हा डान्स एका तरुणाने केला आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा या गाण्याची सुरुवात होत असते. त्यामुळे सुरुवातीची काही सेकंद केवळ संगीत वाजत असतं. पण या गाण्याची हीच कमाल आहे. कारण हेच संगीत, पुढील गाण्याची आणि पर्यायाने आपल्या मूड ची पायाभरणी करतं. बरं त्यात हा तरुण मस्त असा डान्स करायला लागतो आणि अजून रंग भरत जाते. सुरुवातीपासूनच त्याची देहबोली आणि चेहऱ्यावरचे हावभाव जबरदस्त असतात. आपल्याला आवडून जातात. हीच परिस्थिती तिथे असलेल्या तरुणाईची असते. बहुधा हा तरुण, या गाण्यावर विशेष चांगला नाचत असावा हे त्यांना माहीत असावं. कारण ते सगळे त्याच्या डान्स साठी तयार होत असतात. तसेच त्याने डान्स सुरू केला की स्वतः सुदधा डुलायला लागतात. त्यांचा एक मोठा ग्रुपच असतो. बरं आपण एव्हाना या सगळ्यांचं निरीक्षण करत असताना गाण्यातील शब्द आता अवतारायला लागलेले असतात.
त्या शब्दांसोबतच या तरुणाच्या डान्स मध्ये अजून मजा मस्ती भरली जाते. बहुधा त्या गाण्यातच अशी काही धुंदी आहे की माणूस आपोआप आपले खांदे उडवायला लागतो. ते पण अगदी लयीत बरं का !त्यामुळे या तरुणाचा परफॉर्मन्स बघायला खूप बरं वाटतं. कारण कोणताही परफॉर्मन्स मग तो एखाद्या मंचावर केलेला असेल किंवा या तरुणासारखा रस्त्यावर केलेला असेल, हा मनापासून व्हायला हवा. मनापासून जी व्यक्ती डान्स करते ती मन जिंकून जाते. हा तरुण ही आपलं मन असंच जिंकून जातो. पण त्यामानाने हा व्हिडियो लवकर संपतो. कदाचित या तरुणाला त्याच्या मित्रांनी चट्कन डान्स करून दाखवावा असं सांगितलं असावं. कारण तो त्याचा डान्स आवरता घेतो. पण तो जेवढा वेळ डान्स करतो तेवढा वेळ मस्त नाचतो. मजा येते. आपणही हा डान्स परफॉर्मन्स बघितला असेल तर आपल्याला ही आवडून गेला असेल. पण आपण पाहिला नसेल तर नक्की पहा.
आपल्या वाचकांसाठी हा व्हिडियो आमची टीम या लेखानंतर देते आहे. आमच्या टीमप्रमाणे आपणही हा मस्त डान्स एकदा बघाच. चला तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :