सोशल मीडियाने आपल्या सगळ्यांनाच एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. या मुक्त आणि बहुतांशी वैश्विक व्यासपीठावरून आपण जेव्हा आपले विचार, आपली कला मांडत असतो तेव्हा ते पूर्ण जगाच्या पटलावर जात असतात. या माध्यमातून आपल्याला व्यक्त ही होता येतं आणि आपल्या मनात असलेली लोकप्रिय होण्याची इच्छा ही पूर्ण होते. एखाद्या कलाकारासाठी त्याची कला सादर करायला मिळणं आणि त्यासाठी त्याचं कौतुक होणं यापेक्षा दुसरं काही महत्वाचं असतं अस वाटत नाही.
बरं या व्यासपीठांवरून व्यक्त होण्यासाठी आपल्याला कोणावर अवलंबून राहायची गरज नसते. आपल्याला वाटतं तसं व्यक्त होऊन आपण आपलं म्हणणं मांडू शकतो हे आपण जाणतोच. म्हणूनच आपल्यापैकी अनेक जण स्वतःची कला सादर करण्यासाठी या नवीन माध्यमाचा सर्रास वापर करताना दिसतात. अर्थात त्यामुळे एकाच वेळी खूप काही गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतात. मग प्रश्न पडतो की नक्की बघायचं तरी काय? पण आपल्या वाचकांना असा प्रश्न नक्कीच पडत नसणार ! कारण आपली टीम नवख्या कालाकारांपासून ते जगद्विख्यात कलाकारांपर्यंत सगळ्यांविषयी लिहीत असते. फक्त त्यांनी केलेली कलाकृती विषयी आपल्या वाचकांना जाणून घ्यायला आवडेल अशी आमची खात्री पटली पाहिजे.
आता आज आमच्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोच उदाहरण घ्या ना ! हा व्हिडियो तसा काही काळापूर्वीचा आहे. पण यात बघायला मिळणारा डान्स मात्र आपल्याला आवडून जातो. थोडी माहिती घेतली तेव्हा कळलं की या तरुणाचं स्वतःच सोशल मीडिया चॅनेल आहे. त्यावर हा तरुण स्वतःच्या डान्सचे व्हिडियोज अपलोड करतो हे कळून आलं. सँडी अस या तरुणाचं नाव आहे आणि तो ग्वालीयरचा राहणारा असावा असा अंदाज करता येतो. असो. तर या सँडीचा आम्ही पाहिलेल्या व्हिडियो मधील अंदाज आमच्या टीमला खूप आवडून गेला. म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एका समारंभाचं व्हिडियो शूटिंग वगैरे होत असाव असं दिसतं. बहुतेक लग्न वगैरे असाव. कारण अनेक जण खूप सजून धजून उभे असतात. हे सगळे अर्ध गोलाकार आकारात उभे असतात, कारण मध्यभागी डान्स करायला जागा असते. या जागेत आपल्याला वर उल्लेख केलेला सँडी दिसून येतो. सूट बुटात एकदम टापटीप होऊन तो गाणं ऐकत ऐकत डान्स सुरू करतो. यो यो हनी सिंघ याचं एक गाजलेलं गाणं – ब्लु आईज हे यावेळी चालू असतं. आजही आपण या मूळ गाण्याचा म्युझिक व्हिडियो बघितला तर त्यावर करोडो व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून त्या गाण्याची लोकप्रियता लक्षात येईल.
तर अशा या लोकप्रिय गाण्यावर हा तरुण थिकरत असतो. त्याने डान्स करत असताना एक पाय तिरका आणि दुसरा पाय काहीसा दुमडून एक स्टेप तयार केलेली असते. ही स्टेप त्याच्या संपूर्ण परफॉर्मन्स मध्ये आपल्याला बघायला मिळते. पण त्यासोबतच त्याने मूळ म्युझिक व्हिडियोत असलेली एक स्टेप कायम ठेवलेली असते. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे इतर काही व्हिडियोत ही, जे याच गाण्यावर आधारित होते त्यातही हीच एक स्टेप कायम असलेली दिसून येते. काही कलाकृतींमधील ठराविक गोष्टी आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतात. या म्युझिक व्हिडियोतील ही स्टेप याच उत्तम उदाहरण आहे. असो. तसा सँडीचा डान्स व्हिडियो कमी वेळेचा आहे. तसंही आजकाल कमी वेळेचे व्हिडियोज असण्याचा ट्रेंड ही आहे म्हणा ! त्यामूळे या तरुणाचा डान्स व्हिडियो आजच्या काळात अगदी चपखल बसून जातो अस म्हणायाल हरकत नाही. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मनोरंजन ! आपणही जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असेल हे नक्की. पण आपण आतापर्यंत हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. आपल्या वाचकांसाठी आपली टीम हा व्हिडियो लेखाच्या खाली शेअर करेल. आपण तिथून त्याचा आस्वाद घेऊ शकता.
बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आजच्या या लेखातून एका होतकरू कलाकाराविषयी आपल्याला कळावं या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :