Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने कळशी घेऊन केलेला हा अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या मुलाने कळशी घेऊन केलेला हा अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

आपल्याकडे असे म्हटले जाते की, त्याला अमुक अमुक व्यसन आहे. म्हणजे हे कलेबाबत पण म्हटले जाते. त्याला अभिनयाचं व्यसन आहे, तिला संगीताचं, गायनाच व्यसन आहे. कला ही एक अत्यंत भयंकर न’शा देणारी गोष्ट आहे. आता तुम्हाला खूप खोलवर जाऊन सांगतो. ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, न’शा, तार किंवा धुंदी येते त्यांना रुढार्थाने मा’दक पदार्थ किंवा अ’मली पदार्थ म्हणतात. आणि याचे सातत्याने सेवन केले तर त्याला व्यसन म्हणतात. आता तुम्ही म्हणाल, काहीही सांगता राव… संगीताची किंवा डान्सची कुठं न’शा असती का राव? पण जसं देशी पेल्याशिवाय माणूस व्हलगडत व्हलगडत गटारीच्या कडेन घरी जात न्हाई, तसंच संगीत शिकल्याशिवाय तुम्हाला त्यातली न’शा कळू शकत नाही. नाचणारे पोरं तर दिवस-रात्र एकाच धुंदीत असतेत. जेवताना पण त्यांचे हातवारे चालू असतात. जेव्हा ते शांत बसलेले दिसतील, तेव्हाही त्यांच्या मनात डान्स चालूच असतो.

असलीच पोरं त्या डान्स रिऍलिटी शो मध्ये भाग घेतात आणि लै मोठं शेलेब्रिटी बनत्यात. आणि आपली उरली सुरली प्रोफेशनल नसलेली गाबडी याच्या हळदीत, त्याच्या लग्नाच्या वरातीत… गणपतीच्या मिरवणूकपासून तर होळीपर्यंत सगळीकडे नाचताना दिसतात. होळी असल्यावर तर विषयच खोल असतो भो यांचा… न’शा नेमकी होळीच्या भांगेची की नाचण्याची… हे समजतच नाही. तर असाच एक लै नादखुळा व्हिडीओ आमच्या हाती लागला. नादखुळा यासाठी म्हटलं की, या व्हायरल झालेली व्हिडीओत पोराने येड्यासारखा नादीक होऊन एकदम खुळा असा डान्स केला आहे. याच्या पण अंगात डान्सचा नाद आहे ज्यो याला खुळा करतोय. म्हणून म्हणलं नादखुळा… असला भयंकर डान्स केलाय. आपल्याला हा व्हिडीओ बघून असं वाटतं की, हा पोरगा 100% भां’ग प्यायला आहे. पण नंतर लक्षात येतं की, तो त्याच्याच मस्तीत नाचत आहे. सगळ्यांना वेड्यासारखं करत आहे. तो त्याच्या एका वेगळ्याच धुंदीत आहे. ही धुंदी सहज कुणाला मिळत नाही. कारण काही लोक कितीही नाचत गात असले तरी त्यांचे मन दुसरीकडे लागलेले असते. त्यामुळे ही धुंदी मिळणे, ही लै कौतुकास्पद गोष्ट असतीय गड्यांनो…

बर या व्हायरल झालेल्या व्हिडीओत भावाने हातात एक कळशी घेतलेली आहे. 2 जण येऊन त्याच्या हातातील कळशी घेण्याचा प्रयत्न करतात, पण तो नाचता नाचता त्यांना वेड्यात काढतो. फक्त पिवळी-हिरवि चड्डी घालून नाचणारा हा पोरगा… एकदम कॉमेडी मामला आहे. त्याने केलेला डान्स तर एकदमच जबराट आहे. सगळे डान्सचे प्रकार एकत्र केल्यावर जो डान्स होईल, तो डान्स या होळी खेळणाऱ्या पोराने केलेला आहे. एकूनच काय तर या छोट्याशा व्हिडीओत खूप काही गम्मत बघण्यासारखी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार व्हिडीओमध्ये नाचणाऱ्या मुलाचे नाव दीपेश पाटील असून तो मुंबईतील माहीम येथील रामगड परिसरातील रहिवासी आहे. माहीम मध्ये दरवर्षी होळी म्हटलं कि एक वेगळाच माहोल असतो. दरवर्षी येथील कोळीवाड्यात होळी हा सन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. असे प्रत्येक विभागात अवली कलाकार येथे होळीमध्ये पाहायला दिसतात. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by DIPESH💎 (@dipesh_patil96)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *