Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने कॉलेजच्या फंक्शनमध्ये सर्वांसोमर केला अफलातून डान्स, पाहून हसू देखील आवरणार नाही

ह्या मुलाने कॉलेजच्या फंक्शनमध्ये सर्वांसोमर केला अफलातून डान्स, पाहून हसू देखील आवरणार नाही

अख्ख्या जगात नाचण्याचे 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे दणकून कसही नाचणे, अशा नाचण्यात गाणी, स्टेप्स, बिट असं काहीही पाहिलं जातं नाही. दुसरा म्हणजे असं नृत्य जे अत्यंत व्यवस्थित, शास्त्रीय पद्धतीने केले जाते. आता भारतातील 99% पेक्षा जास्त लोक कसेही नाचतात. हे लोक पहिल्या प्रकारात मोडतात. म्हणजे लग्न, वरात, तमाशा, जागरण गोंधळ, गणेशोत्सव अशा विविध ठिकाणी या टाईपची पब्लिक नाचण्याचा मनसोक्त आनंद घेत असते. आता दुसऱ्या प्रकारात येतात ते प्रोफेशनल लोक. जे एकदम मोजक्या ठिकाणी नृत्य करतात. भारतात डान्स रिऍलिटी शो सुरू झाल्यापासून आता या क्षेत्राची भारतीय मुलांना चांगलीच भुरळ पडलेली आहे. बोले तो डान्स की क्रेझ बढरेली ना मामू… आजकाल अनेक इंटरनॅशनल स्कूल, सरकारी शाळा आणि इतरही अनेक शाळांमध्ये नृत्य, गायन, वादन या कलांना विशेष महत्त्व दिलं जातं. कारण इतिहास-भूगोल विज्ञान गणित पलीकडेही कला हा विषय असतो आणि तो अभ्यासला जातो, हे आम्हा भारतीयांना आताशी उमगलं आहे.

आता अनेक लोकल शाळांमध्येही नृत्य हा बंधनकारक विषय केला गेला आहे, आणि कला विषय बंधनकारक केलं जाणं ही खूपच चांगली गोष्ट आहे कारण ‘नृत्य’ या विषयामध्ये प्रचंड ताकद आहे. नृत्यामुळे बुध्दी ही सर्वार्थाने विकसित होते. आता तुम्ही म्हणाल, मुद्द्याच बोला की… पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, मनमोकळं आणि मनसोक्त नृत्य करणे, हाच मुद्दा आहे. बर आम्हाला हे लक्षात आलं एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे. सोशल मीडियावर दररोज काही ना काही वायरल होत असतं. कधी एका चहावाल्या मुलाचं सौंदर्य पाहून नेटकरी अवाक होतात तर कधी भाकऱ्या करताना गाणाऱ्या मुलीला पाहून नेटकरी तिचं कौतुक करतात. पाहता पाहता ही मंडळी सोशल मीडियावर वायरल होतात. एका छोट्याश्या गोष्टीतून मोठा बदल घडवण्याची ताकद या सोशल मीडियाकडे आहे. आता या व्हायरल झालेय व्हिडीओत आपल्याला दिसून येतं की, आजूबाजूला कॉलेजमधील तरुण मूल-मुली आहेत. सोबत शिक्षकही बसलेले आहेत. एकदम छोटासा एक इव्हेंट सुरू आहे, आणि त्यात एकेक करून मुलं कला सादर करत आहेत.

मात्र या सगळ्या पोरांमधून एका पठ्ठ्याने असला अफलातून डान्स केला की, त्याचा व्हिडीओ जबराट व्हायरल झाला. आता त्याने केलेला डान्स हा काही जगावेगळा नव्हता. मात्र तरीही त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. कारण त्याने अवघ्या काही सेकंदात 4 वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स केला. तोही एकदम भारी मनोरंजन करणारा. यात डान्स कमी आणि त्याचे एक्सप्रेशन्स जास्त बोलके होते. जुन्या काळात गोविंदा, अमिताभ बच्चन या अशाच एक्सप्रेशन्स वाल्या डान्समुळे फेमस झाले. पुढे जाऊन अनेक प्रोफेशनल हिरो प्रोफेशनल डान्स करू लागले पण त्यात जी मजा होती, ती आता राहिली नाही. शेवटी डान्स करताना हावभाव असतील तरच लोकांना ते अपील होतं. या व्हायरल झालेल्या डान्समध्ये या मुलाने नेमकं तेच दाखवलं आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *