Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाला बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार द्या रे कोणीतरी.. व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

ह्या मुलाला बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार द्या रे कोणीतरी.. व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

लहान मुलं देवाघरची फुलं, असा वाक्प्रचार आमच्या काळात शाळेत असताना वापरला जायचा. आजकाल मात्र हा वाक्प्रचार खूप कमी वापरला जातो. का महितीय का? कारण आजकालची लहान मुलं ही प्रचंड अतरंगी आहेत. त्यांना देवघरची फुले हा वाक्प्रचार सूटच होत नाही. अगदी 6 महिन्याची पोरंसुद्धा अशी धमाल करतात, त्यांना पाहून वाटतं या वयात तर आपल्याला चड्डी घालायचं कळत नव्हतं. लहान पोरं गाण्यात, नाचण्यात आणि इतर कलाकुसर करण्यात एकदम निपुण आहेत. अशाच एका लहान आणि एकदम नाटकी असणाऱ्या पोराचा अस्सल अतरंगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोठ्या मोठ्या अभिनेत्यांना सुद्धा जमणार नाही, असली नाटकं या पोराने केली आहेत. क्षणात हसणारा आणि नाचणारा तर दुसऱ्या क्षणाला परत रडणारा असा हा अतरंगी पोरगा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

तर विषय असाय भावांनो… तसं गाणं लागलं, बँडचा आवाज कानावर पडलं की काही नाही तर किमान पाय तरी थिरकतातच. काहींच्या तर अंगातच संचारतं. नीटनेटकं नाचता येत नसलं तरी नागिण डान्स, गणपती डान्स तर सर्वांनाच येतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या चिमुकल्याने घरी मित्रांच्या सोबतीने आणि आई-वडिलांच्या समोर एकदम जबरदस्त डान्स केला आहे. पण फक्त डान्स करून तो थांबला नाही तर त्याने रडायचे नाटकही केले. तेही इतके अफलातून होते की, त्याचा डान्स पाहून एन्जॉय करण्यापेक्षा लोक त्याचे रडणे, एन्जॉय करत आहेत. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःचे हसू कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरू शकणार नाही. आऊट ऑफ कंट्रोल होऊन तुम्हीही हसू लागाल आणि कदाचित नाचूही लागाल. या चिमुकल्यावरून तुमची नजर एका क्षणासाठीही हटणार नाही. पुन्हा पुन्हा पाहत राहावा असा हा व्हिडीओ आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता काही लहान मुलं नाचताना दिसत आहे. एका ठिकाणी ते सर्वजण पाहत आहेत, जिथे साऊंड ठेवलेला आहे. आणि एक मुलगा रडत आहे. तो आईला गाणं लावण्याची मागणी करत आहे. नी अचानक गाणं सुरू होतं. एकदम मोठयाने रडणारा हा पोरगा चेहऱ्यावर खळखळून हसू आणत नाचू लागतो. पुन्हा गाणं बंद होतं, हा मुलगा पुन्हा रडायला लागतो आणि रडत रडत आईकडे तक्रार करू लागतो.

पण या निरागस चिमुकला गाणं कधी लागतंय? हे नीट कान देऊन ऐकताना दिसतो. अचानक पुन्हा जसं गाणं वाजतं तसं त्याच्या चेहऱ्यावर रडता रडता हसू येतं, त्याच्या पुन्हा अंगात संचारतं आणि गाणंच्या तालावर तोही ठेका धरतो. असल्या या अस्सल नाटकी आणि अतरंगी छोटूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक तर त्याला उरला सुरला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार द्या, अशीही चेष्टेत मागणी करत आहेत. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *