Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने सैनिकाकडे केलेला अजब हट्ट पाहून हसू आवरणार नाही, बघा काय मागणी केली ते

ह्या मुलाने सैनिकाकडे केलेला अजब हट्ट पाहून हसू आवरणार नाही, बघा काय मागणी केली ते

लहान मूल म्हणजे देवघरचे फुल असे आमच्या काळी असायचे. आताची लहान मुले देवालाही हैराण करतील, अशी अतरंगी असतात. तुम्हाला एक किस्सा सांगतो. शास्त्रीय संगीतकार आणि गायक महेश काळे हे एका प्रोग्राममध्ये गात होते आणि अचानक त्यांना एका लहान मुलाने त्यांना ‘हम्मा हम्मा’ हे गाणं गाण्याची फर्माईश केली. आता परिस्थितीचा विचार करा. एक प्रसिद्ध शास्त्रीय गायक एकदम झब्बा वगैरे घालून भारतीय बैठकीत त्यांना असे गाणे गाण्याची विनंती होते विशेष बाब म्हणजे त्यांनी ते गाणं गायलंही कारण त्यांना ती फर्माईश एका लहान मुलाने केली होती. अर्थात अशा ठिकाणी अशी फर्माईश फक्त लहान मुलेच करू शकतात. हा किस्सा सांगण्यामागे हाच हेतू होता की, लहान मुले कुठे, कशी वागतील याचा काही नेम नसतो. आमच्या टीमच्या हाती असाच एक अतरंगी व्हिडीओ लागला आहे. खरं तर हा मुलगा जी हिम्मत करत आहे, तशी हिम्मत चुकूनही कोणी करणार नाही. सर्वसाधारणपणे लहान मुले कायमच खेळण्यासाठी हट्ट करतात.

तसेच खेळण्यातील वस्तू खरेदी करण्यासाठी हट्ट करतात. पिस्तुल, कार आणि बॅट-बॉल अशी खेळणी त्यांना कायमच हवी असते. या खेळणी एक दिवसही टिकत नाहीत. मग पुन्हा नव्याने खेळणी आणण्यासाठी मागणी सुरू होते. मग जर आई-बाबांनी खेळणी दिली नाही तर कशीही परिस्थिती बदलू शकते. आमच्या समोर आलेल्या व्हिडीओत एक लहान मुलगा चक्क खरीखुरी बंदूक मागतो आहे. तीही आर्मीच्या वेशात आणि ड्युटीवर तैनात असलेल्या जवानाला. तर हा व्हायरल व्हिडीओ आहे काश्मीरमधील. तिथे कायम सुरक्षेच्या कारणाने आर्मी पाचारण करत असते. बंदूकधारी आर्मीचे असे अचानक येणे आणि रस्त्यावर ड्युटी करणे हे काश्मीरमधील लोकांना कॉमन आहे. अशाच एका रस्त्यावर असलेल्या बंदूकधारी जवानाकडे एक लहान मुलगा बंदूक मागत आहे. रडत रडत तो ‘गन दे दो’ असे म्हणत आहे. विशेष बाब म्हणजे हा जवानही त्याला हसून प्रत्युत्तर देत आहे. आणि नंतर गन देतो, असेही सांगत आहे.

मात्र हट्टाला पेटलेल्या लहान मुलाला आवरणे, हे महाकठीण काम आहे. त्यामुळे तो जवान त्या मुलाच्या हाताला धरून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. मात्र बंदूक देत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही, अशी त्याची भूमिका ठाम असल्याचे दिसून येते. आई-वडिलांनी आवाज देऊनही तो लहानगा गन साठी रडतोच आहे. अखेरीस त्याची आई येऊन त्याला घेते मात्र गन साठी त्याचे रडणे निरंतर चालूच आहे.

रोडने आर्मीची ट्रक चालली असेल तरी आपण लगेच नियमात गाडी चालवायला सुरू करतो. कारण आपल्याला माहिती असते की, आर्मीवाले कानफाड फोडायला मागे-पुढे बघत नाहीत. मात्र हा छोटा थेट आर्मीवाल्याकडे हट्ट करतो आहे आणि थेट बंदूक मागत आहे. हाच मुलगा जेव्हा मोठा होईल आणि स्वतःचा हा व्हिडीओ बघेल, तेव्हा तोही हसून हसून वेडा होईल. आज खेळणं म्हणून बंदूक भारतीय जवानाकडे मागणारा हा मुलगा भविष्यात असाच आर्मी जवान झाला आणि खऱ्याखुऱ्या बंदुकीच्या जीवावर देशाचे संरक्षण करू लागला तर हा व्हायरल व्हिडीओ सार्थकी लागला म्हणायचं की…

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *