तरुण वय म्हंटलं की आपसूक सळसळता उत्साह आणि ऊर्जा हे दोन शब्द नकळतपणे मनात येतात. अर्थात या उर्जेचं, या उत्साहाचं आपण कसा वापर करून घेतो हे सुद्धा महत्वाचं असतं. आता तिशी पस्तिशीत असणाऱ्यांना हा मुद्दा सगळ्यांत जास्त पटेल. कारण तरुण वयात आपण जे काही काम करतो, छंद जोपासतो त्यांचा आपल्या पुढील आयुष्यावर कळत नकळत परिणाम होतोच. जर आपलं काम आणि छंद हे आपलं कौशल्य वाढवणारे, आपल्या कलात्मक वृत्तीला चालना देणारे असतील तर क्या बात हैं ! आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आपल्या टीमने बघितलेला एक व्हिडियो. खरं तर वायरल व्हिडियोच म्हणायला हवं त्याला. कारण आजतागायत जवळपास तीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेला असा हा व्हिडियो आहे. ते ही अवघ्या आठ महिन्यांच्या आत. यावरून या व्हिडियोच्या लोकप्रियतेची कल्पना यावी.
हा व्हिडियो आहे एका तरुण मुलाचा. अगदीच कोवळ्या वयाचा हा तरुण असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं. हा डान्स व्हिडियो असल्याने आता हा कोणत्या गाण्यावर डान्स करून दाखवले हे पाहण्याची उत्सुकता असतेच. पहिले एक दोन सेकंद जरा असेच जातात. कारण हा तरुण जिथे उभा असतो तिथे पाठीमागे त्याच्या वयाची बरीच मुलं उभी असलेली दिसून येतात. बहुतेक हा त्यांचा डान्स क्लास असावा असा यावरून अंदाज बांधता येतो.
एव्हाना आपल्याला गाण्याचं संगीत ऐकायला यायला लागलेलं असतं. आपण नकळत मान डुलवत राहतो. ‘दिलबर दिलबर’ या सुप्रसिद्ध गाण्याचं हे म्युझिक असतं. आता हेच गाणं वाजणार की दुसरं वेगळं असेल असं वाटत राहतं. कारण अनेक वेळा सुरुवातीला धून एका गाण्याची आणि डान्स वेगळ्यावर अस असतं. पण या मिनीटभराच्या व्हिडियोत दिलबरच ऐकायला येतं आणि बरं वाटतं. तसेच या गाण्याला साजेसा असा डान्स या मुलाकडून केला जातो त्यामुळे व्हिडियो बघण्याचा आनंद अजून द्विगुणित होतो. गाणं वेग धरायला लागेपर्यंत हा तरुण केवळ धीम्या गतीने डान्स करत असतो. पण १३ व्या सेकंदाला जेव्हा तो बिट्स पकडतो तेव्हा कळतं की आता डान्सचा वेग वाढणार. आपला अंदाज बरोबर ठरवत हा तरुण अगदी मस्त नाचतो.
त्याच्या स्टेप्स मध्ये पायांचा उत्तम वापर केलेला दिसून येतो. लंबू टांग्या असून सुद्धा त्याच्या डान्स मध्ये अवघडलेपण आलेलं दिसून येत नाही हे विशेष. यावरून त्याला डान्सची आवड आणि सवय हे दोन्ही असणार हे कळून येतं. पुढे पुढे त्याच्या डान्स स्टेप्स नुसार तो उपलब्ध जागेचा वापर करत डान्स करतो हे पाहून चांगलं वाटतं. अर्थात तो अजून डान्स शिकत असल्याने डान्स स्टेप्स मध्ये काही ठिकाणी अजून छान पैकी स्टेप्स करता आल्या असत्या अस वाटत राहतं. पण एक लक्षात घ्यायला हवं. हा व्हिडियो आठ महिन्यांपूर्वीचा आहे. याचाच अर्थ असा की या आठ महिन्यांत या तरुणाने त्याच्या डान्स मध्ये काही फरक नक्कीच केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असो. एकूणच काय तर मिनीटभराचा हा व्हिडियो आपलं अगदी यशस्वीरीत्या मनोरंजन करतो. या तरुणाच्या उत्साहाचं तर कौतुक आहेच. सोबतच त्याने अगदी तरुण वयात आपली ऊर्जा एका कलेप्रती वापरण्यास सुरुवात केली आहे हे कौतुकास्पद वाटतं. आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडला. या तरुणाला आमच्या टीमकडून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!! तसेच हा व्हिडियो Rocky Akash Dada या चॅनेल वरून दिसतो. आकाश कुमार यांचं हे चॅनेल असल्याचं कळतं. त्यांच्यामुळे एक छान डान्स परफॉर्मन्स बघायला मिळाला यासाठी त्यांचेही धन्यवाद.
बरं मंडळी आपण हा व्हिडियो पाहिला असेलच. नसेल पाहिला तर आवर्जून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तसेच आपल्याला हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या मनोरंजनासाठी आपली टीम नेहमीच वैविध्यपूर्ण विषय घेऊन येत असते आणि यापुढेही येत राहील. आपणही आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत असता आणि यापुढेही देत राहाल हा विश्वास आहेच. लवकरच नवीन विषयासह आपल्या भेटीस येऊच. तोपर्यंत हा आणि आमचे इतर लेख वाचा आणि मोठ्या प्रमाणावर शेअर करा, आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :