Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने कॉलेजच्या फेअरवेल पार्टीत केलेला डान्स पाहून तुम्ही देखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या मुलाने कॉलेजच्या फेअरवेल पार्टीत केलेला डान्स पाहून तुम्ही देखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

शो स्टॉपर ही संज्ञा आपण कधी तरी ऐकली असेलच. याचा अर्थ असा की एखादया कार्यक्रमात जी व्यक्ती एकदम उत्तम परफॉर्मन्स देत सगळ्यांच्या लक्षात राहते. प्रत्येक कार्यक्रमात अशी एखादी तरी व्यक्ती असतेच, जी येतेच मुळात आत्मविश्वासात आणि आपलं सगळं लक्ष त्यांच्यावर खिळून असतं. अगदी कार्यक्रम संपला तरी त्यांचा परफॉर्मन्स अगदी लक्षात राहतो. पुढच्या वेळेस त्यांना भेटलं तरी तो परफॉर्मन्स आठवतो. बरं आज या संज्ञेची आठवण व्हावी असा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला आहे. चला तर मग त्याविषयी जाणून घेऊयात.

हा व्हिडियो आहे निशान नावाच्या मुलाचा. उत्तम डान्सर आणि फोटोग्राफर असणारा निशान म्हणजे एक उदयोन्मुख कलाकार आहे. बंगलोर येथील कॉलेजमध्ये शिकत असताना अभ्यासासोबत स्वतःच्या अनेक कलागुणांना वाव दिलेला दिसून येतो. अर्थात हे सगळं त्याच्या युट्युब चॅनेल वरून पाहता येतं. यातील एक व्हिडियो आज आपल्या टीमने पहिला. हा व्हिडियो आहे त्याच्या भन्नाट डान्सचा.

त्यांच्या कॉलेजच्या स्नेह संमेलनात त्याने हा डान्स केलेला आहे. खरं तर अगदी दोन मिनिटांपेक्षा ही कमी वेळ तो या गाण्यावर डान्स करताना दिसतो. पण असा काही भाव खाऊन जातो ना की विचारू नका. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा दोन मुली आपल्याला स्टेज वर दिसून येतात. त्यांचा डान्स परफॉर्मन्स चालू असताना निशान त्यांना येऊन सामील होतो. तेवढ्यात गाणं चालू होतं – ‘तेरे आख्यां का यो काजल’. आपल्याला हरयाणवी गाणी माहिती असतील नसतील पण हे गाणं जरूर ऐकलेलं असेल. एवढ्या प्रसिद्ध गाण्यावर डान्सही मस्त व्हायला हवा. या तिघांचाही डान्स अगदी तसाच मस्त होतो, धमाल होतो. मुळात निशान ची एंट्री एवढी जास्त भाव खाऊन जाते की तो आल्या आल्या टाळ्या शिट्या वाजतात. तो मुळातच प्रसिद्ध असावा आणि त्यात तो जेव्हा येतो तेव्हा अगदी आत्मविश्वासाने येतो. नाचतो ही मस्त. त्याचा डान्स एवढा सहजपणे होत असतो की आपण नकळतपणे त्याच्याचकडे बघत राहतो. बाजूच्या दोन्ही मुली अगदी जीवतोड डान्स करत असतात. पण या भावाचा नादच खुळा. जणू काही मूळ गाण्यात पण यानेच डान्स केलाय या सहजतेने हा पठ्ठा नाचत असतो.

सुरुवातीला फ्री स्टाईल वाटणारा त्याचा डान्स नंतर मात्र अगदी ठरवल्याप्रमाणे होत जातो. त्या दोघींच्या सोबत त्याचं ट्युनिंग ही उत्तम असतं. त्या दोघी त्याच्या खांद्यावर हात ठेवून नाचतानाची स्टेप तर एकदम भारी. त्या क्षणाला जसा आत्मविश्वास डान्स करताना दिसायला हवा, तसाच आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो. दोन सुंदर मुली मस्त नाचतायत, म्हणून भावड्या हरखून गेलाय असं होत नाही. त्याच्या प्रत्येक स्टेपवर त्याची हुकूमत असलेली दिसून येते. तसेच त्याची नाचण्याची स्टाईल अशी आहे की याचे पाय जमिनीला टेकतात ना की हवेत आहेत असं वाटावं. एकदम चाबूक परफॉर्मन्स. आपल्या टीमला तर हा परफॉर्मन्स भयंकर आवडला. वेळ कमी असला तरी उत्तम स्टेप्स, शंभर टक्के आत्मविश्वास यांच्या जोरावर हा मुलगा शो स्टॉपर होऊन जातो. आपणही त्याचा हा व्हिडियो पाहिला असल्यास, आपल्यालाही आवडला असणार आहे. बघितला नसेल तर हा व्हिडियो नक्की बघा.

तसेच मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेख कसा वाटला, हे कळवायला ही विसरू नका. त्यासाठी तुम्ही कमेंट्स सेक्शनचा वापर करू शकता. आपल्या पैकी अनेक वाचक या माध्यमातून आम्हाला चांगल्या आणि सकारात्मक सूचना करत असतात. प्रतिक्रिया ही देत असतात. यांतून आम्हाला ही नवनवीन गोष्टी शिकता येतात. तेव्हा आपला हा संवाद नेहमी होत राहू दे. आपला आणि आमच्या टीमचा स्नेह वाढीस लागू द्या. लोभ कायम ठेवा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *