Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने गाण्याला दिलेला क्युट कोरस पाहून तुम्हीदेखील मुलाच्या प्रेमात पडाल, बघा व्हिडीओ

ह्या मुलाने गाण्याला दिलेला क्युट कोरस पाहून तुम्हीदेखील मुलाच्या प्रेमात पडाल, बघा व्हिडीओ

संगीताशिवाय माणूस आपल्या आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही. गरीब असो वा श्रीमंत, शहरी असो वा ग्रामीण, स्त्री असो वा पुरुष, जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत मानवासोबत संगीत असतेच. शांततेतसुद्धा एक ताल असतो, जो फक्त बहिरे व्यक्तीच फील करू शकतात. संगीताने तुमच्या आयुष्यातील तणाव कमी होतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, महत्वाच्या ठिकाणी आणि क्षणाक्षणाला संगीत आपल्याशी एकरूप होऊन साथ देत असते. जेव्हा जेव्हा आपल्याला नैराश्य, तणावसारख्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ येते, तेव्हा या समस्येवर उपाय म्हणून आयुष्याच्या या अवघड टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी संगीत मुख्य भूमिका पार पाडत असते. आजही आपण जेव्हा अगदी 20-20 सेकंदाची स्टेटसला असणारी गाणी बघतो, तेव्हा ते पाहून आपल्या अंगावर शहारा येतो, हा संगीताचाच परिणाम असतो.

कितीही म्हातारा माणूस असू द्या, जेव्हा तुम्ही एखादं उडत्या चालीचं गाणं लावता, तेव्हा म्हाताऱ्याला उठता येत नसेल तरी बसल्या जागेवरून म्हातारा एकदम तालात मान हलविन. सध्या लहान मुले मोबाईलसाठी रडतात, का तर तिथे त्यांना संगीत ऐकायला मिळत असते. काही मुले आता हट्ट करतात, ते गाणं लावा तरच जेवण करेल… अर्थात ही सवय वाईट असली तरी संगीत कसे मानवी टप्प्यावर परिणामकारक ठरते, हे यातून समजून येईल. आता आमच्या हाती असाच एक व्हायरल व्हिडिओ लागलेला आहे. ज्यात एक लहान मुलगा गाण्याशी, संगीताशी कसा अटॅच झालेला आहे, हे लक्षात येईल. ‘ओ जिने मेरे दिल लुटीया’ … तुमच्या तोंडी आपोआपच “ओ ओ” आले असेल. हीच तर संगीताची आणि या गाण्याची जादू आहे. हा प्रचंड व्हायरल झालेल्या व्हिडीओत विशेष काहीच नाही. एकच गोष्ट विशेष आहे ती म्हणजे, या गाण्याला रिस्पॉन्स करणारा मुलगा… ज्या मुलाला स्वतःच्या पायावर उभाही राहता येत नाही, असा मुलगा गाण्याच्या रिकाम्या जागा भरू काढत आहे.

जेव्हा जेव्हा आपण चांगल्या मूडमध्ये असतो तेव्हा एखादे गाणे लागल्यास सूर, ताल, लय यांच्या अनोख्या संगमातून निघणा-या लहरींवर मन बेभान होवून डोलायला लागते. असेच या मुलाचे झाले आहे. या व्हिडीओत समजून येते की, कुटुंबातील एक मुलगी ‘ओ जिने मेरे दिल लुटीया’ … हे गाणं म्हणत आहे. या मुलीचा आवाजही एकदम कडक आहे. तसेच ती सुरात गाणे गात असल्याने ते ऐकावे, असे गाणे आहे. ती गाणे म्हणते आणि हा मुलगा मध्ये मध्ये आवाज करून तिला रिस्पॉन्स करतो आहे.

संगीताची अशी जादू असते, जी तुम्हाला तुमच्या एकदम अडचणीच्या किंवा एकलकोंड्या काळातच समजू शकते. संगीत प्रचंड प्रेरणादायी असते. इतरवेळीही जेव्हा तुम्ही गाणी ऐकत असता, तेव्हा तुमचा मूड आपोआप चांगला बनत असतो. आता तुमचा मूड बनवणारा हा व्हिडीओ नक्कीच बघा आणि शेअरही करा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *