Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने शाळेला सुट्टी घेण्याचे शिक्षकांना जे कारण सांगितले ते ऐकून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या मुलाने शाळेला सुट्टी घेण्याचे शिक्षकांना जे कारण सांगितले ते ऐकून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

लहान मुलं देवाघरची फुलं, असा वाक्प्रचार आमच्या काळात शाळेत असताना वापरला जायचा. आजकाल मात्र हा वाक्प्रचार खूप कमी वापरला जातो. का महितीय का? कारण आजकालची लहान मुलं ही प्रचंड अतरंगी आहेत. त्यांना देवघरची फुले हा वाक्प्रचार सूटच होत नाही. अगदी 6 महिन्याची पोरंसुद्धा अशी धमाल करतात, त्यांना पाहून वाटतं या वयात तर आपल्याला चड्डी घालायचं कळत नव्हतं. लहान पोरं गाण्यात, नाचण्यात आणि इतर कलाकुसर करण्यात एकदम निपुण आहेत. आपण त्या वयात असताना नवनीत गाईडमधून प्रश्नांची उत्तरे लिहायचो. आपल्यासाठी 35 रुपयांचा चायना पेन म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती. आजकालच्या या अतरंगी पोरांना हजारो रुपये किमतीचे मोबाईलही किरकोळ वाटतात. आता आपण गरीब गाय होतो म्हणूनच तर आपल्याला देवघराची फुले म्हटलं जायचं.

आता ही मुलं इतकी कलाकार आहेत की, साक्षात देव आला तरी यांना आवरणं मुश्किल होईल… तर अशाच एका एकदम अतरंगी मुलाचा व्हिडीओ आमच्या टीमच्या हाती लागलेला आहे. हा व्हिडीओ हिंदी भाषेतील असला तरीही ज्या ठिकाणी हा व्हिडीओ शूट झाला ते ठिकाण म्हणजे सरकारी शाळा आहे, हे ऐकून वातावरणावरून लक्षात येते. आणि तसही असले अतरंगी नमुने फक्त सरकारी शाळेतच दिसून येतील. तर या व्हिडीओत हा मुलगा 2 दिवस घरी राहिलेला आहे. आणि त्याला शिक्षक घरी का राहिला आहे, हे विचारल्यावर तो एकदम भन्नाट असं उत्तर देतो. उत्तर देताना तो मध्येमध्ये रडतही असतो. खरोखरच तो रडलेला नाही फक्त शिक्षकांना आपलं कारण पटवून देण्यासाठी तो अभिनय करत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओतील मुलाने दिलेलं उत्तर पाहून आपल्याला त्याचं हसूच जास्त येतं.

आमच्या काळी सर्वसाधारणपणे 2 दिवस सलग घरी राहिल्यावर शिक्षकांचा मार खाणे, हे कम्पलसरी असायचे. आता मात्र शिक्षा आणि त्याचं स्वरूप बदललेलं आहे. मात्र तरीही न सांगता घरी राहिल्यास 2 धपाटे सरकारी शाळेत खावेच लागतात. आता आमच्यावेळी मार वाचवायचा असेल तर एकच कारण चालायचं. ते म्हणजे ‘आजारी होतो’. दुसरं कोणतंही कारण दिलं तरी फटके पडणार, हे निश्चित असायचं. आता मात्र या व्हायरल व्हिडीओतील छोट्याने एकदम अतरंगी कारण दिलं आहे. व्हिडीओ पाहिल्यावर ‘असं कारण कुणी देतं का?’ असा प्रश्न तुम्हालाही पडतोच.

मात्र शेवटी सरकारी शाळेतील पोरांचं टॅलेंट असं असतं की, जी गोष्ट घडलेली नाही, तिलाही तिखट मीठ लावून सांगायचं. ही कला फक्त सरकारी शाळेच्या पोरानं अवगत असते. सेकंदात पलटी मारून पुन्हा माझंच कसं खरं आहे, हे पटवून देण्यात सरकारी शाळेची पोरं एक नंबर असतात. आता उदाहरण म्हणून हा व्हिडीओ बघा आणि तुम्हीही किंवा तुमच्या मित्राने असे कुटाने केले असतील तर त्यानाही हा व्हिडीओ शेअर करा…

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *