Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने त्याच्या कॉलेज ग्रुपसमोर केलेला डान्स होत आहे वायरल, बघा हा व्हिडीओ

ह्या मुलाने त्याच्या कॉलेज ग्रुपसमोर केलेला डान्स होत आहे वायरल, बघा हा व्हिडीओ

डान्स वायरल व्हिडियोज वरील लेख लिहिणं ही आपल्या टीमसाठी आता नित्याची बाब झाली आहे. त्यात आम्हालाही आनंद मिळत असल्यामुळे लेखही अजून खुसखुशीत होतात. पण यात ना, एक गोष्ट लक्षात येते. आपल्या पैकी अनेकांना डान्स करणं मनापासून आवडतं तर अनेकांना कधी कधी लहर येते म्हणून डान्स करतात. पण दोन्ही प्रकारच्या डान्सर्समुळे तयार होणारे वायरल व्हिडियोज गंमत आणि मजा निर्माण करतात हे नक्की. आजचा हा लेख आधारलेला आहे या दोन्ही प्रकारातील सुवर्णमध्य साधणाऱ्या एका मुलाच्या डान्सचा. म्हणजे या मुलाचा डान्स बघून त्याला डान्सची मूलतः आवड आहे हे कळून येतं, पण सराव थोडा अजून केला पाहिजे होता, असं जाणवतं. कदाचित ऐन प्रसंगी डान्स करायला लागल्यामुळे असेल कदाचित पण तसं वाटून जातं. असो. आपल्याला काय. आपण उत्तम डान्स करणाऱ्यांचे हितचिंतक आहोत. हा मुलगा ही छान डान्स करतो, त्यामुळे त्याचं ही कौतुक वाटतंच.

तर हा मुलगा होता एका कॉलेज मधला. होता म्हणण्याचं कारण हा व्हिडियो आजे चार वर्षांपूर्वीचा. त्यामुळे एव्हाना तो कॉलेज मधून बाहेर पडला असेल असं मानायला हरकत नाही. तर असा हा कॉलेज कुमार आपल्या मित्र आणि मैत्रीणींच्या घोळक्यात उभा असतो. सोबत शिक्षकगण ही असतातच. त्याला छान डान्स येतो हे या उपस्थितांना माहिती असतं हे जाणवतं. कारण जो तो या मुलाला डान्स करण्याचा आग्रह करत असतो. सुरवातीला थोडं नको नको म्हणणारा हा मुलगा डान्स करायला राजी होतो. गाणं वाजू लागतं, अंकित तिवारी यांचं ‘ये दोस्ती’. पुरानी जीन्स या चित्रपटातील हे गाणं मैत्रीचं महत्व अधोरेखित करतं. हा मुलगा हेच काम आपल्या डान्स मुव्ह्ज मधून करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. बहुतांश वेळेस यशस्वी होतो. सुरुवातीला उपस्थित त्याचा डान्स बघण्यात दंग असतात. मग मात्र ते त्याच्या सोबत यात एकरूप होऊन जातात. वेळोवेळी वाजणाऱ्या टाळ्या आणि मिळणाऱ्या प्रोत्साहनातून हे कळत जातं. एका क्षणाला हा मुलगा आपल्या मित्राला आपल्या डान्स मध्ये अंतर्भूत करून घेण्यासाठी हात खेचून आत आणतो.

पण हे मित्र महाशय मात्र आपल्या मित्रालाच डान्स करताना बघण्यात आनंद मानतात. आपणही या मुलाचा संपूर्ण परफॉर्मन्स बघून आनंदित होतो. कारण आजूबाजूला कसलीही सुविधा नसताना, कोणत्याही प्रकारची साधनं हातात नसतानाही प्रेक्षकांना खिळवून ठेवणं सोप्पं नाही. पण हा मुलगा ते करून दाखवतो. त्याचा डान्स संपल्यावर, त्याचं कौतुक करण्यासाठी होणारा जल्लोष सगळं काही सांगून जातो. व्हिडियोतील ह्या मुलाविषयी काही माहिती मिळते का हे आपल्या टीमने पाहण्याचा प्रयत्न केला. कारण प्रत्येक नवोदित कलाकाराला त्याच्या नावाने लोकांनी ओळखावं असं आम्हाला वाटतं. यात आम्ही माध्यम म्हणून जर काही हातभार लाऊ शकत असू तर त्याहून उत्तम ते काय. पण आम्हाला काही या मुलाविषयी माहिती मिळाली नाही. असो. या लेखाच्या माध्यमातून या नवोदित कलाकाराला त्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

आपल्याला हा लेख आवडला असणारंच. मग शेअर ही करून टाका की अगदी नेहमीप्रमाणे. तेवढाच या उदयोन्मुख कलाकाराला ओळखही मिळेल. तसेच आपल्या टीमने केवळ तुमच्या मनोरंजनाला डोळ्यासमोर ठेऊन लेख लिहिलेले आहेत. त्यांचा आस्वाद घेतल्या बिगर कुठं बी जायचं नाय. चला तर मग वाचा मराठी गप्पावरील नवनवीन लेख.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *