Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या मुलाने घोळक्यामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

लग्न म्हंटलं की एक बाब नक्की असते ती म्हणजे डान्स. आपण आतापर्यंत लग्नातले विविध व्हिडियोज पाहिले असतील जे त्यातील डान्स मुळे वायरल झाले आहेत. त्यात अर्थात नवरा नवरीने केलेला डान्स असो वा नवरी आणि तिच्या वडिलांनी केलेला डान्स हे व्हिडियोज जास्त वायरल होताना दिसतात. अस असलं तरीही प्रत्येक लग्नात काही लहान मुलं ही असतात जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. त्यातही त्यांच्या डान्समूळे तर विशेषतः ही मुलं लक्षात राहतात. आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो पाहिला आहे ज्यात एका मुलाने केलेला डान्स खूपच वायरल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या डान्स विषयी. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक मुलगा समोर दिसत असतो. आजूबाजूला सगळी मोठी माणसं गोलाकार आकारात एकतर बसलेली असतात किंवा उभी असतात. या मुलासोबत एक छोटी चिमुकली पण असते. एव्हाना हा मुलगा त्याच्या डान्ससाठी तयार होत असतो. आणि जस गाणं सुरू होतं, तसे त्याचे हात पाय थिरकायला लागतात.

एक प्रसिद्ध गाणं लागलेलं असतं – माडी वहू तुले येईजाई करमन लगन. अनेकांनी एव्हाना या गाण्याचा व्हिडियो सुद्धा बघितला असेलच. स्वतःच लग्न करण्यासाठी आईच्या पाठी लागलेला मुलगा हा या गाण्याच्या केंद्रस्थानी असतो. त्यात अर्थातच विनोदाची फोडणी असल्याने हे गाणं मनोरंजक ठरतं. आता या व्हिडियोत हा लहान मुलगा या गाण्यावर डान्स करत असल्याने मजा येते. खरं तर त्याच्या स्टेप्स या पुन्हा पुन्हा होतात. पण खरी गंमत मात्र त्याच्या अभिनयात आहे. या गाण्यात अनेक वेळा संवाद साधल्यासारख्या ओळी आहेत. अर्थात त्या विनोदी आहेत. त्यात हा मुलगा समोर बसलेल्या जोडप्यांसमोर जाऊन या ओळी म्हणत अभिनय करतो तेव्हा खासकरून मजा येते. त्यात काही वैयक्तिक संदर्भ असतीलच म्हणा, कारण काही ओळींचा संदर्भ आपल्याला लागत नाही पण व्हिडियोत मात्र जाम हशा पिकलेला असतो. या मुलाचा डान्स आणि अभिनय सगळ्यांनाच आवडून गेला असल्याचं दिसून येतं. कारण सुरुवातीपासून ते व्हिडियो संपेपर्यंत कित्येक जण त्या मुलावर पैसे ओवाळून टाकतात.

सुरुवातीस त्याच्या लक्षात येत नाही त्यामुळे तो ते पैसे तसेच घेऊन नाचत राहतो. मग मात्र खिशात पैसे टाकतो. जेणेकरून डान्सला अडथळा होता कामा नये. पण त्याला कुठे कल्पना असते की त्याचा डान्स आवडल्याने प्रत्येक जण त्याला पैसे देणार आहे म्हणून. खुद्द नवरी मुलगी पण चट्कन येऊन त्याच्यावर पैसे ओवाळून जाते. त्याच्या सोबत असलेल्या चिमुकलीचं सुद्धा कौतुक होत असत. तिलाही पैसे मिळत असतात. एकदा तर इतके जमा होतात की दोन्ही हात भरून जातील. पण नाचण्याची मजा पैशात कुठे. ती चिमुकली मग सगळे पैसे जवळच बसलेल्या एका व्यक्तीला देऊन टाकते आणि नाचायला येते. अशा अनके छोट्या छोट्या पण विनोदी प्रसंगांमुळे हा व्हिडियो बघताना धमाल येते. व्हिडियो तसा चार मिनिटांच्या आसपासचा आहे. पण वेळ मस्त जातो. त्यामुळे आपल्या टीमने तर हा व्हिडियो दोनदा ते तीनदा बघत मजा घेतली. आपण आतापर्यंत हा व्हिडियो बघितला नसेल तर नक्की बघा.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरु नका. शेवटी काय आहे मंडळी, आपल्या प्रतिक्रियांतून मिळणारं प्रोत्साहन आणि सूचना आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्याची ऊर्जा देतात. त्यातूनच मग आपल्याला आवडणारे लेख लिहिले जातात. तेव्हा आपलं प्रोत्साहन आणि सूचना आमच्यापर्यंत येत राहू द्या. आपण वाचक आणि आमच्या टीममधले स्नेहबंध वृद्धिंगत होत राहू दे ही सदिच्छा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.