वायरल लेख आणि मराठी गप्पा हे एक नवं नातं तयार होतं आहे. यानिमित्ताने अनेक मनोरंजन करणाऱ्या विषयांबद्दलचे लेख आमच्या वाचकांसमोर आमची टीम आणत असते. पण या नात्यात केवळ हौसमौजच आहे असं नाही, तर खऱ्या खुऱ्या आयुष्यासारखी गंभीर किनारही आहे. आमच्या टीमच्या नजरेस एक विषय आला, जो काही काळापूर्वी वायरल झालेल्या एका मुलाच्या निबंधाबद्दल होता. त्याबद्दल आपल्यापुढे काही मांडावं असं आमच्या टीमला वाटलं म्हणून त्याविषयी हा लेख. हा वायरल निबंध आहे, मंगेश वाळके या मुलाच्या त्याच्या वडिलांविषयी. निबंधाचे नाव होते, माझे पप्पा.
खरं तर मंगेशचे वडील क्ष’यरोगाच्या आजारपणात निवर्तले. ते गवंडी काम करत. त्यांचा आजार बळावला तेव्हा मंगेश याच्या आईने मंगेशला त्याच्या मामाकडे पाठवले. मंगेशची आई दि’व्यांग असल्याचे त्याच्या निबंधातुन कळते. मंगेशचे वडिलांचे मंगेशवर खूप प्रेम. ते त्याला वही पेन आणून देत आणि त्याच्या शिक्षणासाठी त्याला प्रोत्साहन देत. मंगेश दहा वर्षाचा असून तो वाळकेवाडीच्या शाळेत शिकतो. मंगेश शिकून यशस्वी व्हावा आणि त्याची प्रगती व्हावी ही त्यांची इच्छा. तसेच त्यांचा स्वभाव हा मदत करणारा होता. हे सगळं मंगेशच्या त्या निबंधातून कळून येतं. हा निबंध वायरल झाला आणि पोहोचला ते थेट, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मं’त्री धनंजय मुंडे साहेबांपर्यंत. त्यांनी त्यावर तात्काळ महाराष्ट्र शा’सनाकडून मदत करण्याचे निर्देश दिल्याचं कळतं. तसेच त्यांच्या मुलाखतीतून त्यांनी मंगेश, याच्या शिक्षणासाठी वैयक्तिक मदत करण्याचे जाहीर केले होते. त्याचप्रमाणे आ’मदार बच्चू कडू यांनी मंगेशच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण उचलणार असल्याचे देखील सांगितले.
मंगेशनं काय लिहिलं आहे निबंधात :
“माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टी’बी हा आजार होता. म्हणून मला मम्मीने मामाच्या गावाला पाठविले होते. माझे पप्पा वा’रले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे, वही पेन आणायचे, माझे लाड करायचे. मला माझे पप्पा खूप आवडायचे. पप्पा १८ डिसेंबरला वा’रले. माझी मम्मी खूप रडली, मी सुद्धा खूप रडलो तेव्हा. आमच्या घरी खूप पाहुणे आले होते. पप्पा म्हणायचे मंगेश तू शिकून खूप मोठा साहेब हो. पप्पा घरात नसल्यावर कुणीच कुणाला मदत करत नाहीत. एकदा खोल पाण्यात मी आमच्या गाईला काढले. मला पप्पांची आठवण येते. रात्रीच्याला आम्हांला चोरांची भीती वाटते. पप्पा तुम्ही लवकर परत या. माझी आई अ’पंग आहे. त्यामुळे मला घरकामात आईला मदत करावी लागते.”
खरं तर वडील गेल्यानंतर त्यांच्याविषयी लिहिणं म्हणजे किती मानसिक त्रास त्या लहान मुलाला झाला असेल याची केवळ कल्पनाच आमची टीम करू शकते. मंगेशच्या या दुःख्खात मराठी गप्पाची टीम सहभागी आहे. त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्य सुखकर असावं आणि यापुढे सुखकर राहावं, ही मराठी गप्पाच्या शुभेच्छा !