हल्ली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणं ही बाब काही नवीन राहिलेली नाहीये. पण त्यातही लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणं आणि ते स्थान टिकवणं ही मात्र तारेवरची कसरत असते. कारण सतत आपल्याला नवनवीन कंटेंट लोकांसमोर देत राहणं हे अतिशय महत्वाचं असतं. तसेच इतर अनेक जणही एकाच प्रकारचा कंटेंट देत असतातच. यात लक्षात येणारी गोष्ट अशी की यानिमित्ताने ज्यांना ज्यांना एखादी कला सादर करायला आवडते किंवा त्यात काही काम करण्याची इच्छा होती असे बरेच जण पुढे आलेले दिसून येतात. त्यामुळे त्यांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून काम करत असताना स्वतःची आवड ही जपता येते. त्यांच्या या आवडीतूनच मग त्यांचं काम चांगलं होऊ लागतं. तसेच त्यांचं वेगळेपण उठावदारपणे प्रेक्षकांसमोर मांडण्यात ते यशस्वी ठरले की वेळपरत्वे प्रसिद्धी ही मिळत जाते. अर्थात या प्रसिद्धी साठी त्यांना खूप काम करावं लागतं. तेव्हा कुठे त्यांनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचतं. त्यातही त्यांची एखादी कलाकृती एखाद्या वायरल फोटो, व्हिडियो मार्फत लोकांपर्यंत पोहोचली तर मग या प्रसिद्धीत लक्षणीय वाढ होते. याची अनेक उदाहरण आपल्या आजूबाजूला असतात.
असेच काही फोटोज किंवा वायरल व्हिडियोज ही इंटरनेट वर ही उपलब्ध असतात. पण प्रत्येक गोष्टी प्रमाणे ही या कलाकृती ही विस्मृतीत जातात. पण इंटरनेटची हीच एक खासियत आहे. अनेक जुन्या आठवणींना चट्कन उजाळा मिळतो. आज आपल्या टीमच्या बाबतीत असंच काहीसं झालं. आपली टीम डान्स व्हिडियोज बघता बघता एका व्हिडियोपाशी येऊन थांबली. या व्हिडियोला जवळपास साडे सात करोड लोकांनी पाहिलेलं आहे. म्हंटलं बघूया तरी. तर या व्हिडियोत एक मुलगा मस्त असा हरयाणवी डान्स करताना दिसून आला. त्याचा डान्स इतका मस्त होता की केवळ ५६ सेकंदाचा असूनही त्याला एवढ्या करोडो लोकांनी पाहिलेलं आहे आणि सवा सहा लाख लोकांनी लाईक केलं आहे. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी. थोडी माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की या मुलाचं नाव अजय कयात असं आहे. अजय यांच्या सोशल मीडिया वरून ते डान्सचे चाहते असून कोरिओग्राफी करतात असं दिसून येतं. त्यातही हरयाणवी डान्स ही त्यांची खासियत असल्याचं कळून येतं. त्यांच्या बहुतेक व्हिडियोज मधून ते हरयाणवी डान्स करताना आणि त्यास प्रोत्साहन देताना दिसून येतात.
गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचे व्हिडियोज पोस्ट करत असत हे दिसतं. सुरुवातीच्या काही व्हिडियोज मधून त्यांनी काही इव्हेंट्स मधील डान्सचे व्हिडियोज पोस्ट केले होते. नंतर त्यांनी एक व्हिडियो पोस्ट केला. ज्याला जवळपास सत्तर लाख व्ह्यूज मिळाले. आणि कदाचित या प्रतिसादातूनच प्रेरणा घेत त्यांनी पुढचा ही व्हिडियो पोस्ट केला. हा पुढचा व्हिडियो म्हणजे वर उल्लेख केलेला करोडो व्ह्यूज असलेला वायरल व्हिडियो होय. या दोन्ही व्हिडियोत त्यांनी एका शाळेत जाऊन तेथे परफॉर्मन्स दिलेला आहे असं दिसून येतं. व्हिडियो छोटा असल्याने त्याविषयी सविस्तर सगळं लिहिलं तर आपल्याला तो व्हिडियो पाहण्याची मजा घेता येणार नाही. तेव्हा आपल्याला जमेल तेव्हा हा व्हिडियो बघा. पण एक मात्र खरं की या व्हिडियो नंतर अजय यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करणारे अनेक जण वाढले असणार. पुढेही काही व्हिडियोज मधून त्यांचे काही व्हिडियोज वायरल झाल्याचं दिसून येतं. पण याच्या सारखा हाच.
अर्थात अस असलं तरी अजय यांनीही या क्षेत्रात कमालीचं सातत्य आतापर्यंत दाखवलं आहे असं दिसून येतं. त्यामुळे एवढा वायरल व्हिडियो जवळ असून सुद्धा त्यांनी आपले इतर डान्स व्हिडियोज पोस्ट करणं सुरूच ठेवलं आहे. किंबहुना गेल्या काही काळात या व्हिडियोजचं प्रमाण वाढलं आहे हे नक्की. त्यामुळे घवघवीत यश मिळवूनही त्यांनी सातत्याने काम करणं सोडलं नाहीये हे विशेष. म्हणूनच की काय आजही त्यांच्या युट्युब चॅनेलला तब्बल सवा तीन लाखांच्या घरात सबस्क्राईबर्स लाभले आहेत. सातत्य असलं की यश मिळतं आणि टिकवूनही ठेवता येतं याचं हे प्रातिनिधीक उदाहरण म्हणता येईल. असो.
तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :