भारतातील अव्हेरलं गेलेलं पण सोशल मीडिया मुळे पुढे आलेलं टॅलेंट आपण अनुभवतच असतो. सोशल मीडियाचा हा फायदा आपल्या सगळ्यांनाच होतो. खासकरून अशा कलाकारांना पाहण्याची, ऐकण्याची आणि अनुभवण्याची संधी आपल्याला मिळते ज्यांना आपण एरवी त्यांची कला सादर करताना कदाचित अनुभवलंही नसतं. असाच एक अनुभव आपल्याला सोशल मीडियावरील एका वायरल व्हिडियोतुन येतो. हा व्हिडियो आहे ३ वर्षांपूर्वीचा. त्यावेळी तो प्रसिद्ध झाला होता. पण आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलेला आहे. अर्थात चर्चा करावं असंच कारणही आहे. या व्हिडियोत आपल्याला भेटतो तो ट्रेन मध्ये गाणारा मुलगा. पण ही काही लोकल ट्रेन नव्हे तर मेल एक्सप्रेस वाटते. त्यामुळे लांबच्या पल्ल्याच्या गाडीत हा चुणचुणीत मुलगा गात असावा असा कयास करता येतो. या मुलाचं नाव राहूल असं आहे.
पण त्या नावासोबतच त्याला एक विशेषण मिळालं आहे ट्रेन सिंगर. त्यामुळे सोशल मीडियावर तो राहुल ट्रेन सिंगर म्हणून प्रसिद्ध आहे. पण ही प्रसिद्धी कशी तर लोकांनी काढलेल्या व्हिडियोतून मिळालेली. त्याचं स्वतःचं सोशल मीडिया अकाउंट सापडत नाही. सापडणार तरी कसं म्हणा, सोशल मीडियावर लाईक्स मिळवत बसण्यापेक्षा चार पै’से पोटासाठी क’मावण्याचा त्याचा उद्देश दिसतो. त्याच्या या उद्देशाला साथ लाभली आहे ती त्याच्या गळ्याची.
ट्रेन मध्ये विविध गाणी गाताना त्याचे व्हिडियोज प्रसिद्ध झाले आहेत. पण सगळ्यांत जास्त प्रसिद्ध झालेला व्हिडियो म्हणजे ‘सनम रे, सनम रे’ हे गाणं गातानाचा व्हिडियो. मूळ गाणं आहे ते सनम रे या अल्बम मधलं ज्यात संगीतकार मिथुन यांचे शब्द आणि संगीत संयोजन या गाण्याला लाभलं आहे. तसेच अरिजित सिंग यांनी हे गाणं गायलं आहे. पुलकित सम्राट, यामी गौतम, उर्वशी रौतेला यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. असं हे लोकप्रिय गाणं गाऊन हा राहुल लोकांचं मनोरंजन करत असे.
कदाचित आजही करत असावा, पण त्याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही त्यामुळे काही भाष्य करता येत नाही. पण एक मात्र सांगता येतं, की त्याच्या आर्त स्वरातून निघालेलं हे गाणं आपल्या काळजाला अजून भिडतं. असा हा राहून अजूनही तसा लोकांपासून अनभिज्ञ वाटतो. पण आपल्या कडे अनेक वेळेस रियालिटी शोज मधून राहुल सारख्या गुणी पण संधी न मिळालेल्या गायकांनाही संधी दिली जाते. त्यामुळे येत्या काळात या गुणी गायकाला संधी मिळाल्यास आपल्या सारख्या गाण्याच्या तमाम चाहत्यांना नक्कीच आनंद होईल.
असो. आपल्या टिमकडून राहूल ट्रेन सिंगर ला त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! तसेच आपल्याला हा लेख आवडला असल्यास नक्की शेअर करा. आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही वाचा आणि त्यांचा आनंद लुटा आणि आपला स्नेहबंध आमच्याशी नेहमीच कायम असुद्यात.
बघा व्हिडीओ :