वार्षिक स्नेह संमेलनं ही होत असतात. आता सध्या प्रत्येक कार्यक्रमाला ऑनलाईन तडका मिळाल्याने बऱ्याच बाबी बदलल्या आहेत. असो. काळाचा महिमा. पण अर्थात यांमुळे स्नेह संमेलनं जशी होतात, त्या ऑफलाईन पद्ध्तीचे महत्व कमी झालेले नाही. उलटपक्षी अशा विविध स्नेह संमेलनाच्या व्हिडियोज ना बघताना त्यातील गंमत पुन्हा एकदा अनुभवता येते. हे आमच्या अनुभवाचेच बोल आहेत. होय, खरंच. कारण आपल्या मराठी गप्पा टीमने एक व्हिडियो नुकताच पाहिला. खरं तर आपल्या टीममधील एका मित्राचा हा अगदी आवडता व्हिडियो आहे. पण मध्यंतरी या व्हिडियोची लिंक त्याला मिळता मिळेना. पण आज ती त्याला मिळाली. त्याने संपूर्ण टीमला हा व्हिडियो दाखवला. मग काय, आधीच लोकप्रिय ठरलेला हा व्हिडियो आणि त्यात आपल्या भाऊंचा आवडता म्हंटल्यावर लेख लिहिणं आलंच.
हा व्हिडियो आहे गौरव नेरपगर या उत्तम डान्सर, कोरिग्राफरचा. गौरव याला आपण याआधी ‘महाराष्ट्राचा अस्सल डान्सर (MAD) मधून भेटलो आहोत. चाळीसगावचा हा मूळ रहिवासी, त्याच्या रॉबिटिक्स आणि झिरो ग्राव्हिटी डान्स मुळे जगभर लोकप्रिय ठरला आहे. त्याने काही वर्षांपूर्वी एका स्नेह संमेलनात केलेला एक डान्स वायरल झाला होता. आजचा व्हिडियो म्हणजे हा डान्स होय. व्हिडियो सुरू होतो तेव्हा लक्षात येतं, की गौरव याचा परफॉर्मन्स सुरू होणार असतो. मुख्य परफॉर्मन्स शेवटी ठेवले जातात सहसा कारण त्यांच्यामुळे उपस्थित जागेवर खिळून राहतात आणि कार्यक्रम ही चांगल्या नोट वर संपतो. याच उद्देशाने त्याचा परफॉर्मन्स शेवटी ठेवला असावा असं वाटतं. कारण सूत्रसंचालक हे सूचना करत असतात की विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत झाल्यावरच जावे, त्यावरून हा शेवटचा परफॉर्मन्स असावा असा अंदाज लावता येतो. परफॉर्मन्स सूरु होतो तेव्हा गाणं सुरू असतं, ‘हो गयी गलती मैं जानता हुं’. एकदम हळवं करून टाकणारे शब्द आणि संगीत असलेलं हे गाणं.
त्यावर शोभेल असा परफॉर्मन्स देण्यात गौरव यशस्वी ठरतो हे दिसून येतं. कारण त्याच्या प्रत्येक स्टेप गणिक त्याला मिळत असलेला प्रतिसाद या वाढत गेल्याच दिसून येतं. खासकरून त्याने रोबोटिक्स करत केलेल्या स्टेप्स लाजवाब. त्यातही ५० व्या सेकंदाला तो जेव्हा मूनवॉक करतो तेव्हा तर उपस्थित सगळे टाळ्या शिट्या वाजवत त्याचं कौतुक करत असतात. गाण्याला साजेसे स्टेप्स तर तो करतोच पण सोबतच पुढे जे संगीत वाजतं, त्याला साजेसे अशा स्टेप्स ही तो करताना दिसतो. खासकरून १ मिनिटं ७ सेकंदानंतर च्या त्याच्या स्टेप्स अगदी भाव खाऊन जाणाऱ्या असतात. त्याचा तो स्लो वॉक तर लाजवाब. आपण त्याला नकळत मनातल्या मनात दाद देत असतो. जवळपास २७ लाख लोकांनी पाहिलेला हा व्हिडियो २७ हजारांनी लाईक्स का मिळवू शकतो हे त्या क्षणांत कळत असतं. अर्थात आपल्यासाठी ते काही क्षण असतील, पण गौरवचे कित्येक वर्षांपासून चे कष्ट त्यात आहेत हे दिसून येतं. पाठीमागे झुकत दोन पायांच्या आधारे बॅलन्स करत केलेली स्टेप याचं उत्तम उदाहरण.
तसेच दुसऱ्या मिनिटाला त्याने केलेली स्टेप त्याचं पदलालित्य खासकरून अधोरेखित करते. हे पदलालित्य याआधीही दिसलेलं असतं, पण या स्टेपने ते अधोरेखित होतं. पुढे मग पुन्हा मुन वॉक आणि बाकीच्या धमाल स्टेप्स. पुढचं एक मिनिटभर गौरव आणि त्याचं प्रेम असलेलं रोबोटिक्सचा जलवा आपल्याला पाहायला मिळतो. हा परफॉर्मन्स शब्दांत बांधून तुम्ही वाचण्या ऐवजी वेळ मिळेल तसा बघितलेला बरा. संपूर्ण व्हिडियो आहे तीन मिनिटं दोन सेकंदांच्या कालावधीचा. यातील प्रत्येक क्षण अनुभवावा आणि आनंद घ्यावा असाच आहे. आपण हा आनंद तर घेतोच वर गौरव याचं मनातल्या मनात का होईना नक्कीच कौतुक करतो. कारण त्याने या व्हिडियोत दाखवलेला परफॉर्मन्स लाजवाब आहे.
या लेखाच्या निमित्ताने गौरव याच्या या वायरल व्हिडियोमधील डान्स साठी खूप कौतुक आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! आपल्याला हा लेख आवडला असेल, अशी सार्थ अपेक्षा आहे. आपण नेहमीच आपल्या मराठी गप्पाच्या टीमने केलेल्या लिखाणाला, लेख सोशल मीडियावर शेअर करून प्रसिद्धी देत असता. त्यातून आपलं वाचक म्हणून आपल्या टीमवर असलेलं प्रेम व्यक्त होतं. आपलं प्रेम, प्रोत्साहन हे यापुढेही मिळत राहील हे नक्की. आम्हीही आपल्यासाठी नेहमीच विविध विषयांवरील लेख लिहित असतो आणि यापुढेही लिहीत राहू. यासाठी आपला आमच्यावर असलेला स्नेह वाढत राहू दे. धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :