Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने भर लोकांमध्ये केलेला डान्स होतोय वायरल, व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

ह्या मुलाने भर लोकांमध्ये केलेला डान्स होतोय वायरल, व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

वायरल व्हिडीओ म्हंटलं की आमच्या वाचकांना मराठी गप्पाची आठवण येते. आमच्या वाचकांमध्ये अनेक तरुण तरुणींचा भरणा सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं असं काही लिहावं असं वाटत होतं. पण वायरल व्हिडिओमधून फारसं असं काही समोर येईना. पण म्हणतात ना, इच्छा प्रबळ असली की मार्ग आणि फळ मिळतंच. आमच्या टीमच्या नजरेस एक डान्स व्हिडीओ आला. या व्हिडियोतील नृत्य कलाकाराची अदाकारी पाहून आमच्या टीमला या व्हिडिओ विषयी आणि कलाकाराविषयी लिहावंसं वाटलं. तसेच त्याची डान्स स्टाईल फ्री स्टाईल हा नृत्यप्रकार असल्याने आपल्या तरुण वाचकांना तो भावेल, असंही वाटलं. या तरुण कलाकाराचं नाव मोक्ष असं आहे. त्याचं स्वतःचं युट्युब चॅनेल असून द रेड शर्ट गाय (The Red Shirt Guy) या नावाने तो प्रसिद्ध आहे.

त्याने आपल्या युट्युब चॅनेलवर नुकत्याच केलेल्या एका क्यू अँड ए सेशन मधून त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला मिळते. तो मूळचा नोएडाचा. शिक्षणा निमित्त गोवा येथे आला. तत्पूर्वी शाळेपासूनच नृत्य आणि बास्केटबॉल यांची त्याला विशेष आवड. अभ्यासासोबत आपल्या या दोन्ही आवडी निवडी त्याने निगुतीने जपल्या. तसेच त्याच्या आई वडिलांकडून ही त्याला खूप चांगला पाठिंबा मिळाला. या काळात त्याची ओळख फ्री स्टाईल प्रकाराशी झाली. ज्यात गाणं ऐकून मग तिथल्या तिथे उत्तम असं काय करता येईल याचा अंदाज घेऊन डान्स करणं. मनापासून आवड असणाऱ्या या कलाप्रकारात मग दिवसेंदिवस त्याची प्रगती होत गेली. त्याने प्राविण्य मिळवलं. इतकं की अनेक डान्स बॅटेल स्पर्धांमधून त्याने विजेतेपद पटकावलं. या स्पर्धांचे व्हिडीओ आणि इतर डान्स व्हिडियोज त्याच्या युट्युब चॅनेल वर आपल्याला पाहायला मिळतात. तिथेच त्याचा आत्ता पर्यंत चा सगळ्यात वायरल झालेला व्हिडिओ दिसतो. नो वन एक्सपेक्टेड धिस डान्स असं त्याचं कॅप्शन आहे. कौतुकाचा भाग असा की यात त्याने फ्री स्टाईलचा वापर करत एकाच वेळी चार गाण्यांवर नृत्य केलं आहे. त्यातील पहिलं म्हणजे ‘बोले चुडीया, बोले कंगना’ हे सुप्रसिद्ध गाणं. पुढचं गाणं येतं ते सनी देओल यांचं ‘में निकला ओ गड्डी लेके’.

आणि या गाण्यात मोक्ष ज्या पद्धतीने बिट्स पकडून डान्स करतो ते अविस्मरणीय आहे. ‘तुंग तुंग बजे’ हे गाणं येतं तिसऱ्या क्रमांकावर आणि त्यावरही तितक्याच जोशात मोक्ष डान्स करतो. या संपूर्ण वेळात त्याची उत्साहाची पातळी कायम राखणं त्याला जमलंय हे स्पृहणीय आहे. त्याचं कौतुक जसं आपल्याला वाटत असतं तसेच त्या वेळी तिथे जमलेल्या मूलामुलींना सुद्धा. त्यांच्या आवाजावरून त्यांच्या प्रतिक्रिया कळत असतात. तेवढ्यात चौथं गाणं ‘दिलरुबा…माना का’तिल हैं तेरी अदा’ हे गाणं सुरू होतं. त्यातही अगदी मनापासून मोक्ष नृत्य करतो, प्रेक्षकांच्या मनावर छाप पडतंच असते आणि व्हिडिओ संपतो. मोक्ष हा अजूनही विद्यार्थी म्हणून शिकतो आहे. पण त्याने आपला अभ्यास, बास्केटबॉल आणि नृत्य यांचा ताळमेळ जमवणे आत्मसात केले आहे. त्यामुळे या सगळ्या क्षेत्रात आणि त्यातही खासकरून डान्स क्षेत्रात तो उत्तम असं योगदान करतो आहे. मोक्ष याच्या या आणि पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.