Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने केलेली हिपहॉप लावणी पाहून तुम्हीही कौतुक कराल, बघा एकदा व्हिडीओ

ह्या मुलाने केलेली हिपहॉप लावणी पाहून तुम्हीही कौतुक कराल, बघा एकदा व्हिडीओ

पाश्चात्य देशांकडून आलेल्या अनेक डान्सप्रकारांपैकी ‘हिप-हॉप’ हा डान्स आपल्याकडे सगळ्यात लोकप्रिय ठरला. आज कुठल्याही डान्स रियालिटी शोमध्ये ‘हिप-हॉप’ हा डान्स प्रकार नक्कीच केला जातो. आज भारतात या नृत्याची एकदम क्रेझ आहे. सुरुवातीच्या काळात हा डान्स मुलांचा असा एक समज पसरला होता मात्र नंतरच्या काळात मुलींनी पण हा डान्स अंगिकारला. आता तर हा डान्स चक्क भारतीय लोकनृत्याची जोड देऊन केला जातो. म्हणजे आजवर तुम्ही हा डान्स अनेक भारतीय गाण्यांवर बघितला असेल पण आज आमच्याकडे या डान्स प्रकाराचा असा व्हिडीओ आला आहे, ज्यात चक्क लावणीची जोड दिलेली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘हिप हॉप’ डान्स त्याला लावणीची जोड… आणि हा डान्स एका मुलाने केला आहे. झालात न स्तब्ध… आधीच लावणी म्हटलं की आपल्याला एखादी सुंदर हिरोईन/तारका लक्षात येते… मात्र इथे या पठ्ठ्याने असा डान्स केला आहे, ते पाहून तुम्हीही म्हणाल… भावा मानलं तुला आणि तुझ्या जबराट डान्सला…

आमच्या टीमकडे एका व्हायरल झालेला व्हिडीओ आला. ज्यात हा भाऊ एकदम वेगवेगळ्या गाण्यांवर नाचत होता. आणि अचानक सुरु झाली लावणी… सहाची बि गाडी गेली नवाची बि गेली आता… बाराची गाडी निघाली… हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा… असं म्हणत या भावाचा जो डान्स सुरु झाला तो पब्लिकला येडं करूनच थांबला. सर्वसाधारणपणे लावणी म्हटलं की, एखादी मुलगी डान्स करते. पण या भावाने असा डान्स केला आहे की, जो पोरींना पण तोड देईल. आजवर तुम्ही लोककलाप्रकारातील लावणी नृत्य बघितले असेल. पण या भावाने लावणीवर ‘हिप हॉप’ करत सगळ्यांना धक्का दिला. याचा डान्स असला खतरनाक होतं की, पब्लिक शेवटपर्यंत चीअरअप करत होती. असला नाद्खुळा डान्स तुम्ही आजवर कधीच बघितला नसेल. मराठी माणूस आणि लावणी हे अतूट नातं आहे. जसे काळात बदल होतात, तसेच कलेतही बदल होतात. लावणीची अनेक रूपे आहेत.

अनेक लोककला काळाच्या ओघात लोप पावल्या पण शेकडो वर्षानंतरही ही कला अजूनही टिकून आहे. लावणी गणाची, लावणी कृष्णाची, लावणी टाकणीची, वगाची भेदिकाची, ऐकिवाची, आख्यानाची, फडावरची… तसेच शृंगारिक लावणी, उपदेशपर लावणी, विनोदी लावणी, स्थळकाळाचं वर्णन करणारी आणि बैठकीची पारंपरिक लावणी… असे अनेक प्रकार बघितल्यावर या भावाने केलेली लावणी बघण्यात एक वेगळीच मजा आहे. लावणी कोणतीही असो… ‘हिप हॉप’वाली देसी स्टाईल असो वा थेट पारंपरिक असो… मराठी माणूस लावणी बघितल्याशिवाय पुढे जात नाही. या भावाचा हटके लावणी डान्स तुम्हीही नक्कीच बघा. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.