Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने सर्वांसमोर मॉडर्न स्टाईलमध्ये केलेली लावणी होत आहे वायर’ल, बघा व्हिडीओ

ह्या मुलाने सर्वांसमोर मॉडर्न स्टाईलमध्ये केलेली लावणी होत आहे वायर’ल, बघा व्हिडीओ

लग्नाचे वायरल व्हिडियोज, लहान मुलांच्या खट्याळपणाचे वायरल व्हिडियोज आपण बघत असतोच. पण सोबतच अनेक युवक आणि युवतींचे डान्स व्हिडियोज ही वायरल होत असतात. त्यातही लावणी या आपल्या लाडक्या लोककला प्रकारावर मुलांनी डान्स केलेले व्हिडियोज ही वायरल झाले आहेत. पण त्यातील काही लावणीचेच परफॉर्मन्स होते. आज या लेखासाठी आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो हा मात्र काहीसा वेगळा आहे. यात आपल्याला आपला एक युवक मित्र लावणीवर डान्स करताना दिसतो. पण हा असतो वेस्टर्न डान्स. त्यामुळे याची रंजकता वाढते. चला तर मग या व्हिडियो विषयी आपण अजून जाणून घेऊयात. हा व्हिडियो एखाद्या हळदी किंवा लग्न समारंभातील वाटतो. पण समारंभ कोणता याविषयी काही माहिती उपलब्ध नाही. असो. तर या व्हिडियोत आपल्याला दिसून येतं ते म्हणजे एक मुलगा आपल्या मित्रमंडळींच्या समोर उभा आहे.

ही मित्रमंडळी दिसत नाहीत, पण त्यांच्या आवाजावरून कळून येतं. समारंभ म्हंटला की गाणं वाजवणं आणि डान्स ही आला. या मित्रांना माहिती असतं, की आपला हा मित्र मस्त नाचतो. मग काय, त्यांच्याकडून फर्माईश होते. आपला मित्रही अगदी तयार होतो. त्याच्या डान्स करण्याच्या जागेतले खडे वगैरे बाजू करून उभा राहतो. तिथे डी. जे. गाणं वाजवणं सुरू करतो. ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ ही ‘अय्या’ चित्रपटातली लावणी. सुप्रसिद्ध गायिका उर्मिला धनगर यांनी हे गीत गायलं आहे. आपल्यापैकी अनेकांनी अगणित वेळेस हे गीत ऐकलं असेल. पार टांगा पलटी घोडे फरार गाणं आहे. तर असं हे जबरदस्त गीत सुरू होतं. त्यावर हा भाऊ नाचायला लागतो आणि बघता बघता इतका अप्रतिम डान्स करतो की व्हिडियो बघताना मजा येते. डान्सच्या सुरुवातीस तो थोडा हलके हलके डान्स करत असतो. पण गाणं पुढं सरकत जातं, बघणाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळत जातं आणि मग आपला हा मित्र रंगात येतो. तो इतका मस्त नाचतो की दुसरीकडून बघणारे प्रेक्षक त्याला आपल्या बाजूला वळून डान्स करायला भाग पाडतात.

एव्हाना पाठीमागे बसलेल्या काकू आतापर्यंत गप्प गप्प असतात. पण आता त्याही या मुलाला प्रोत्साहन देताना दिसतात. उत्तम काम केलं की प्रोत्साहन आणि शाबासकी मिळतेच. या आपल्या मित्राला या दोन्ही बाबी मिळतात. एकदा उपस्थितांकडून आणि दुसऱ्यांदा आपल्याकडून जे त्याला सोशल मीडियावरून बघत असतो. शेवटी पतंग उडवण्याची स्टेप करत करत तो त्याचा डान्स थांबवतो आणि व्हिडियो सुद्धा संपतो.

आपण आतापर्यंत अनेक डान्स व्हिडियोज बघितले असतील. पण अतिशय सहजतेने केलेला आणि सोप्पा वाटेल असा डान्स या भावाने केलेला दिसून येतो. पण खरं सांगायचं तर सोप्पं वाटतं, पण डान्स करताना कळून येतं. त्यामुळे या आपल्या भावाचं कौतुक आहेच. आपण हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्याला त्याचा डान्स आवडला असेलच. सोबतच या व्हिडियो वरील हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण नेहमीच आपल्याला आवडणारे आमच्या मराठी गप्पा टीमचे लेख शेअर करत असता. त्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळत राहतं. तेव्हा या वेळीही हा लेख नक्की शेअर करा. आपला आमच्याप्रति असलेला लोभ कायम असूद्यात. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक आभार !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.