Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या मुलींच्या ग्रुपने स्टेजवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

आतापर्यंत आपण अनेक वायरल व्हिडियोज बघितले असतील. त्यावरील आपल्या टीमने लिहिलेले लेखही वाचले असतील. आजचा लेखही अशाच एका वायरल व्हिडियो वर आधारित आहे. या वायरल व्हिडियोला प्रदर्शित होऊन आजपर्यंत जवळपास दोन वर्षे झाली असतील. आजतागायत या व्हिडियोने जवळपास दोन करोडच्या आसपास व्ह्यूज मिळवले आहेत. यावरून या व्हिडियोची प्रसिद्धी लक्षात यावी. चला तर जाणून घेऊयात या व्हिडियोविषयी.

हा व्हिडियो आहे एका समूह नृत्याचा. वसिंद येथील सरस्वती विद्यालय आणि उच्च विद्यालयाने आयोजित केलेल्या समुह नृत्यस्पर्धेत एका मुलींच्या ग्रुपने जो धमाल डान्स केला त्याचा हा व्हिडियो आहे. खरं तर हल्ली लहानातले लहान व्हिडियोज जास्त प्रचलित आहेत. तरीही हा पावणे सात मिनिटांचा व्हिडियो वायरल झाला आहे. याच मुख्य कारण म्हणजे या डान्समध्ये मुलींनी दाखवलेला जबरदस्त डान्स परफॉर्मन्स. या डान्स परफॉर्मन्स मध्ये त्यांनी तब्बल अकरा गाण्यांवर परफॉर्मन्स दिला आहे. अस असलं तरीही त्यांची या परफॉर्मन्स मधील ऊर्जा कुठेही कमी पडलेली दिसून आली नाही.

हा व्हिडियो सुरू होतो तोच मुळात जबरदस्त एनर्जी असलेल्या गाण्यासोबत. सगळ्यांना वेड लावणाऱ्या ‘शांताबाई’ या गाण्याने या पोरींचा डान्स परफॉर्मन्स सुरू होतो. गाण्याला साजेसा असा उत्साह आणि स्टेप्स मुळे उपस्थितांना हा डान्स आवडतो. पण ही तर केवळ एक झाकी असते. अजून तर दहा गाणी बाकी असतात. दुसरं गाणं अजून खट्याळ असतं. ‘कसा रागाने बघतोय तुझ्या आईचा नवरा’ हे गाणं आपण ऐकलं असेलच. हे गाणंही या मुली सुपरहिट करतात. मग एकापेक्षा एक अशी लोकांना भावणारी गाणी वाजत जातात आणि या मुलींचा डान्सही पुढे सरकत जातो. प्रत्येक डान्स परफॉर्मन्स बरोबर या मुलींच्या डान्सला मिळणारा प्रतिसाद ही वाढत असतो. ‘जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्यावरचा परफॉर्मन्स तर अगदी डोक्यावर उचलून धरला जातो. पोरीही मस्त डान्स स्टेप्स करत असतात. तसेच टोपी, रुमाल यांसारखे प्रॉप्स वापरत असतात. त्यामुळे डान्समध्ये तोच तोचपणा न येता वेगळेपण जाणवत राहतं. जशी मराठी गाणी या मुलींकडून सादर केली जातात तशीच हिंदी गाणीही वापरली जातात.

‘लकडी की काठी, काठी पे घोडा’, ‘मुझे प्यार हुआ अल्लामियाँ’ ही त्यातली काही उदाहरणं. तसेच काही गाण्यांना काहीसा नवीन संवादांचा तडका ही दिलेला दिसून येतो. ‘बिलनची ना’गीण निघाली, ना’गोबा डुलायला लागला’, हे त्याचं उदाहरण. ‘बघ बघ सखे कसं बुगू बुगू वाजतंय’ हे गाणही बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळतं आणि त्यावर प्रत्येक गाण्याप्रमाणे या गाण्यावर ही जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळतो. एव्हाना दहा गाणी तरी झालेली असतात. पण याचा शेवट नुसता कसा होईल. तो तर झिंगाट व्हायला हवा ना आणि तो तसाच होतो. झिंगाटचं हिंदी व्हर्जन आपल्याला ऐकायला मिळतं. पोरीही अगदी दिलखुलास नाचतात आणि व्हिडियो संपतो. खरं तर एवढया मोठ्या व्हिडियोला एवढे व्ह्यूज बघून आश्चर्य वाटतं आधी. पण हा व्हिडियो बघून लक्षात येतं, पोरींनी डान्स एवढा भन्नाट केलाय की करोडो व्ह्यूज बनते हे बॉस !!

त्यातही त्यांच्या स्टेप्स वेगवेगळ्या असतात आणि ऊर्जा तर जबरदस्त असते. सलग पावणे सात मिनिटं नाचणं सोप्पं नाही. पण ते ह्या मुली करतात. त्याच एक कारण हे असावं की त्या हा डान्स परफॉर्मन्स अगदी मनापासून आनंद घेत सादर करत असतात असं दिसून येतं. तसेच डान्स करताना एक बिनधास्तपणा असावा लागतो. तो या मुलींमध्ये ठासून भरलेला दिसतो आणि त्यामुळे डान्सही लोकप्रिय ठरतो. हा त्यांचा बिनधास्तपणा असाच कायम राहू दे.

आपल्या टीमला तर हा डान्स भयंकर आवडला. आपण एव्हाना व्हिडियो बघितला असेल तर आपल्यालाही आवडला असेल. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळवत राहा. लवकरच एका नवीन विषयावरील लेखासकट आपल्याला भेटूच !!! तोपर्यंत आपण जुन्या लेखांची मजा घ्या आणि अगदी आठवणीने आपल्या टीमचे लेख वाचत राहा आणि शेअर करत राहा.धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *