Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलींचे वडिलांसोबतचे भांडण पाहून हसू आवरणार नाही, बघा कशी भांडते हि पोरगी

ह्या मुलींचे वडिलांसोबतचे भांडण पाहून हसू आवरणार नाही, बघा कशी भांडते हि पोरगी

लहान मुलांच्या बाललीला पाहणं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचे क्षण अनुभवणं असतं. खासकरून आपल्या घरातच एखादं लहान मुलं असेल तर मग बघायलाच नको. या आनंदला मग भरतीच येते. अर्थात ही मुलं लहान असतात तोपर्यंत हे क्षण पुन्हा पुन्हा अनुभवता येतात. पण एकदा का ती मोठी व्हायला लागली की त्यात थोडी कमतरता यायला लागते. म्हणूनच आपल्या मुलांच्या बाललीला कॅमेऱ्यात कैद करून ठेवण प्रत्येक पालकाला आवडतं. खासकरून या बाळलीलांचं चित्रीकरण करणं हा यातला सगळ्यात जास्त उत्तम उपाय ठरतो.

बरं, आजकालचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे आपल्या बाळांच्या बाललीला इतरांना दाखवण्यात ही पालकांना रस असतो. त्यातूनच मग काही वेळेस या लहान मुलांसोबतच्या त्यांच्या मजेशीर क्षणांचे अनेक व्हिडियोज आपण सोशल मीडियावर पाहतो. त्यातल्या अनेकांचं कौतुक करतो. काहींना खूप प्रसिद्धी ही मिळते. मग अर्थातच ते वायरल होतात. यातला आवडला जाणारा एक प्रकार असतो तो म्हणजे लहान मुलांनी आपल्या बोबड्या बोलांनी घातलेल्या हुज्जतीचा व्हिडियो.

अगदीच लहान वयात आपले विचार शब्दांतून व्यक्त करता येत नसतानाही मुलं जेव्हा बडबड करू पाहतात आणि त्यांच्या या कृतीचा वापर पालक मजा म्हणून करतात तेव्हा असे अनेक व्हिडियोज तयार होतात. काही व्हिडियोज हे असेच आपसूक ही तयार होत असतील ही. असाच एक वायरल व्हिडियो आज आपल्या टीमच्या पाहण्यात आला. या व्हिडियोत आपल्याला भेटतात ते एक वडील आणि त्यांची लहानगी मुलगी. सोबत दयायला या लहान मुलीची आई सुद्धा असतेच. पण त्यांची या व्हिडियोत पाहुण्या कलाकाराची भूमिका असते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला ही चिमुकली एका बेडला धरून उभी असलेली दिसते. तिच्या जवळच तिचे वडील उभे असतात. लहान मुलं म्हणजे किती उत्सुक आणि चौकस असतात ते माहिती आहेच आपल्याला. त्यामुळे या मुलीने एखादी गोष्ट हातात घेऊन ती खाण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यावरून तिचे वडील तिला ओरडत असतात असं भासवतात. पण कसलं काय, या मुलीने मात्र त्यांना तोडीस तोड उत्तरं द्यायचं ठरवलेलं असतं. त्यामुळे ते काहीही बोलोत, तिचा युक्तिवाद हा चालूच असतो. अगदी तिच्या बोबड्या बोलांनी ती आपलं मत मांडत असते. आपल्याला काहीही कळत नाही हा भाग अलाहिदा. पण तिचं ते गोंडस रूप बघून मजा येते हे मात्र नक्की.

आपणच काय, पण तिला ओरडण्याचा अभिनय करणारे तिचे वडील सुदधा शेवटी तिला जवळ घेऊन तिला मिठी मारतात. शेवटी लहान मुलांवर खरा असो वा खोटा असो, राग असा किती वेळ टिकून राहतो. येथेही आपल्याला हेच दिसून येतं. आपण हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याला ही हेच वाटलं असणार हे नक्की. पण जर आपण हा व्हिडियो पाहिला नसेल तर आवर्जून पहा. काही गोड क्षणांचे आपण जरूर साक्षिदार व्हाल हे नक्की. आपल्या टीमने तर या व्हिडियोची गंमत तर अनुभवली आहे. आपणही ती अनुभवा.

तसेच मंडळी, आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *