Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने भर रस्त्यात सर्वांसमोर केला संबळ डान्स, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या मुलाने भर रस्त्यात सर्वांसमोर केला संबळ डान्स, बघा हा अतरंगी व्हिडीओ

सध्या जिथे पहावी तिथे लग्नाची धामधूम आहे. कुठे हळदी समारंभ चालू आहे तर कुठे लग्नसमारंभ होतो आहे. त्यातही गेल्या एक दोन आठवड्यात तर आपल्या ओळखीतल्या अनेकांनी लग्न केल्याचं आपल्या निदर्शनास आलं असेल. त्यामुळे आपली ही धावपळ झाली असेलच. पण ठीक आहे ना. कारण लग्नात जाण्याचा आणि तिथल्या माहोलमध्ये रमण्यात जी मजा आहे ती कशातच नाही.

त्यातही सगळ्यांत जास्त मजा ही येते ती लग्नात होणाऱ्या वादनात. मग ते बेंजो वादन असो, ढोल वादन असो किंवा अगदी डीजे. लग्नात गाणं आणि डान्स असला की रंगत भरतेच. बरं यातही काही जण आपली पारंपरिक संस्कृती जपतात. ढोल ताशांसोबतच संबळ वादन ही होईल हे पाहतात. बरं काही जणं केवळ याच समारंभाला नाही तर अन्य समारंभांना ही संबळ वादन करणाऱ्यांना पाचारण करतात. संबळ हे आपल्या लोककलेतील एक लोकप्रिय वाद्य आहे. संबळचा नाद कानात घुमला की आपोआप आपलं शरीर हलायला लागतं. पाय थिरकायला लागतात आणि त्यांना हातांची साथ लाभते. आपसूक एक मस्त असा संबळ डान्स तयार होतो. बरं यात लहान थोर असे सगळे सामील होतात. एवढंच काय तर खास जुगलबंदी ही होते.

मागील काळात आपण या जुगलबंदिंचे अनेक व्हिडियोज वायरल होताना पाहिले असतीलच. आपल्या टीमने ही यावर वेळोवेळी लेखन केलेलं आहेच. अर्थात यासोबतच काही जणांचे एकट्याचे संबळ डान्स करताना ही व्हिडियोज वायरल झाले आहेतच. त्यातीलच एक व्हिडियो आज आपल्या टीमच्या पाहण्यात आला. बघायला गेलं तर अगदी वीस सेकंदांचा हा व्हिडियो आहे. पण यातील मजा आणि ऊर्जा इतकी जबरदस्त आहे की व्हिडियो पाहिल्यानंतर ही ती आपल्यासोबत राहते. या व्हिडियोत आपल्याला भेटतो एक लहान मुलगा. जवळच संबळ वाजवणारे एक काका असतात. आजूबाजूला त्या मुलासोबत असणारी अनेक मंडळी असतात. त्या संबळ वाजवणाऱ्या काकांचं सादरीकरण सुरू झालेलं असतं. सगळ्यांना हे वादन आवडत असतं. पण त्यातही या लहान मुलाच्या अंगात तर जणू वीज संचारावी तसं काहीसं झालेलं असतं. संबळ वादानातून ऐकायला येणाऱ्या आवाजावर तो डान्स करत राहतो. कधी पाय पुढे करून तर कधी हातवारे करत त्याचा डान्स चालू असतो. पण सगळ्यांत जास्त ऊर्जा ही त्याच्या चेहऱ्यावरील हावभवातून व्यक्त होत असते. इतकी की त्याचे डोळे जणू त्याच्या मनातील भाव व्यक्त करत असतात. संबळ वाद्याशी आणि त्यातील तालाशी हा मुलगा एकरूप झालेला असतो. इतका की शेवटी त्याच्या सोबत असणाऱ्यांना वेळेचं भान राखून हे वादन थांबवायला लागतं.

पण एक मात्र खरं की हे वादन आणि या लहान मुलाचा डान्स सगळ्यांना आवडला आहे हे दिसून येतं. आपणही त्यास अपवाद नसतोच. आपल्याला ही हा डान्स आवडून जातो. या लहान मुलाचं या वाद्याशी एकरूप होऊन जाणं आपल्याला आनंद देऊन जातं. आपणही त्याच्या जागी असतो तर आपल्याला ही असं नाचायला आवडलं असतं अस सहज वाटून जातं. असो. आपण ही जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असेलच यात शंका नाही. पण आपण पाहिला नसेल तर जरूर बघा. आपल्याला आवडेल.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *