Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने केलेला हा डान्स पाहून तुमचा देखील दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ

ह्या मुलाने केलेला हा डान्स पाहून तुमचा देखील दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ

लहान मुलं आणि आनंदाला घर खुलं अस म्हंटलं तरी वावगं ठरू नये. कारण एकदा का घरात लहान मुलं प्रवेश करती झाली की मग बघायला नको. आनंदाची जी काही बरसात व्हायला लागते ती काही औरच असते. त्यातही त्यांचं वागणं, बोलणं, रुसणं, खेळणं हे सगळं कौतुकास्पद वाटतं. त्यांनी नुसतं काही बोबड्या बोलांनी म्हंटलं तरी किती आनंद वाटतो.

खरंच या लहान मुलांमुळे आपण ही काही वेळेला लहान वयात प्रवेशकर्ते होतो. अगदी नकळत. त्यांच्याकडे पाहत असताना, नकळत आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. आज आपल्या टीमच्या बाबतीत ही असंच झालं. आपली टीम काही व्हिडियोज बघत होती. बघता बघता एक व्हिडियो बघण्यात आला. उत्तराखंड प्रदेशातील हा मुलगा असावा असं कळतं. गढवली भाषकांपैकी एक असावा असं कळतं. या भाषेतील अनेक लोकप्रिय गाणी युट्युबवर प्रसिध्द आहेत. त्यामुळे उत्सुकता वाढून आम्ही हा व्हिडियो बघितला. यात आपल्याला हा मुलगा उभा दिसतो. त्याच्या पाठीमागे एक छोटी ताई बसलेली असते. या दोघांच्या ही पाठीमागे डीजे ठेवलेला असतो. त्यावर गाणं लागलेलं असतं. आता गाणं लागलं की मग काय विचारायला पाहिजे. हा बाळू नाचायला लागतो ना !

मस्त ताल धरत तो नाचत असतो. घरातील किंवा आजूबाजूच्या व्यक्तींना त्याचा हा डान्स आवडत असावा. म्हणूनच कदाचित ते याचं चित्रीकरण करून ठेवतात. गाण्यातील धून बदलते तश्या त्याच्या स्टेप्स बदलतात. पण एक गोष्ट आपलं मन जिंकून जाते ती म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर असलेले भाव होय. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडून गेला असेलच. किंबहुना हा व्हिडियो आपल्याला गत काळात घेऊन जातोच. आपणही लहान असताना घरी जेव्हा एखादा नवीन रेडिओ, डेक किंवा अजून एखादी म्युझिक सिस्टीम आणली की आपले भाव कसे असायचे याची आठवण होते. तसेच आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे ही नवीन काही आलं आणि वाजायला लागलं की आपण ही नकळत ताल धरायचोच. अगदी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव म्हणजे अजून धमाल. या आणि अनेक लहानपणीच्या आठवणी मनात घर करून राहिलेल्या असतात. पण आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे या आठवणींपासून दुरावतो. पण एकदा का असे जुने व्हिडियोज बघितले की क्षणात आपण त्यात ओढले जातो.

केवळ काही मिनिटांत मागील जीवनाचा फ्लॅशबॅक जणू पाहायला मिळतो. असो. बऱ्याच आठवणी आहेत. आपल्या ही असतीलच. या छोटूच्या व्हिडियोने या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. म्हंटलं आपल्या वाचकांना ही याचा आनंद घेता यायला हवा. म्हणूनच मग आजचा हा लेखप्रपंच मांडला. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.