Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने केलेला हा अतरंगी डान्स पाहून तुमचे देखील मनोरंजन होईल, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या मुलाने केलेला हा अतरंगी डान्स पाहून तुमचे देखील मनोरंजन होईल, बघा हा अतरंगी व्हिडीओ

काल की पर्वाचीच गोष्ट आहे. आपल्या टीममधला एक भाऊ जरा कावलेला होता. बऱ्याच गोष्टी एकाचवेळी अंगावर आल्या की मग वैताग येतोच. त्याचं तसंच काहीसं झालं होतं. त्यात त्याला काही केल्या उसंत मिळेना. एक गोष्ट झाली की दुसरी आहेच. बरं त्यातून काही निष्पन्न होत असेल तर ठीक. पण यश मिळत नसेल तर अजून चिडचिड वाढते. त्यांचंही तसंच झालं होतं.

पण हा आमचा मित्र अनुभवी आणि हुशार आहे. त्याला कल्पना होती की वेळ खराब गेला की आपल्याला थोडी विश्रांती हवी असते आणि मनाला विरंगुळा मिळणं आवश्यक असतं. एकदा का हे झालं की मग बरेचसे प्रश्न सुटायला सुरुवात होते. कारण आपण त्यांना शांत डोक्याने तोंड देऊ शकतो. या पठ्ठ्याने ही तेच केलं. थोडासा वेळ मिळाला तेव्हा याने काही वेळ काम बाजूला ठेवलं आणि शांतपणे बसला. तरी विचार येतच राहिले. मग सरळ त्याने गंमतीदार व्हिडियोज बघायला घेतले. त्यातही प्राण्यांचे, लहान मुलांचे व्हिडियोज म्हणजे निखळ मजा असते. कारण आणेल वेळेस मोठ्यांचे व्हिडियोज मुद्दामहून बनवलेले असतात. त्यात तेव्हढीशी मजा येतेच अस नाही. ही मात्रा मात्र, या आमच्या मित्रावर अगदी चपखल लागू पडली.

कारण त्याने एकापेक्षा विनोदी व्हिडियोज बघितले आणि त्याच्या डोक्यात असलेले विचार निदान काही क्षण तरी दूर झाले. यानंतर मग त्याची गाडी बरोबर रुळावर आली. पण या विश्रांतीच्या काळातही पठ्ठ्याला एक व्हिडियो खूप आवडला. तो म्हणाला खूप हसलो हा व्हिडियो बघून. म्हंटलं बघू तर त्याने लिंक पाठवली. तो व्हिडियो बघून आम्हाला ही हसूच आलं. हा व्हिडियो एका लहान मुलाचा होता. ४-६ वर्षांपूर्वीचा हा व्हिडियो असावा. तसेच एकापेक्षा जास्त चॅनेल्स वर दिसला. त्यामुळे त्यात ऐकू येणारं पार्श्वसंगीत नेहमी वेगवेगळं होतं. पण तरीही हा व्हिडियो खूप आनंद देऊन गेला. कारण यातील त्या लहान मुलाचा डान्स हा एकदमच गंमतीदार होता. त्यात त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव बघूनच आपल्या चेहऱ्यावर हसू यावं. अगदी गंभीर वृत्तीचा माणूस ही हसेल हा व्हिडियो बघून. या मुलाचा विनोदी बाज, त्याचा आत्मविश्वास आणि त्याची निरागसता यांनी आपलं मन जिंकून घेतलं जातं हे नक्की. आपल्या टीमचं तर मन या व्हिडियोने जिंकून घेतलं हे नक्कीच. आपणही जर हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही आवडला असणार हे नक्की. कारण आपल्या डोळ्यासमोर सतत काही ना काही होत असत.

अगदी मनोरंजनाच्या क्षेत्रातही नवनवीन गोष्टी होत असतात. त्यात माध्यमांची वाढलेली संख्या, सोशल मीडियाचा वापर यांमुळे आपल्या समोर सतत काही ना काही चालू असतं. पण त्यातील बऱ्याच गोष्टी ठरवून केल्या जातात. आपल्याला ही हे कळत असतं. पण मूड खराब असेल तेव्हा हे असं काही बघितलं की त्या रागात भरच पडते. पण त्याचवेळी वर उल्लेख केलेल्या व्हिडियो सारखं निखळ काही आलं तर क्षणात ताण कमी होण्यास सुरवात होते. कारण सहजगत्या झालेलं निखळ मनोरंजन ही त्यावेळी आपली गरज असते. असो. आपण हा व्हिडियो पाहिला असेल तर आपलं मन ही थोडं हलकं झालं असेल. आपण व्हिडियो नसेल पाहिला, तर जरूर बघा. आपला थोडा वेळ तरी आनंदात जाईल. ज्याचा चांगला परिणाम पुढील कामांवर आपोआप होईल.

चला तर मग मंडळी, आपण या व्हिडियोचा आनंद घ्या. आम्ही सध्या आपला निरोप घेतो. लवकरच एका नवीन विषयावरील लेखासह भेट होईलच. हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. येत्या काळातील लेखही आपल्या पसंतीस उतरतील हे नक्की. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य लेख आवर्जून वाचा. त्यांचा आनंद घ्या, ते आठवणीने शेअर करा आणि हा आनंद वाटत राहा !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *