लोकं या मुलाला रानू मंडलचा मुलगा म्हणून ओळखत आहेत. इकडे-तिकडे, जिथं-तिथं..!!! सगळीकडे फक्त एकच नाव रानू मंडल. इंटरनेट वर तर चर्चाच चर्चा . कशाची चर्चा, हे सांगायची गरज नाहीये. तरीही, आम्ही तुम्हाला सांगतोच! रानु रेल्वे स्टेशन वर गाणी गायची. तिची अत्यंत खडतर परिस्थिती होती. 30 जुलै रोजी एका व्यक्ती ने तिचं गाणं रिकॉड केलं व सोशल मीडिया वर अपलोड केलं. बघता बघता ते गाणं पसरत गेलं. लोकांना रानूचा आवाज खूप भावला. तिला मुंबईला बोलवण्यात आले व ती एका रियालिटी शो मध्ये पोहोचली. हिमेश रेशमिया ने तीला एका चित्रपटात गाण्याची संधी दिली. तीन गाणी रेकॉर्ड झाली. तीनही गाण्यांची झलक हिमेश ने सोशल मीडिया वर टाकली, ती गाणीही बघताच वाऱ्याप्रमाणे पसरली. लोकांना ती झलक ही खूप पसंत पडली. रानू मंडल आता सोशल मीडिया वर सगळीकडे पसरली आहे .
परंतु आता रानू मंडलचा मुलगासुद्धा चर्चेत आला आहे. नाही-नाही! हे आम्ही नाही म्हणत आहोत, हे लोकं म्हणतायत! असे का म्हणतायत? तर चला पाहूयात. रानू मंडल च्या गाण्यासारखंच एका मुलाचं देखील गाणं सोशल मीडिया वर प्रचंड पसरत आहे. तो मुलगा ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं…..’ हे गीत गात आहे. लोकांना त्याचं गाणं खूप आवडलं असून लोकं त्याला रानू मंडल चा मुलगा म्हणून ओळखत आहेत. ह्या मुलाचा आवाज खूप गोड असून तो गाणं बऱ्यापैकी गात आहे. हेच कारण आहे की, त्याला रानू मंडल चा मुलगा म्हणून ओळखलं जातंय. प्रशंसा करण्याकरिता लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी ह्या मुलाचा आवाज रानू मंडल पेक्षा सुद्धा सुंदर असल्याचे सांगितले आहे.
लोकांचे असे म्हणणे आहे की, याला ही चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी. चाहते हिमेश रेशमिया ला विनवणी करीत आहेत की, या मुलाला देखील एक संधी मिळावी. खरे, ही वीडियो कुठली आहे हे अजून कळलेले नाही. परंतु एक आठवड्याआधी फेसबुक वर अपलोड केलं गेलं. आतापर्यंत 831 प्रतिक्रिया आल्या आहेत तसेच 3,037 वेळेस शेअर केल गेलेलं असून 240 हजार लोकांनी ही पोस्ट पाहीली आहे. ज्याप्रमाणे रानू मंडलला चित्रपटात गायची संधी मिळाली त्याप्रमाणेच ह्या मुलालाही संधी मिळावी अश्या कमेंट्स अनेकांनी केल्या. आता ह्या मुलालाही बॉलिवूड मध्ये खरंच संधी मिळेल का हा येणारा काळच ठरवेल. तुम्ही सुद्धा खाली दिलेला व्हिडीओ पाहून आणि ह्या मुलाचा आवाज कसा वाटला नक्की कमेंट्स करा.