Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या डान्स स्टेप्स होत आहेत वायरल, बघा हा व्हिडीओ

ह्या मुलाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या डान्स स्टेप्स होत आहेत वायरल, बघा हा व्हिडीओ

उदयोन्मुख कलाकारांविषयी मराठी गप्पाच्या टीमला प्रेम आणि आदर आहे. त्यातही बालकलाकार यांच्याविषयी तर विशेष प्रेम आहे. कारण या लहानग्या कलाकारांकडून अनेक वेळेस आश्चर्यकारक परफॉर्मन्स पाहायला मिळतात. तसेच त्यांची निरागसता ही हवीहवीशी वाटते. पण प्रत्येक बालकलाकार काही रियालिटी शोज मध्ये येतातच किंवा येऊ शकतातच असे नाही. पण हल्ली मात्र सोशल मीडियाच्या रूपाने यावर काही प्रमाणात मात्रा निघाल्यासारखी वाटते. कारण या नवं माध्यमातर्फे अनेक दुर्लक्षित कलाकारांना व्यासपीठ मिळालं आहे. अनेक जण स्वतः याचा वापर करत आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. तर काहींना इतर कोणी तरी प्रसिद्धी झोतात आणत असतं. मराठी गप्पाच्या टीमने या दोन्ही प्रकारच्या कलाकारां विषयी वेळोवेळी लिखाण केलेलं आहेच.

आजचा व्हिडियो ही यातील दुसऱ्या पठडीतला. कारण या व्हिडियोत झळकणारा मुलगा आहे अगदी काहीच वर्षांचा. पण त्याचा डान्स व्हिडियो रेकॉर्ड मात्र कोणी दुसऱ्या व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीला या मुलाच्या नृत्य कौशल्याचं कौतुक असावं आणि का असू नये. हा मुलगा आपल्या उत्तम डान्स स्टेप्सनी आपली मनं जिंकून घेतो. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार टोनी कक्कर यांनी गायलेलं ‘धीमे धीमे’ हे गाणं या डान्स साठी निवडलेलं असतं. या गाण्याच्या बिट्सना साजेसे असे हावभाव आणि देहबोली या मुलाकडून होत असते. त्यातही हातांचा वापर करत दाखवलेल्या डान्स स्टेप्स तर अतिशय उत्तम. तसेच स्लो चालण्याची स्टेप तर सगळ्या डान्स मधली भाव खाऊन जाणारी पण तेवढीच कठीण स्टेप. पण हा मुलगा ही स्टेप किती सहजतेने करतो याचंच आपल्याला कौतुक वाटत राहतं. पण या व्हिडियो बद्दल एक गोष्ट मात्र आवडली नाही. हा व्हिडियो खूपच छोटा आहे. अगदी १३ सेकंदांचा. त्यामुळे आपण या छोट्याच्या डान्सची मजा घ्यायला सुरूच करत असतो आणि व्हिडियो संपतो.

काय बोलणार. पण दुधाची तहान ताकावर म्हणून मग हाच व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहतो. छोटुसा व्हिडियो असल्याने बघण्यात जास्त वेळ जात नाही पण डान्स चा आनंद मात्र घेता येतो. बरं आपली मराठी गप्पाच्या टीमचे सदस्य म्हणजे काही व्यावसायिक डान्सर नाहीत किंवा नृत्य या क्षेत्राशी थेट कलाकार म्हणून निगडित नाहीत. त्यामुळे या व्हिडियो चे जे काही विवेचन केलेले आहे ते एका सामान्य माणसाला जे दिसतं, भावतं त्याप्रमाणे केलेलं आहे. पण आपल्या वाचकांमधले असलेले डान्सचे दर्दी चाहते हे याबाबतीत जास्त सांगू शकतील. त्यामुळे आपल्याला या डान्स विषयी काय वाटतं ते कमेंट्स से’क्शन मध्ये लिहायला विसरू नका. आपल्या कडून आम्हाला आणि कमेंट्स वाचणाऱ्यांनाही काही उपयुक्त माहिती मिळू शकेल. तसेच आपल्याला या मुलाचं कौतुक असणारचं ते ही कळेल. या मुला बद्दलच्या कौतुकात अर्थातच मराठी गप्पाची टीमही सामील आहे. आज हा मुलगा कुठे असेल कल्पना नाही. पण त्याची कला तो जोपासत राहो आणि त्या कलेसोबतच त्याचे आयुष्य पुढे घडत राहो ही सदिच्छा.

आपल्याला हा लेख आवडला असणार तेव्हा आपण हा लेख शेअर करणारच असाल. त्याबद्दल धन्यवाद. तसेच आपल्या टीमने विविध विषयांवर खास आपल्यासाठी असं लेखन केलेलं आहे. त्या लेखांचाही आस्वाद आपण घ्या आणि आपला आमच्या प्रति असलेला स्नेह असाच वाढत राहू दे. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.