा आहे. पण या मुलाच्या मनात मात्र ते गाणं अगदी ठामपणे ठसल आहे की काय असं वाटायला लागतं. कारण तो गाताना त्यातील शब्दांचा अगदी खुबीने वापर करत आणि हेल काढत गात असतो. वय लहान पण अवलोकन महान असच म्हणावं लागेल. बरं पूर्ण देहीबोली सुद्धा तशीच असते. एखाद्या इव्हेंट मध्ये एखाद्या गायकाने वागावं तसं त्याचं वागणं असतं. यावरून त्याच अवलोकन किती मस्त असेल याचा अंदाज येतो. त्याला जोडीस जोड म्हणून वर उल्लेख केल्याप्रमाणे निरागसपणा ही असतोच. त्यामुळे एकंदर परफॉर्मन्स हा भावतो.

आता त्याने हे गाणं कोणासाठी म्हंटलं आहे किंवा एखाद्या ठिकाणी बघून मग त्याची नक्कल करतो आहे हे कळत नाही. पण काहीही असलं तरी जो परफॉर्मन्स दिला आहे तो अगदी जमून आला आहे हे नक्की. आपणही जर का हा परफॉर्मन्स पाहिला असेल तर आपल्याला ही आवडला असेलच. नसेल पाहिला तर जरूर बघा, आपल्याला आवडून जाईल हे नक्की. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.