Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने केलेला जबरदस्त ब्रेक डान्स पाहून तुम्हीदेखील हैराण व्हाल, बघा हा अप्रतिम डान्स व्हिडीओ

ह्या मुलाने केलेला जबरदस्त ब्रेक डान्स पाहून तुम्हीदेखील हैराण व्हाल, बघा हा अप्रतिम डान्स व्हिडीओ

कोणतेही कलाकार हे त्यांच्या त्यांच्या कलेप्रति समर्पित असतात. आपली कला जोपासणं, तिचं सादरीकरण करणं हे सगळ्याच कलाकारांना आवडतं. बरं या जाणीवा अगदी उपजत असतात. काही वेळा अगदी लहानपणापासून या जाणिवांची आणि कलाकारांची, एकमेकांशी तोंड ओळख झालेली असते. तर काही वेळा थोडं मोठं झाल्यावर या जाणीवा जागृत होतात. एकूणच काय तर, आपली कला सादर करताना आपल्याला आनंद होतो हे एकदा कळलं की मग ते सादरीकरण सतत करत राहण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यातूनच मग एकेक सुंदर कलाकृती आपल्याला अनुभवायला मिळतात.

हल्ली तर सोशल मीडियाचा विस्तार एवढा वाढला आहे की जगाच्या कानाकोपऱ्यातील कलाकार स्वतःची कला सादर करताना आपल्याला बघता येतं. बरं या कलाकारांसोबत अनेक हवशे नवशे गवशे असतात. पण जो जबरदस्त कलाकार आहे तो या सगळ्यांमध्ये उठून दिसतोच. त्यातही या माध्यमाचं वैशिष्ट्य अस की यात कोणत्याही वयाचे आणि कोणतीही पार्श्वभूमी असलेले कलाकार सामील होऊ शकतात. त्यामुळे एखाद्या गावातील किंवा अगदी दूरच्या खेड्यातील एखादा कलाकार ही आपली कला अख्ख्या जगासमोर मांडू शकतो.

आज अशाच एका अनामिक कलाकाराचा परफॉर्मन्स बघण्याची संधी आली. हा कलाकार अनामिक आहे असं म्हणण्याचं कारण त्याचं नाव वगैरे शोधलं तर काही कळलं नाही. असो. पण त्याचा डान्स एवढा जबरदस्त होता की तो अगदी मनापासून लक्षात राहिला. हा कलाकार आहे ही अगदी लहान वयाचा ! त्यामुळे त्याच्या विषयी कौतुक वाटणं साहजिकच आहे. त्यात या व्हिडियोत तो जसा आपल्या समोर येतो ते पाहता त्याची आर्थिक परिस्थिती तेव्हढीशी चांगली नसावी असा अंदाज बांधता येतो. तसेच तो जिथे परफॉर्मन्स देतो ती शाळा ही एखाद्या दुर्गम भागातील असावी असं वाटतं. पण हे सगळे घटक असले तरी या मुलाने जो डान्स शिकून घेतला आहे आणि परफॉर्मन्स दिला आहे, त्यामुळे त्याचं विशेष कौतुक वाटतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा हा मुलगा आपल्याला एका शाळेच्या एका वर्गात उभा असलेला दिसतो. ती शाळा असावी असं म्हंटलं आहे कारण तिथे अनेक छोटी मंडळी गोलाकार बसलेली दिसून येतात. व्हिडियो सुरू होतो आणि या मुलाचा डान्स ही सुरू होतो. गाणं ही एकदम कमाल असतं. गुरु रंधवा याचं गीतकार, संगीतकार आणि गायक म्हणून गाजलेलं हे गाणं असतं. नवाबझादे या सिनेमातील ‘हाय रेटेड गब्रू – तेरे बिन’ हे ते गाणं आहे. हे गाणं प्रसिद्ध झाल्यापासून आपल्या आवडीचं आहेच आणि आजही चट्कन ओठांवर येतं.

असो. तर अशा या लोकप्रिय गाण्यावर हा मुलगा डान्स करू लागतो. बरं डान्स स्टेप्स ही वेस्टर्न डान्सच्या असतात. त्याचे हातवारे, पदलालित्य आणि एकूणच देहबोली ही त्या डान्स प्रकाराशी एकदम एकरूप झालेली असते. त्यातही त्याच्या पायांचा उत्तम वापर करत तो हा डान्स करतो. पण या सगळ्यांच्या उप्पर ही अशी एक गोष्ट असते जी आपलं मन जिंकून जाते. ही गोष्ट म्हणजे त्या मुलाच्या चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद होय. कोणतेही कलाकार त्यांची कला सादर करताना आपसूक आनंदी होत असतात. ते त्यांच्या चेहऱ्यावरून जास्त करून जाणवतं. हा छोटा उमदा कलाकार ही त्यास अपवाद ठरत नाही. बरं एकदा कलाकार आनंदी असले की आपसूक आपल्याला ही प्रेक्षक म्हणून आनंद होतोच. मग ती कालाकृती आपण लाईव्ह पाहत असू वा ऑनस्क्रीन पाहत असू ! आमच्या टीमला तर या छोट्या पण अतिशय हुशार मुलाचा डान्स खूप आवडला. त्यात त्याची एकंदर परिस्थिती बघता वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याचं विशेष कौतुक वाटलं. या कौतुकातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे.

त्याच्या डान्स विषयी अजूनही लिहिता आलं असतं. पण ज्यावेळी तुम्ही वाचक मंडळी स्वतः हा डान्स बघून त्याची मजा घेऊ शकता मग त्यात आम्ही उतारेच्या उतारे लिहून काय फायदा. याच विचारातून आमच्या टीमने हा व्हिडियो या लेखाच्या खाली शेअर केला आहे. आपणही आमच्या टीमप्रमाणे या व्हिडियोचा मनमुराद आनंद घ्याल हे नक्की.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.