Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने सर्वांसमोर केलेला ‘मुर्गा डान्स’ पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी डान्स

ह्या मुलाने सर्वांसमोर केलेला ‘मुर्गा डान्स’ पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी डान्स

वायरल व्हिडियोज सुप्रसिद्ध होण्यामागे काही ठळक कारणं असतात. यापैकी अगदी महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्यात अनपेक्षित म्हणावा असा काही भाग असतो. हा भाग वेगळा वाटल्याने लोकांना सदर व्हिडियोज आवडतात. अर्थात प्रत्येक व्हिडियो मधून आपण काही शिकावं असं असतंच असं नाही. हे व्हिडियोज फक्त मजा मस्ती साठी पाहिले जातात, पण त्यांना इतकी लोकं बघतात की ते वायरल होऊन जातात. आपल्या टीमने नुकताच एक व्हिडियो पाहिला जो धमाल आहे आणि मजा मस्ती चा अनुभव देणारा आहे.

हा व्हिडियो आहे एका पार्टीमधला. ही पार्टी कदाचित एखाद्या लग्नाची असावी. या पार्टीत आपल्याला डीजे दिसतो, सोबत एक डान्स फ्लोअर ही असतो आणि अर्थात समोर बसायला जागा असते. इथे सगळी मंडळी जमलेली असतात. त्यात बऱ्यापैकी मुलांचा सहभाग असतो. त्याचवेळी समोरच्या डान्स फ्लोअरवर मोठ्या माणसांचा एक ग्रुप मस्ती करत असलेला दिसून येतो. त्यातला एक जण तर इतका उत्साहित झालेला असतो की विचारता सोय नाही.

त्याच्या उत्साहाचं बाकी काही कारण असेल तर माहीत नाही, पण डान्स फ्लोअरवर डान्स करण्यासाठी वाजत असलेलं म्युझिक हे एक कारण नक्की असतं. मधल्या काळात चिकन डान्स म्युझिक नावाचा प्रकार वायरल झाला होता. त्याचाच हा भाग असावा. कोंबडीचा आवाज आणि त्यासोबत उडतं म्युझिक वाजत असतं. एव्हाना या तरुणाच्या अंगात कोंबडा आलेला असतो. आपले हात कोंबड्याच्या पंखासारखे वापरत या तरुणाचा डान्स सुरू असतो. डान्स म्हणण्यापेक्षा कोंबड्याची म्युझिकच्या तालावर केलेली एक मिमिक्री म्हणा ना. पहिल्या २० सेकंदात उपस्थितांचं मन जिंकलेलं असतं याने. बरं या तरुणाने कोंबड्याची भूमिका अगदी मनाला लावून घेतलेली असते. डान्स करता करता उपस्थित मित्रांना चोच मारण्याचं काम करत हा तरुण हशा मिळवत असतो. उपस्थित असलेले सगळेच याची मजा घेत असतात. अगदि पाठी उभे असलेली दोन माणसं सुदधा याची मजा घेत असतात. त्यातही आपल्या डाव्या बाजूस असणारा तर किती तरी वेळ दिलखुलास हसताना दिसतो.

पण एवढा वेळ डान्स केल्यावर मग तहान लागणं साहजिक आहे. मग काय, या तरुणाच्या हातात ही तहान भागवायला एक ग्लास येतो. मग मात्र व्हिडियोत एक स्पेशल इफेक्ट येतो आणि व्हिडियो पुन्हा सुरू होतो. आपण सुज्ञ आहात तेव्हा त्याबद्दल भाष्य करण्याची गरज नाही. एव्हाना दुसरं गाणं सुरू झालेलं असतं. एका दाक्षिणात्य सिनेमातलं हे अतिशय प्रसिद्ध गीत. आरारा नाकमुका नाकमुका असे शब्द असलेलं हे गाणं आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल आणि भाषा कळो न कळो, या गाण्याचा आनंद घेतला असेल. अगदी डान्स ही केला असेल. याचीच आठवण हा व्हिडियो बघताना होते. पण त्यामानाने हे गाणं पटकन संपत आणि व्हिडियो सुद्धा. व्हिडियो तसा छोटासा आहे पण वर उल्लेख केल्याप्रमाणे मजा मस्तीचा आनंद देणारा आहे. प्रत्येक व्हिडियोत काही बौद्धिक असेल किंवा अगदी फार विचार करून केलेलं असेल असं नाही. काही व्हिडियोज हे केवळ मनापासून मजा करण्यासाठी असतात. तसाच हा व्हिडियो आहे. यात या तरुणाला मनापासून नाचताना बघून आपल्यालाही आनंद होतो. कारण विचारलं तर आवडलं हे सगळं एवढंच कारण मनात येतं. असो.

तुम्हाला सुद्धा एक विरंगुळा म्हणून हा व्हिडियो आवडला असेलच. सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही पसंतीला उतरला असेल अशी अपेक्षा आहे. सोबतच एक नमूद करावंसं वाटतं की या व्हिडियो विषयी लेख लिहिला म्हणजे यातील प्रत्येक बाबीशी आपली टीम सहमत असेलच असं नाही, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच आपले यानिमित्ताने धन्यवाद म्हणावेसे वाटतात. कारण आपण ज्या मोठ्या संख्येने आपले लेख शेअर करत आहात त्यामुळे आपल्या टीमचा नवनवीन विषयांवर लेखन करण्याचा हुरूप वाढतो आहे. तेव्हा आपला हा पाठींबा यापुढेही आपल्या टीमच्या पाठिशी असू द्या ही सदिच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *