Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने केलेला हा अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही, चेहऱ्यावरील हावभाव पाहून हसू आवरणार नाही

ह्या मुलाने केलेला हा अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही, चेहऱ्यावरील हावभाव पाहून हसू आवरणार नाही

लहान मुलांचे व्हिडीओ हे सर्वचजण आवडीने पाहत असतात. सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हिडिओ लहान मुलांवरच असल्याचे दिसते. ते आपले मनोरंजनही करतात आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. आजकालच्या मुलांमध्ये टॅलेंट खचाखच भरलेले आहे. त्यामुळे अशा मुलांचे व्हिडिओ व्हायरल होतात. ते पाहिले की आपल्यालाही असेच काहीसे करावे वाटते. एकदमच आपल्याला लहानपणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. शाळेत असताना आपण विविध खेळ खेळत होतो. कधी शाळेत डान्सही करायचो. आणि जमले तर कधी कधी अभ्यासही करायचो. शेवटी काहीही असो शाळा ती शाळा होती राव. आमच्यावेळी शाळेत डान्स फक्त आणि फक्त गॅदरिंग म्हणजेच स्नेहसंमेलनालाच केला जायचा. आता मात्र अगदी ऑफ पिरियड असेल तरीही पोरं शाळेत तुफान डान्स करत बसतात. अशातच पावसाळ्यात पाऊस जास्त झाला म्हणून शाळेला सुट्टी मिळाली तर होणारा आनंद काही औरच असतो. या आनंदात कुणी थेट बॅट-बॉल घेऊन शाळेचे कपडे न बदलता खेळायला जातो तर कुणी अभ्यास करत बसतो.

एखाद्याला शाळेला सुट्टी मिळाल्याचा आनंद एवढा असतो की, तो थेट नाचू लागतो. अशाच एका शाळकरी मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा डान्स एवढा भारी आहे की, ते पाहून आपलेही पाय थिरकू लागतात. अशाच या शाळेतल्या चिमुकल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. ही मुले किती अतरंगी असावी, याची कल्पना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

तर झालं असं की, पावसाळ्यात अनेक लग्नाच्या तिथी असतात आणि बहुतांश लग्न दुपारी होतात. अनेकदा असेही होते की, पाऊस खूप झाल्यावर अनेक मुलांना शाळा अटेंड करता येत नाही, म्हणून सगळ्यांनाच सुट्टी दिली जाते. जेव्हा आपल्या घराजवळ शाळा असूनही आपल्याला फुकटात सुट्टी मिलते, हा आनंद गगनात न मावणारा असतो. अशीच एका मुलाला सुट्टी मिळाली. आधीच त्याला आनंद झाला असल्याने तो खेळत-बागडत घरी निघाला होता. सोबत शाळेतील जोडीदार होतेच. घरी जाताना त्यांना एका लग्नाची वरात दिसली आणि मग या पोरांनी वरातीत असा काय आनंद लुटला, जे पाहून आम्हीही भारावून गेलो.

हा व्हायरल झालेला मुलगा काही प्रोफेशनल डान्सर नाही. मात्र अगदी कडक एक्सप्रेशन्स देऊन त्याने ज्या पद्धतीने डान्स केला आहे, ते पाहून अनेकांना गोविंदा आठवला. अगदी मनसोक्तपणे नाचणं, लोकांची पर्वा न करता हसत-खेळत जगणं, काय असतं, हेच या मुलाने दाखवून दिले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

जगात टॅलेंटेड मुलांची काही कमतरता नाही. अशा हुशार मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या दुनियेत रोज व्हायरल होत असतात. यापैकी काही इतके जबरदस्त आणि कमलाचे असतात, की नजर पडताच ते आपल्याला प्रभावित करतात. आणि आजच्या या व्हायरल व्हिडीओत दिसणारा मुलगा असाच आहे. त्याचा डान्स हा गणपतीउत्सव स्टाईल डान्स व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की एवढ्या लहान वयात हे मूल एवढ्या जबरदस्त डान्स स्टाईल कशा दाखवत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली आहेत. सर्वजण मुलाच्या नृत्याचे खूप कौतुक करत आहेत.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *