Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने रस्त्यावर केलेला डान्स होतोय वायरल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

ह्या मुलाने रस्त्यावर केलेला डान्स होतोय वायरल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

आपल्या आजूबाजूला सोशल मीडियाचा वापर इतक्या प्रमाणात वाढला आहे की हा नवमाध्यम प्रकार म्हणता म्हणता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेला आहे. यातून अनेक चांगल्या वाईट घटनांचा आढावा आपल्याला अगदी काही क्लिक्स वर मिळत असतो. तसंच आपली कला सादर करण्याचं हे एक आघाडीचं माध्यम बनलं आहे. त्यामुळे आपल्या राहत्या जागेतूनही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचता येतं. बरं आता हा आपल्या आयुष्यात नित्याचाच भाग झाला आहे. पण तरीही जे नवनवीन कलाकार आपल्या समोर येत असतात आणि आपली अनोखी कला सादर करत असतात त्यामुळे या माध्यमाचं चैतन्य अबाधित राहतं. एवढंच नव्हे तर या माध्यमाचं वैशिष्ट्य म्हणजे जुन्या जुन्या कलाकृती सुद्धा अगदी सहज मिळतात. काही वेळा आपण त्यांचा शोध घेत असतो, तर काही वेळेस त्या आपल्या समोर येत असतात. असंच काहीसं झालं आपल्या टीमसोबत. नेहमीप्रमाणे व्हिडियोज बघत असताना एक तीन वर्षांपूर्वी पाहिलेला व्हिडियो समोर आला. आपल्या टीमला आवडलाच आणि सोबतच आपल्या वाचकांना आवडेल असंही वाटलं. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला जातो आहे. आज त्याच व्हिडियो विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

हा व्हिडियो बहुधा एखाद्या गावातील घराजवळ रेकॉर्ड केला गेला असावा. आजूबाजूचा परिसर पाहून तसं वाटतं. या व्हिडियोत आपल्याला एक मुलगा भेटतो. त्याच्या पाठीमागे आणि कॅमेऱ्यामागून काही जण उपस्थित असतात. एका अर्थी ही सगळी मंडळी पुढे संपूर्ण व्हिडियोभर प्रेक्षक म्हणून असतात. तर, हा मुलगा एक कलाकार म्हणून आपली कला सादर करत असतो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा एक गाणं आपल्या कानावर पडतं. ‘ये जो तेरी पायलो की छन छन हैं’ हे मासुम चित्रपटातलं सुप्रसिद्ध गाणं सुरू असतं. या गाण्याच्या बोलांवर हा मुलगा आपले पाय थिरकवत असतो. त्याने ‘पायलो की छन छन हैं’ दाखवताना केलेली स्टेप पहिल्या काही मिनिटातच आपलं मन जिंकून जाते. त्यातही गाण्यात छन छन हे शब्द येत नाहीत पण केवळ आवाज येतो आणि हा मुलगा ती स्टेप करत असतो ते तर अप्रतिम. गाणं जसं जसं पुढे सरकत तसं तसं कळत जातं, की या मुलाला डान्सची आवड आहे. कारण अगदी कोरिओग्राफर सारख्या नसल्या तरी चांगल्या चांगल्या स्टेप्स करत तो आपला डान्स चालू ठेवतो.

पुढे पुढे हातांच्या हालचाली सुद्धा छान करतो. तसंच ५० व्या सेकंदानंतर त्याने दाखवलेलं पदलालित्य कौतुक करण्यासारख आहे. आपल्याला जेवढं जमतं तेवढं काम आपण आनंदाने करावं हा त्याचा स्वभाव असावा असं वाटून जातं. या व्हिडियोत असणारं गाणं एक तर रिमिक्स आहे आणि त्यातही एखाद्या कार्यक्रमात वाजवलं गेलेलं असावं असं वाटतं. त्यातील रिमिक्स गाण्याच्या बिट्स ही हा मुलगा अगदी छान पकडतो. तसेच हे गाणं एखाद्या कार्यक्रमातील वाटतं कारण माणसांचे प्रोत्साहन मोठ्या प्रमाणावर मिळतंय असे आवाज कॅमेऱ्यामागून येत असतात पण हालचाल मात्र काहीच दिसत नाही. अर्थात त्यामुळे फारसा फरक पडत नाही. उलट आपणही कळत नकळत या मुलाच्या जिद्दीला वाव मिळायला हवा असा विचार करत असतो. आज हा व्हिडियो तीन वर्षांहून अधिक काळ ऑनलाईन आहे. त्यामुळे अनेकांनी हा व्हिडियो पाहिला आहे. कदाचित त्याला वाव आणि प्रोत्साहन मिळालं असेल किंवा अजूनही मिळालं नसेल. पण निदान त्याच्या प्रयत्नांचं कौतुक व्हावं असं आपल्या टीमला वाटलं म्हणून हा लेखप्रपंच.

आपल्यालाही या मुलाच्या प्रयत्नांचं कौतुक वाटलं असेल तर कमेंट्स करताना नक्की लिहा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला हे ही सांगा. कारण आपल्या सकारात्मक कमेंट्स, सूचना यांमुळे आपली टीम जे जे चांगलं ते ते आपल्या लेखांत अंतर्भूत करत असते. पण आपल्या सहभागाशिवाय ते केवळ अशक्य आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया कळवत राहा. सोबतच आपण मोठ्या संख्येने आपल्या टीमचे लेख शेअर करत असता, त्याबद्दल मनापासून धन्यवाद !!! यामुळे नवनवीन विषयांवर लिखाण करण्याचा हुरूप येतो. तेव्हा आपला पाठिंबा असाच कायम असू द्या. लोभ असावा. मनापासून धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *