Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलींचा प्रॅक्टिस दरम्यानचा डान्स होतोय खूपच लोकप्रिय, बघा हा अप्रतिम डान्स व्हिडीओ

ह्या मुलींचा प्रॅक्टिस दरम्यानचा डान्स होतोय खूपच लोकप्रिय, बघा हा अप्रतिम डान्स व्हिडीओ

भारतीय सिनेमा म्हंटला की त्यात गाणी आली. तसेच त्यातील बहुतांश गाणी ही अशी असतात की त्यांच्यावर डान्स करताच येतो. त्यात एखादं आयटम नंबर गाणं असेल तर मग काय बघायला नको. डान्स करणाऱ्या सगळ्यांसाठी ती एक पर्वणी असते. कारण आयटम नंबर गाण्यात वाजणारे बिट्स, धमाकेदार म्युझिक आणि अर्थात तडकते फडकते शब्द यांमुळे अगदी उत्साहाने डान्स करता येतो. मग याची भुरळ डान्स रसिकांना न पडते तोच नवल. अशाच एका काहीशा जुन्या आयटम सॉंग ची भुरळ पडली दोन डान्स प्रेमी मुलींना. या गाण्यावर डान्स बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच ही तालीम त्यांनी व्हिडियोबद्ध ही केली. हाच व्हिडियो यातील एका मुलीने आपल्या युट्युब चॅनेल वर टाकला आणि म्हणता म्हणता करोडोंच्या घरात व्ह्यूज मिळवून गेला हा व्हिडियो. ज्या मुलीने हा व्हिडियो अपलोड केला तिचं नाव आहे स्वप्ना राव.

स्वप्ना आणि तिची मैत्रीण सौम्या यांनी ‘अट्टंटोडे इट्टंटोडे’ या गाजलेल्या गाण्यावर डान्स केला होता. या डान्सची तयारी करतानाचा व्हिडियो पुढे वायरल झाला होता. आज तब्बल तीन वर्षांत या व्हिडियोने चार करोडहुन अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या त्यांच्या व्हिडियोत सुरुवातीला गाण्याचे म्युझिक वाजत असते. त्यावर या दोघींचं पदलालित्य दिसून येतं. म्युझिक जस जसं पुढे सरकत जातं, तस तसं या दोघांच्या डान्सला रंगत चढत जाते. वेगवेगळ्या डान्स स्टेप्स करत दोघीही नाचत असतात. संपूर्ण व्हिडियो आहे एखादं दोन मिनिटांचा. पण त्यातील या दोघींचा डान्स हा बहुतांश म्युझिक वर चालतो. पण दोघीही अगदी लक्षपूर्वक स्टेप्स करत असतात आणि एकमेकींना साजेशा स्टेप्स करत असतात त्यामुळे रंगत वाढते. एकापेक्षा जास्त जण डान्स करत असताना एकमेकांना सांभाळून घेत डान्स करणं, समतोल राखणं महत्वाचं असतं. या दोघींमध्ये ही ते दिसून येतं आणि त्यामुळे व्हिडियो आवडून जातो.

या व्हिडियोत आपल्याला जे गाणं ऐकायला मिळतं त्याचं नाव आहे ‘अट्टंटोडे इट्टंटोडे’. देसामुदुरु या दाक्षिणात्य सिनेमातलं हे गाणं. यात प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन आणि हंसिका मोटवानी यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. अल्लू अर्जुन यांच्या कारकिर्दीतला हा एक महत्वाचा सिनेमा मानला जातो. या सिनेमासोबतच यातील वर उल्लेख केलेलं गाणंही गाजलं. या गाण्यात आपल्याला अल्लू अर्जुन आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना रंभा दिसून येतात. या दोघांनी केलेलं नृत्यही गाजलं आहेच. अशा या प्रसिद्ध गाण्यावर या मुलींनी केलेला डान्स ही मस्त आहेच.

आपल्याला या वायरल व्हिडियो प्रमाणेच आपल्या मराठी गप्पाच्या टीमने लिहिलेला लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम सातत्याने आपल्याला आवडतील अशा विषयांवर लेखन करत असते. विविध विषय हाताळत असते. आपल्याकडूनही हे लेख आवडल्याची पोचपावती मिळत असते. खासकरून जेव्हा आपण हे लेख शेअर करता तेव्हा प्रोत्साहन मिळतं. कारण जे उत्तम त्याचविषयी आपल्या मित्रमंडळींना सांगितलं जातं. तेव्हा आपला हा पाठिंबा आमच्या पाठीशी कायम असू द्या. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *