Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने बनवलेलं हे गाणं ऐकून अजय अतुलदेखील गाणी गाणं सोडून देतील, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या मुलाने बनवलेलं हे गाणं ऐकून अजय अतुलदेखील गाणी गाणं सोडून देतील, बघा हा अतरंगी व्हिडीओ

सोशल मीडियावर सतत वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अतिशय इमोशनल असतात, हे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळेही पाणवतात. तर काही व्हिडिओ इतके कॉमेडी असतात की लोकांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतात. काही व्हिडीओ पाहून तर हसून हसून पोट दुखेल की काय? असे वाटत राहते. विशेषतः डान्स, गाणे, कॉमेडी याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र कॉमेडी आणि गाणे एकत्र असा व्हिडीओ व्हायरल झालेला आजवर आपण खूपच कमी वेळा पाहिले असतील. आज आमच्याकडे असाच एक व्हिडिओ आला आहे, ज्यात असे गाणे गायकाने गायले आहे, जे पाहून अजय अतुल सुद्धा गाणे गाणे सोडून देतील. आणि हे गाणं ज्याने लिहिलं आहे, त्याला तर कोपरापासून नमस्कार… सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडीओ फक्त गाणे आणि कॉमेडी नाही बर का मित्रानो… तर एक जुगाड पण आहे, जो पाहून तुम्ही अक्षरशः हैराण व्हाल.

तंत्रज्ञान, विज्ञान आणि अक्कलहुशारीत जग कितीही पुढं गेलं असलं तरी आम्ही भारतीय जुगाड या एका संकल्पनेमुळे सगळ्यांच्या पुढेच असतो. अनेकदा शिकलेल्या लोकांपेक्षा जास्त शोध न शिकलेले शोध लावतात. कारण गरज हीच शोधाची जननी आहे. ‘‘काही तरी कौशल्य कमवा रे! नुसतेच प्रमाणपत्र आणि पदव्या घेत बसू नका!’’, असे अनेकदा विद्यार्थ्यांना ऐकावे लागते. याचा सरळसरळ अर्थ असा की, कौशल्य कमावले की पैसे हाताशी येतात आणि कौशल्य हाच जुगाडू वृत्तीचा पाया आहे, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. तर आमच्या टीमला एक व्हिडिओ मिळाला आहे, ज्यात एका बहाद्दर माणसाने एकदम खतरनाक जुगाड केला आहे. त्याची ही कल्पना बघून तुम्हाला त्याला एकदा कडक सलाम ठोकावासा वाटेल. तर या भावाने गायलेले गाणे तर भारीच आहे पण त्याने गाण्यासाठी माईक, स्टुडिओ म्हणून नैसर्गिक गोष्टी अशा वापरल्या आहेत की, ज्या संकल्पना एकदम अफलातून आहेत. कारण खेडेगावात राहणाऱ्या या भावाला स्टुडिओ, माईक आणि इतर तांत्रिक गोष्टींचा काहीही गंध नाही. पण त्याने जे केले आहे, ते पाहून नक्कीच भारावून जाल.

सैराट झालं जी या जगप्रसिद्ध मराठी गाण्याचा त्याने जो कार्यक्रम केला आहे, ते पाहून अजय अतुल सुद्धा याला भेटायला येतील. तमाम तळीराम म्हणजेच बेवड्या मंडळींना हे गाणं खूप आवडलं आहे. ‘आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या असंख्य समस्या काटकसरीने सोडवण्यासाठी केलेल्या कल्पक उपाययोजना म्हणजे जुगाड संशोधन’ ही यामागची संकल्पना आहे. एकविसाव्या शतकात विकास साधण्यासाठी जगभरात लोक झगडत असतात. भारतीय लोकं मात्र जुगाड करण्यात गुंतलेली आहेत. जगात कुठे कितीबी संशोधन होऊ द्या… पण भारतीय लोकांचे सोशल मीडियावर असणारे व्हिडीओ बघून अवघ्या अखंड जगाने मान्य केलंय की, सगळ्यात जुगाडू देश भारत आहे आणि या भूतलावर सगळ्यात हुशार माणसं भारतात सापडतात. असाच हा भाऊ आम्हाला व्हिडीओत दिसून आला आहे.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *