Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने सर्वांसमोर केलेला ‘लेलो पुदिना’ डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या मुलाने सर्वांसमोर केलेला ‘लेलो पुदिना’ डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

सध्या सगळीकडे एका गोष्टीची जबरदस्त चर्चा आहे. ही गोष्ट म्हणजे अर्थातच – कच्चा बदाम ! होय, तेच गाणं ज्याने सगळ्यांना कंबर लयदारपणे हलवत डान्स करायला भाग पाडलंय. खर तर पश्चिम बंगाल मधील एका बदाम विक्रेत्याचं हे गाणं आहे. ते ही त्यांच्याकडील बदाम विकावेत यासाठी त्यांनी या गाण्याचा आधार घेतला होता. पण त्यांनी या गाण्यासाठी पकडलेला सूर असा काही होता की हे गाणं आणि पर्यायाने ते स्वतः खूप प्रसिद्ध झाले. इतके प्रसिद्ध की काही म्युझिक व्हिडियोज मध्ये ही झळकले. आता म्युझिक व्हिडियोज म्हंटले की लोकप्रियता ही आलीच की !

त्यातही हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात या म्युझिक व्हिडियोजचं प्रस्थ हे तस वाढलं आहेच. अनेक कलाकार यातून आपल्याला स्वतःची कला सादर करताना दिसतात. असाच एक म्युझिक व्हिडियो गेल्या काही महिन्यांपूर्वी खूप लोकप्रिय ठरला होता. ‘ले लो पुदिना’ नावाने हा म्युझिक व्हिडियो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यात एका प्रियकराची आणि त्याच्या प्रेयसीची भेट कशी होते हे दाखवलं होतं. त्यातील कथा, गाणं हे प्रेक्षकांना आवडून गेलं होतं. कित्येक कोटींमध्ये व्ह्यूज ही मिळाले होते. यावरून या म्युझिक व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी.

पण सोशल मीडियावर व्ह्यूज कमावण्यासाठी अनेकवेळा मार्केटिंग ही केलं जातंच की ! योग्यच आहे ते ! पण एखाद गाणं लोकांना खरच आवडलं आहे हे मात्र इतर काही गोष्टींवरून ही सांगता येतं. यातील एक गोष्ट म्हणजे हे गाणं सामान्यातल्या सामान्य माणसाकडून वारंवार ऐकलं जात असेल आणि त्याचा वापर ही केला जात असेल की समजावे हे गाणं लोकप्रिय ठरलं आहे. खासकरून एखाद्या समारंभात वगैरे एखादं गाणं वाजलं की समजून जावं, त्याचे चाहते भरपुर आहेत आणि हे लोकप्रिय गाणं आहे. वर उल्लेख केलेल्या ‘ले लो पुदिना’ या गाण्याच्या बाबतीत ही हेच म्हणता येईल असा एक व्हिडियो काही दिवसांपूर्वी आपल्या टीमने पाहिला. अवघ्या सवा दोन मिनिटांचा व्हिडियो आहे. पण यातील जी धमाल मस्ती आहे ती मात्र हा व्हिडियो संपल्यावर ही आपल्या लक्षात राहते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक मुलगा आणि त्याचे मित्र मंडळी एके ठिकाणी उभे असलेले दिसून येतात. खरं तर ते ठिकाण म्हणजे डान्स फ्लोअर असतो. कदाचित एखाद्या लग्न समारंभात वगैरे ही मंडळी एकत्र आली असावीत. आता डान्स फ्लोअर आहे, तरुणाई आहे आणि डीजे ही असल्यावर जे होतं तेच इथेही बघायला मिळतं.

वर उल्लेख केलेला तरुण आपली कलाकारी दाखवत असतो आणि बाकीचे त्याच्या अवतीभवती राहून त्याला प्रोत्साहन देत असतात. एक दोन जण तर त्याच्या डान्स मध्ये ही सहभागी होताना दिसतात. तो ज्या ज्या गाण्यांवर डान्स करतो त्यातील एक गाणं असतं – ‘ले लो पुदिना’ ! या गाण्यावर या मुलाला जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्याला तोड नाही. बरं गाणं आवडतंय सगळ्यांना हे कळत असतं. सोबतच या मुलाच्या डान्सने ही धुमाकूळ घातलेला असतो. त्याच्या डान्स स्टेप्स अगदी बिट्स वर होत असतात. तसेच चेहऱ्यावर असलेले हावभाव ही त्या गाण्याला शोभेल असे असतात. आता गाणं कोणतंही असलं तरी त्याच्याशी जुळवून घेत नाचणारा डान्सर नेहमी लोकप्रिय ठरत असतो. इथेही तेच होताना दिसत. हे गाणं तसं खट्याळ आहे, म्हंटल्यावर या मुलाचा खट्याळपणा ही बाहेर येत असतो. असो. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही याचा अनुभव आला असेल. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर एकदा जरूर बघा. हा व्हिडियो आपलं मनोरंजन नक्की करेल. आपल्या वाचकांसाठी म्हणून आपली टीम हा व्हिडियो लेखाच्या खाली शेअर करेल. त्याचा आनंद घ्यावा.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *