Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने केलेली हि जबरदस्त लावणी पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या मुलाने केलेली हि जबरदस्त लावणी पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

लावणी म्हणजे आपल्या मराठी जनांचा आवडता नृत्यप्रकार. कोणताही समारंभ असो आणि त्यात नृत्य सादर होणार असो, तिथे हमखास लावणी ही असतेच. अशी ही आपल्या मनामनात बसलेली लावणी बराच काळ केवळ स्त्री कलाकारांकडून सादर केली जात असे. किंबहुना आजही स्त्री कलाकार यात आघाडीवर आहेत. पण गेल्या काही काळात वारं थोडं बदलतं आहे. अनेक मराठी मुलं आता लावणी नृत्यातील त्यांची आवड जपताना दिसतात.

याच यादीतील एक आघाडीचे नाव म्हणजे पवन तटकरे. या मुलाने गेल्या कित्येक वर्षात लावणी हाच आपला ध्यास मानून नटराजाची जणू साधनाच सुरू केली आहे. इतर नृत्यातही पारंगत असला तरी त्याचं मूळ लक्ष लावणी या नृत्यप्रकारावर जास्त असतं हे दिसून येतं. त्याला त्याच्या घरुनही यासाठी पाठिंबा मिळत आलाच आहे. मुळातच त्याच्या घरात लोककलेचा वारसा आहेच. त्याचे आजोबा हे उत्तम संगीतकार होते. त्यांची लोकगीते गाजली आहेतच. आता पवन हा त्याच्या नृत्यामुळे आपलं नाव कमावतो आहे. त्याच्या या वाटचालीत त्याने सादर केलेली अनेक नृत्यं आपल्याला त्याच्या युट्युब चॅनेल वरून पाहता येतात.

त्यातीलच एक व्हिडियो आपल्या टीमच्या पाहण्यात आला. जवळपास साडे तीन वर्षांपूर्वीचा हा व्हिडियो असून यात पवन आपल्याला लावणी नृत्याचा सराव करताना दिसतो. त्याच्या अन्य व्हिडियोज मधून त्याने सादर केलेले परफॉर्मन्स बघायला मिळतात. पण यात त्याचा सराव दिसून येतो त्यामुळे आपसूकच हा व्हिडियो खास होऊन जातो. या व्हिडियोला अजून खास बनवते ती अर्थातच पवन याची अदाकारी. ज्यांनी ज्यांनी त्याचे व्हिडियोज वा डान्स पाहिले असतील त्यांना त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव डान्स करताना किती उत्तम असतात याची कल्पना आली असेलच. एका समारंभात तर दस्तुरखुद्द प्राजक्ता माळी या आपल्या लाडक्या अभिनेत्रीने त्याच कौतुक केलं होतं. या हावभावांच्या सोबतीला अर्थातच चपळता ही तितकीच महत्वाची असते. कारण या लावणी नृत्यातून शृंगार रसासोबत येणारा झटका सुद्धा आवडून जातोच. त्यासाठी गाण्याच्या वेगाशी जुळवून घेता यायला हवं. आपल्या टीमनं आज बघितलेल्या व्हिडियोतून त्याची अदाकारी आणि सोबतीला असलेला वेग सहज दिसून येतो.

व्हिडियो सुरू होतो आणि पुढचं अर्धा मिनिट केवळ ढोलकीच्या तालावर पवन डान्स करत असतो. यावेळी गाणंही अगदी जबरदस्त अस निवडलेलं असतं. ‘वाजले की बारा’ हे गाणं आपण ऐकत असतो. सुरुवातीला जेव्हा अर्ध्या मिनिटानंतर म्युझिक थांबत आणि पवन पदर उडवल्याचा अभिनय करतो तेव्हा नकळत ‘आहा’ अस निघून जात. बरं ही अतिशयोक्ती नाही. खरंच असं होतं. कारण त्यावेळी हा डान्स सराव रेकॉर्ड करणारी व्यक्ती पवनच्या अदाकारीने खुश झालेली असते. आपण ही खुश होतोच. मग पुढचा जवळपास दीड मिनिटभर आपल्याला केवळ पवन आणि त्याची तालीम दिसत राहते. त्याचा हा डान्स आपल्याला आणि उपस्थितांना ही मंत्रमुग्ध करून जातो. त्यात त्याने दाखवलेलं कौशल्य उत्तम आहे. त्याच्या मुरक्या, ठुमके, ऊर्जा सगळं काही कौतुकास्पद वाटतं. तसेच त्याचा डान्स परफॉर्मन्स नेहमी उत्तम का होतो हे ही लक्षात आलं असेलच. यापुढेही पवन याचा कलाप्रवास उत्तम होईलच यात शंका नाही. आपल्या टीमला तर त्याचा हा तालीम करतानाच परफॉर्मन्स आवडला आणि त्याचे अन्य परफॉर्मन्स ही आवडले. आपणही जर ही तालीम बघितली असेल तर आपल्याला ही त्याची तयारी आवडली असेलच. आपल्या टीमकडून पवन यांस पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!

तसेच मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार यात शंका नाही. आपण नेहमीच आम्ही लिहिलेल्या लेखांचं स्वागत आणि कौतुक केलं आहेत. आपल्या प्रेमातूनच आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्याची ऊर्जा मिळते आणि टिकून राहते. यापुढेही आपलं हे प्रेम आम्हाला मिळत राहू दे ही सदिच्छा. आपली टीमही आपल्या वाचकांसाठी नेहमी उत्तमोत्तम लेख लिहीत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य लेख ही जरूर वाचा. सगळे लेख आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.